राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती पुढे आली आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या नावाने हे फोन आले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.
Read More
ज्यांनी पक्षात ३०,३५ वर्ष आमदारकी भोगली आणि २० वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले ते आता दुसऱ्या पक्षात जाऊन पडले, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव न घेता केली आहे. ते जळगावमध्ये आयोजित महायूतीच्या मेळाव्यात बोलत होते.
एकनाथ खडसे वारंवार लोकांच्या भ्रष्टाचारावर बोलतात पण ते स्वत: तर भ्रष्टाचाराचे कुलगुरुच आहेत, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना गौण खनिज घोटाळ्याप्रकरणी १३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, गिरीश महाजनांनी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे हे राजकारणातील नासका कांदा आहेत. ते भविष्यातील राजकारणात कितपत तग धरतील अशी स्थिती असल्याची टीका भाजप विधानपरिषद गटनेते आमदार दरेकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता प्रविण दरेकरांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडसेंच्या या ईच्छेवर विरजण घातले आहे.
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून, यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधान परिषदेत दिली
एकनाथ खडसेंवर बिकट वेळ आल्याने त्यांच्या डोक्यात मानसिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे. त्यामुळे ते उठता बसता वाटेल ते बेछूट आरोप करत आहेत, असा घणाघात मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. सोमवारी सलीम कुत्ता प्रकरणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आता विधानपरिषदेतही होणार आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी; राष्ट्रवादीच्या ८ आमदारांना नोटीस; सात दिवसांत उत्तर सादर करण्याची सूचना
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी आजारपणाचे नाटक केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार गटाकडून आपल्याला ऑफर आली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता अजित पवारांनी एकनाथ खडसेंची पोलखोल केली आहे.
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही
मुंबई : राज्यात २०२४च्या विधानसभा निवडणुकांची रणनिती आपापल्या परीने सर्वच पक्ष करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येईल, असा दावा केला आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष एकत्र निवडणुका लढवतील, असे चित्र आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंनी बोलताना वाजपेयी सरकारचा संदर्भ दिला. "एनडीए सरकारच्या सत्तास्थापनेत एकूण ३२ पक्ष सामील झाले होते, त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होऊ शकले," असेही खडसे म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फरार बुकी अनिल जयसिंघानी यांच्यासोबतचा फोटो समोर आला. आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान यावरून राऊतांनी "आमच्यावर झालेले आरोप खरे आणि तुमच्यावर झालेले आरोप खोटे काय? तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल असे पुरावे आमच्याकडे आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. नाही तर महाराष्ट्रात स्फोट होतील." असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कुठलेही कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी भंडारा गोंदियातील महिलेवर झालेल्या अत्याचाराचा प्रकरण चर्चेसाठी आणण्याची मागणी केली.
राज्यात आता फक्त मंत्रालयाच अस्तित्वात आहे, सचिवालय अस्तित्वात नाही असे उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला
"राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे!", असे सूचक ट्वीट मोहित कंबोज भारतील यांनी बुधवारी रात्री केले होते. कंबोज यांच्या ट्वीटमुळे राज्याच्या राजकारणार चांगलीच खळबळ माजली आहे. सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी यासंदर्भात त्यांनी मागणी फडणवीस-शिंदे सरकारकडे केली होती. दरम्यान, 'घोटाळा कोणाचाही असला तरी चर्चा झालीच पाहीजे', असे मत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.
जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी पार पडला. विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सदस्यांना शपथ दिली
राज्यपाल नियुक्त आमदारांचा वाद हा उच्च न्यायालयातही गेलाी होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीची ही मागणी फेटाळून लावली. घटनात्मक अधिकारानुसार, न्यायालयाला राज्यपालांना आदेश देता येणार नाही, असे म्हणत प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. राज्यपालांनी राज्य सरकारचा निर्णय मान्य किंवा अमान्य करणे हा सर्वस्वी अधिकार राज्यलाचांच आहे.
"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेल्या व्हिडिओमध्ये मी उपस्थित असून त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.", असा खुलासा तेजस मोरे यांच्याकडून रविवारी करण्यात आला. तेजस मोरे यांनी दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यातून स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा दावा विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी केला होता. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना तेजस मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अहवाल मिळत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण
पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई गिरीश चौधरी याला सक्तवसुली संचलनलयाने अटकेत घेतले आहे. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने चौधरीला अटक केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी १३ तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. आता १२ जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवार, दि. 2 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या शरद पवारां सोबतच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजप आमदार राम सातपुते आणि ऍड. रोहिणी खडसे यांच्यात ट्विटर वॉर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ईडी पीडा अद्यापही काही टळलेली नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवार, दि. 25 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी पार पडणार असून यावेळी न्यायालयात नेमके काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहार संदर्भात चौकशीचे समन्स पाठवण्यात आले होते.त्यानुसार एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी आज सात तास झाली. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी झाली त्याला मी पूर्ण सहकार्य केल्याचे खडसे यांनी माध्यमाना बाहेर आल्यावर सांगितले.
नंदूरबार विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी ३३२ मतं घेत विजयी गुलाल लावला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकारावरून त्यांनी आता माफी मागितली आहे. “सभेमध्ये मी जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”, असे ट्विट करत खडसे यांनी माफी मागितली आहे.
आता ज्याअर्थी भूतकाळात खडसेंसंबंधी तीव्र नाराजी असतानाही त्यांना पक्षात घेतले, सन्मानपूर्वक प्रवेश समारंभ आयोजित केला आणि आता त्यांना योग्य ते पद देण्याचीही तयारी चालविली आहे त्याअर्थी उत्तर महाराष्ट्रात आपला प्रभाव निर्माण करण्याचा पवारांचा प्रयत्नच नव्हे तर निर्धारही दिसतो.
नाथाभाऊंच्या बोलण्यावरून असा समज होतो की, उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष किंवा त्याचा मूळ पक्ष असलेल्या जनसंघासाठी पूर्ण दुष्काळी प्रांत होता आणि नाथाभाऊंनी खस्ता खाल्यानंतरच तेथे भाजपला सोन्याचे दिवस आले. उत्तर महाराष्ट्रात नाथाभाऊंच्यामुळे पक्ष उभा राहिल्यावर मात्र पक्षाने त्यांच्यावर अन्याय करून त्यांना दूर लोटले, असाही समज होतो. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्रातला ‘माधवं फॉर्म्युला’ पाळला गेला नाही. राष्ट्रवादीचे चरणकमल पुजण्याआधी एकनाथ खडसे यांनी आपल्या नाराजीचे एक कारण जाहीर केले होते. ‘माधवं’ म्हणजे काय? तर म्हणे, माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी हे समीकरण! तर खडसेंच्या मते, देवेंद्र यांनी माळी, धनगर आणि वंजारी या समाजाचे राजकारण केले नाही. बरे झाले खडसे यांनीच हे स्पष्ट केले. तसेही ‘सब समाज को साथ लिये’चा संकल्प असलेल्या राजकीय पक्षाने राजकीय भुकेसाठी महाराष्ट्रात केवळ लोकसंख्या जास्त असलेल्या समाजाचा विचार करावा, हे कोण
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशामुळे अनेक राजकीय घडामोडी नाट्यमयरित्या घडत आहेत. खडसेंच्या प्रवेशामुळे त्यांना मंत्रीपद द्यावे लागणार आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना एक पाऊल मागे घ्यावे लागणार आहे का याबद्दलही चर्चा राजकीय सुरू आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची बैठक पार पडली. अचानक झालेल्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे.
एकनाथ खडसे ज्या काळात राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत, ते पाहता त्यांना मंत्रीपद मिळणार का याकडे साऱ्यांचे लक्ष्य आहे. याबद्दल काय बोलणी झाली त्याची माहिती खडसे आणि राष्ट्रवादी यांनी दिलेली नाही. त्यामुळे खडसे मंत्रीपद मिळवतात का हे देखील पाहणे औत्सुक्याचे आहे.
मुलगी रोहिणीसह ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी 'पॉवर' मानल्या जाणाऱ्या अजित पवारांशी गेले दोन दिवस माध्यमांचा संपर्क झालेला नाही अथवा दादांनी थेट कुणाशी संपर्क केलेला नाही. अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थित असणे अपेक्षित होते. मंचावर राष्ट्रवादीतील इतकी दिग्गज मंडळी उपस्थित असताना दादा कुठे गेले, असा प्रश्न सर्वच कार्यकर्त्यांना पडला होता. खडसे प्रवेशाच्या या सोशल डिस्टंसिंग पाळून करण्यात आलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात दादा नसल्याची सल साऱ्यांनाच लागून होती.
राष्ट्रवादी पक्ष आज अभंग आहे, उद्या त्याची स्थिती काय असेल? उद्धवसेनेत शिवसैनिक किती राहतील? हे सगळे भवितव्यातील प्रश्न आहेत. खडसे यांच्या निदानाप्रमाणे सर्व काही ठीक चालले तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्याची अवस्था होईल.
माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप सदस्यद्वाचा अखेर राजीनामा दिला. खानदेशातील एक लढवय्या नेता आणि ओबीसी समाजाचे नेते, अशी ओळख त्यांनी निर्माण केली. भाजपच्या राज्यातील पक्षविस्ताराच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्याविरोधात खोटे खटले दाखल करण्यात आले, त्यामुळे माझा राजीनामा घेणे, हा माझ्यासाठी अत्यंत बदनामीकारक होते, त्यामुळे माझा नाईलाज झाला. या सगळ्यात मी चार वर्षे काढली, असे खडसे म्हणाले.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील मंत्रीमंडळात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ खडसे विधान परिषदेवर जाणार असून त्यांना मंत्रीपदही मिळणार आहेत. खडसे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील कृषीमंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते हे शिवसेनेकडे जाणार असल्याचे समजते त्याऐवजी विद्यमान गृहमंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षातर्फे दिली जाऊ शकते. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे येत्या काळात राज्याच्या सर
ज्या व्यक्तीने पक्ष भाजपसोबत युतीत असतानाच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना राष्ट्रवादीत आणि महाविकास आघाडीत प्रवेश मिळाला हे ऐकून मला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रीया मुक्ताईनगरचे शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. याबद्दल स्वतः पक्षश्रेष्ठी आणि शरद पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तोडण्यामागे एकनाथ खडसे यांचा हात होता, असे पाटील म्हणाले.
अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवून महावितरणने खडसेंना शॉक दिला आहे.
निर्णय घेताना पक्ष अनेक बाजूंनी, कुणा व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत निर्णय घेत असतो. शेवटी ज्यांना पक्ष पुढे न्यायचा आहे, त्यांना अशाच पद्धतीने विचार करावा लागतो. पक्षाच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये दीर्घकाळ सहभागी असणाऱ्यांना हे सांगण्याची खरेच गरज आहे काय?
एखाद्या नेत्याचा जयंतीचा असा कार्यक्रम खरेतर एक गंभीर औपचारिकता आहे. त्या नेत्यांच्या स्फूर्तीदायक स्मृती जागविणे, हाच तिचा हेतू असू शकतो. प्रासंगिक राजकारण चघळण्यासाठी त्याचा वापर करणे, हे काही औचित्याला धरून ठरू शकत नाही.
त्यांना लक्ष्य करणे म्हणजे, थोड्या स्पष्ट भाषेत सांगायचे तर आपले राजकीय जीवन आपल्या हाताने संकटात आणणे आहे. पक्ष काही कारवाई करील की नाही, हा पक्षाचा प्रश्न आहे, त्याबाबत आपण कोणताही सल्ला देऊ शकत नाही. परंतु, जनता कारवाई करील. जनतेला सल्ला देण्याची गरज नाही. जनमानस हे फार प्रगल्भ असते. ते कोणते ‘मुंडे’ निवडून आणायचे आणि कोणते ‘मुंडे’ पाडायचे, हे ठरवीत असते. लोकांना अक्कल शिकवायची काही गरज नसते.
"भाजप आपले कुटूंब आहे, ज्या काही चुका ठराविक व्यक्तींकडून झाल्या असतील, त्या नक्कीच सुधारल्या जातील, सध्याची परिस्थिती नक्कीच बदलेल. कधीकाळी असा प्रसंग उद्भवलाच नव्हता, अशीही वेळ येईल, त्यामुळे आत्ता बोलताना शब्द जपून वापरा, पक्ष हे कुटूंब आहे. त्यामुळे कुटूंबातील भांडणे रस्त्यावर नकोत. जे काही असेल ते संवादातून मार्गी लागेल." असा सल्ला भाजप अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गोपीनाथ गडावर उपस्थित नेत्यांना दिला. Chandrakant Patil's Comment about Pankaja Munde and Chandrakant Patil
अस्वस्थ नेत्यांना एवढेच सांगता येण्यासारखे आहे की, अस्वस्थता असू द्या, तिचे रुपांतर अविचारात करू नका. तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्वतःची व्यक्तिगत गार्हाणी गात बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे व्यापक विषय हाती घ्या. त्या विषयाशी एकरूप व्हा.
भाजपची चौथी यादी जाहीर, खडसेंच्या कन्येला संधी
पाण्यासाठी आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे असे स्वतः आ.नाथाभाऊ खडसे यांनीच म्हटल्याने विधानसभेला धक्का बसला. दुष्काळावर मंगळवारी विधानसभेत चर्चा झाली, त्यावेळी आ.खडसे बोलत होते.
धरणातून लाखो लिटर पाणी वाहून जात होते. परंतु, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन प्रकल्पामुळे परिसराला संजीवनी मिळाली आहे.
विविध शासनाच्या योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचविण्यात तहसीलदाराचे योगदान महत्त्वपूर्ण असून जिल्ह्यात त्यांना संजय गांधी निराधारची टीमही मदत करीत आहे.