मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये साबीर खानने एका तरुणीसोबत लव्ह जिहाद केल्याची घटना समोर आली आहे. साबीरने आधी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार सुरू केले.एवढेच नाही तर तो पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत असे. साबीरने जबरदस्तीने गोमांस खाऊ घातल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Read More
कर्नाटकात सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्याने शाळेत गणरायाची पूजा केली म्हणून महिला शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण करून त्याचा हात तोडला. यावरून कुटुंबीयांनी गोंधळ घातला. यानंतर आरोपी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यावर उपचार करण्याचे आदेशही दिले आहेत.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका हिंदू तरुणाला मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.तसेच त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले जात आहे. दि. १२ जून रोजी पीडितेने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. पीडित नवीनने या वर्षी मे महिन्यात फरजानासोबत मंदिरात लग्न केले होते.
काँग्रेस पक्षाचा नेता ऋषभ भदौरिया याने त्याची पत्नी भावना भदौरिया हिच्यावर गोळी झाडली. या हत्येनंतर ऋषभ भदौरिया फरार झाला आहे.
‘शिंदे’ हे उपनाम कसे निर्माण झाले? त्यांची व्युत्पत्ती कशी झाली असावी? ह्या विचाराने इतिहास वाचन सुरु केले त्यावेळी लक्षात आले की, महाराष्ट्रात असलेली ९६ कुळे त्यातील ४ कुळे दक्षिण भागातून आलेली आहेत व शिंदे हे घराणे नागवंशीय असून ते एक प्राचीन परंपरा सांगणारे घराणे आहे.
देशभक्ती, हजरजबाबीपणा, विनम्रता, वाक्चातुर्य आणि आपल्या वाणीने करोडो देशवासीयांबरोबरच विरोधकांच्याही हृदयसिंहासनावर राज्य करणारे अतुलनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताच्या राजकारणातील पितामह अटल बिहारी वाजपेयी, असे म्हटले तर ते निश्चितच अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. तीनवेळा देशाच्या सर्वोच्च अशा पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतरही त्यांचे पाय सतत जमिनीवरच राहिले आणि यातच त्यांचा खरा मोठेपणा दिसून येतो.
पं. उल्हास कशाळकर यांना गायन क्षेत्रातील दीर्घ साधन, कल्पकता व घराणेदार गायन परंपरा जोपासण्याबद्दल २०१७ – १८ या वर्षासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.