संत नामदेव हे संत ज्ञानदेवांचे संतसांगाती होते. ज्ञानेश्वर समाधीस्थ झाल्यावर ५० वर्षे नामदेवांनी भक्ती संप्रदायाचे नेतृत्व केले व विठ्ठल भक्तीला पंजाबपर्यंत नेऊन राष्ट्रीय स्वरूप दिले. संत नामदेवांचे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत भक्तीकाव्य आहे. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांची पदे समाविष्ट आहेत. हिंदी भक्ती साहित्याचे व निर्गुण रामोपासनेचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचा कार्यगौरव कबीरांसह सकल संतांनी केलेला आहे. संत नामदेवांच्या मराठी अभंगगाथेत ‘रामकथा महात्म्य’ असे २७ अभंगांचे स्वतंत्र प
Read More
कपूरथलामध्ये जमावाने मारलेला तरुण बेईमान नसून चोरी करायला आला होता. पंजाब पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. कपूरथला एसएसपी हरकमलप्रीत सिंह खख यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, तरुण चोरी करण्यासाठी आला होता.त्यामुळे तरुणाची हत्या करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान दूरध्वनीवरून सुमारे ४५ मिनीटे चर्चा झाली. यावेळी अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि भारत–रशिया सहकार्य याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये झाली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केली आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणस्तानमधील स्थितीविषयी अमेरिकेसह भारत आणि रशियाचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.
पंजाबमधील काँग्रेस सरकारने धर्मग्रंथांची बदनामी करणाऱ्या कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.