साधारणतः विद्यार्थी पदवीधर झाला की, तो नोकरीच्या शोधासाठी नवनवीन वेबसाईट्सला भेट देतो. दरम्यान, या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना योग्य कौशल्याधारित जॉब मिळण्याकरिता मार्गदर्शन घ्यावे लागते. तर आज आपण जाणून घेऊयात की, जॉब मिळविण्यासाठी कोणकोणत्या वेबसाईट्स उपयुक्त ठरतील. चला तर मग तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर या वेबसाईट्सविषयी जाणून घेऊयात.
Read More
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चांद्रयान ३ मोहीम फत्ते करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरविणारा पहिला देश म्हणून बहुमान मिळविला. सबंध जगभरातून इस्त्रोच्या अतुलनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाले. त्यातच आता लिंक्डइन या वाणिज्य आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित वेब पोर्टलवर एका पोस्टने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पिरामल इंटरप्रायझेसचे ग्रुप हेड राजीव बॅनर्जी यांनी इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहीमेच्या यशावर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
आता कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा प्रत्यक्ष अनुभव याच्याच जोडीला त्याची मानसिकता व कार्यशैलीवर अधिक भर देत आहेत. यासंदर्भात ’लिंक्डइन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लहान-मोठ्या अशा विविध कंपन्या कर्मचार्यांची निवड करताना आता त्यांची मानसिकता व कार्यशैली यावर कटाक्षाने भर देत आहेत.
सध्या कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे ‘वर्क फ्रोम होम’च्या पर्यायाचा जगभरात अवलंब होताना दिसतो. पण, अजूनही बरेच ठिकाणी पुरुष ‘वर्क’ मोडवर, तर महिला ‘होम’ फ्रंट सांभाळताना दिसतात. भारतीय उद्योगधंद्यांमध्येही स्त्री-पुरुष कर्मचारीसंख्येत ही तफावत स्पष्ट दिसून येते. तेव्हा, त्यामागील कारणांचा ऊहापोह करणारा हा लेख...
‘लिंक्डइन’ या कंपनीने प्रथमच संपूर्ण भारतभर वेतनासंदर्भात एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक पगार हा देशातील बंगळुरू शहरात दिला जातो.
‘लिंक्डइन’ किंवा ‘लिंक्डइन डॉट. कॉम’ ही एक प्रमुख व्यावसायिक वेबसाईट आहे. यामार्फत विविध व्यक्ती किंवा कंपन्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. लिंक्डइनला एक प्रमुख समाजमाध्यमाच्या यादीतही गणले जाते.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब हे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म्स वगळता अन्य मजेशीर आणि उपयुक्त सोशलमिडिया प्लॅटफॉर्म्स आपणास माहिती आहेत का ? त्याबद्दल जाणून घेऊयात.