आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावतो आणि त्याच नात्याची गुंफण करणारे ‘तू नसशील तर’ हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावभावनांनी भरलेल्या अल्बममधील हे तिसरे गाणे असून, त्यामधून आई आणि मुलाच्या नात्याची हळवी, खोल आणि मनाला भिडणारी भावना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे गाणे पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होत आहेत. अवधूत गुप्ते यांनी हे गाणे स्वतः संगीतबद्ध केले असून त्याचे गायनही त्यांनीच केले आहे.
Read More