आणीबाणी... हा चार अक्षरी शब्द आजही ऐकला की तो अंधारकाळ प्रत्यक्ष अनुभवलेल्या, भोगलेल्यांच्या वेदनादायी स्मृती पुनश्च जागृत होतात. इंदिरा गांधींनी लादलेल्या त्या २१ महिन्यांच्या हुकूमशाहीत भारतीय लोकशाही, मानवाधिकार सर्वार्थाने संपुष्टात आले. रा. स्व. संघासह कित्येक संघटना, प्रसारमाध्यमे यांच्यावर बंदी आली. आणीबाणीला विरोध करणारे हजारो कार्यकर्ते, स्वयंसेवक कोठडीत डांबले गेले. कित्येकांचे प्राणही गेले. अशी ही आणीबाणी नामक दडपशाही भारतातीलच नव्हे, तर जगाच्या पाठीवर लोकशाहीला लागलेला एक काळीमा... आजपासून ठीक ४
Read More
भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वथा निंदनीय, देशातील जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्यास बाधक, जुलमी हुकूमशाहीचा काळा कालावधी ठरावा अशी २५ जून १९७५ मध्यरात्रीपासून दि. २१ मार्च १९७७ या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी...
२६ जून १९७५... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रांताचा अभ्यासवर्ग नगरला चालू होता. त्या दिवशीच्या वर्गाच्या पहिल्याच सत्रात मा. बाळासाहेब आपट्यांनी २५ जूनच्या रात्री इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणी आणि तिच्या आपल्या देशावर होणारा हा गंभीर परिणाम आणि त्या विरुद्ध लढावे लागेल, अशी एकूण मांडणी केली. ’लंबी लडाई हैं’ असं ते म्हणाले. संघावर बंदी लगेच आली आणि धरपकडही लगेच सुरु झाली. संघाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रमुख आणि तोपर्यंत पकडले न गेलेले कार्यकर्ते भूमिगत झाले. वर वर नित्य कार्यक्रम आणि अंतर्गत आणीबाण
मला आठवतंय, मी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यावेळी आणीबाणी म्हणजे काय, ती का लादली गेली, त्यामागचे राजकारण काय इत्यादी काहीच सखोल कळले नाही. पण, सर्व स्वातंत्र्यावर गदा आली आहे, वर्तमानपत्रावर बंदी, संघावर बंदी, भाषणस्वातंत्र्यावर बंदी हे सर्व जरा विचित्र आहे, अन्यायकारक आहे, हे समजण्यासारखे वय होते, एवढे नक्कीच. हा अन्याय दूर झाला पाहिजे, अशी साद माझ्यातील तरुण रक्ताने मला दिली.पण, नक्की काय करायचे?
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासातल्या काही आठवणी खरतर इतक्या गडद आणि वाईट आहेत की, देशाच्या समूहमनाला त्याची पुसटशी आठवण पण नकोशी वाटते. मग ती भोपाळ दुर्घटनेची असो की १९८४च्या दिल्लीतील दंगली की १९७५ साली लादलेली आणीबाणी...
भारताला अभिजात कलाविश्वाचा वारसा आहे. या देदीप्यमान वारशाचे संवर्धन करण्यासाठी आकाश नारायण विश्वास काम करतात. त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
दहा हजारांच्या मानधनाला विरोध हे तर फक्त निमित्त!