एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत कमविलेल्या चल-अचल संपत्तीचे त्याच्या पश्चात योग्य पद्धतीने वाटप होण्याकरिता, संपत्ती नियोजन प्रत्येकाने त्याच्या हयातीतच म्हणजे, तो जीवंत असतानाच करावे. यासाठी नामांकन (नॉमिनेशन) ( Nomination Rules ) आणि इच्छापत्र (व्हिल) हे दोन प्रमुख पर्याय आहेत. भारतीयांमध्ये इच्छापत्राबाबत अजूनही पुरेशी जागरुकता असल्याचे दिसून येत नाही. इच्छापत्र करणार्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बर्याच जणांना याबाबत पुरेशी माहितीही नसते. या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन करणे सहज आणि सोपा पर्याय आहे. त्
Read More
आयुष्यात नियोजन हा खूप महत्वाचा शब्द आहे. या नियोजनामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचे संतुलन ठेवण्यास मदत होते. विशेषतः वाढत्या पगाराबरोबर वाढत्या महागाईला सामोरं जाण्यासाठी आर्थिक नियोजन हा प्रमुख पर्याय ठरतो. सरासरी दरवर्षी १० ते १५ टक्क्याने प्रत्येक व्यक्तीच्या पगारात व मानधनात वाढ होत असते. त्यांचे नियोजन हे भविष्यातील संभाव्य खर्च, नियमित खर्च, अनपेक्षित खर्च, जीवनावश्यक खर्च अशा विविध कसोट्यांवर करणे अपेक्षित असते.
आर्थिक बचत ही भविष्यातील आर्थिक तरतूद असते. सुरूवातीला योग्य नियोजन केल्यास बचत हीच पूंजी गुंतवणूक ठरू शकते.वर्ल्ड फायनान्शिअल डे च्या निमित्ताने.....
जर आपण कोणाला विचारले की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे नियोजन कसे करता, तर आपल्याला काही साचेबद्ध उत्तरं मिळतील. जसे की, नवीन घर विकत घेणे, नवीन कार, मुलांचे शिक्षण किंवा बाहेरगावी फिरायला जाणे. आपल्यापैकी बरेच जणं अशा प्रकारे आपले आर्थिक नियोजन करत असतात. संशोधनातून असे लक्षात आले आहे की, लोक आनंदी परिणामांसाठी योजना आखतात, जेणेकरून त्याचा फायदा निवृत्तीनंतर होतो.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व
गुंतवणूक म्हणून टर्म इन्शुरन्स हप्त्याकडे बघितल्यास जर विमा घेतलेल्या कालावधीत दावा आल्यास कुटुंबाची फरफट होणार नाही एवढी रक्कम नक्कीच मिळू शकते.
मानसशास्त्रात FOBO(Fear Of Better Option) नावाची एक संकल्पना आहे. याचा अर्थ मला अजून काही चांगला पर्याय मिळेल का? या शोधात सर्वजण असतात. प्रत्येकाच्या बाबतीत लागू पडेल असं उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, साऊंड, कॅमेरा, टच, वजन, बॅटरी बॅकअप अशा कितीतरी गोष्टींची तुलना नवीन फोन घेण्यापूर्वी करून पाहत असतो. शेवटी ब्रँड आणि किंमत याच्यापाशी घेणारा अडखळतो आणि निर्णय लांबणीवर पडतो. अशीच गत कपडे, लग्नाचा जोडीदार, मुलांची शाळा, जेवणासाठी हॉटेल आणि आर्थिक आघाडीवर देखील घडत असते.
भारत सोडून परदेशात विशेषत: विकसित देशात स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे आहे. पण, देश सोडून जाण्यापूर्वी येथील काही आर्थिक/ वित्तीय व्यवहार पूर्ण करणे आवश्यक असते. 'युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स'च्या आकडेवारीनुसार, १९९० सालापर्यंत ७ दशलक्ष भारतीयांनी परदेशात स्थलांतर केले होते, तर २०१७ साली हे प्रमाण १७ दशलक्ष होते. यात ज्या भारतीयांना समाविष्ट होऊन अनिवासी भारतीय (एनआरआय) व्हायचे असेल, तर त्यांना पुढील आर्थिक/वित्तीय व्यवहारांबाबत पाऊल उचलावयास हवे.त्याविषयी आज जाणून घेऊया...