शरद पवारांनी आजवर केवळ दाढ्या कुरवाळण्याचेच राजकारण केले. खरा इतिहास सामान्यांसमोर कधीही येऊ दिला नाही. म्हणूनच देशाचे पंतप्रधान फाळणीचा दिवस हा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून साजरा करा, असे एकीकडे आवाहन करत असताना, दुसरीकडे शरद पवार हे फाळणीचा इतिहास नव्या पिढीला शिकवण्याची काहीही गरज नाही, असे वक्तव्य करतात. असे हे पवारांचे दडवा आणि दडपाचे राजकारण!
Read More
देशाच्या फाळणीचा रक्तरंजित इतिहास, भारतीय नागरिकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा विभाजन विभीषिका स्मृती दिन असावा असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार इंडियन बँकतर्फे फाळणीच्या भीषण आठवणींचे आणि इतिहासाचे हृदयद्रावक चित्रण एका फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले.