वेब सीरीज विश्वातील लोकप्रिय सीरीज म्हणजे मिर्झापूर. या सीरीजचे तीन यशस्वी भाग आल्यानंतर आता थेट मिर्झापूर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पंकज त्रिपाठी, द्विवेंदू शर्मा, अली फजल यांची भूमिका असलेली 'मिर्झापूर' वेबसीरिज चांगलीच गाजली. आणि आता 'मिर्झापूर' वेबसीरिज चित्रपट रुपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीला २० पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपट देणारी जोडी सलीम-जावेद पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. आजवर या जोडीने शोले, दीवार, जंजीर, शक्ती असे अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिले. आता या दोघांच्या यशाची कहाणी सांगणारी डॉक्युमेंट्री ‘अँग्री यंग मेन’ ही अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लाँच जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लोकसभा निवडणूकीचा आजचा (२० मे २०२४) पाचवा अर्थात शेवटचा मतदानाचा टप्पा संपन्न होत आहे. सामान्य नागरिकांसह कलाकार देखील आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांच्यासोबत पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी देखील मतदान केले आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar) हिचा २००८ पासून एकाचवेळी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरु झाला. एकामागोमाग एक दर्जेदार कलाकृतींचा ती भाग होत गेली. आणि आज हिंदी चित्रपटसृष्टीत सईने (Sai Tamhankar) आपल्या नावाची सही प्रेक्षकांच्या मनावर कोरुन ठेवली आहे. काही दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सवर 'भक्षक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात सईने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा (Sai Tamhankar) सई ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरीजमध्ये दिग्गज महिला कलाकारांसोबत झळकणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा १९७८ साली आलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. यानंतर ‘डॉन २’ मध्ये शाहरुख खान झळकला होता. आणि आता याच श्रृंखलेचा तिसरा भाग अर्थात ‘डॉन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात आता डॉन अभिनेता रणवीर सिंग असणार आहे. याशिवाय या चित्रपटात आला अभिनेत्री कियारा अडवाणी हिची एन्ट्री झाली आहे.
बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी प्रत्येक स्तरातून केली जात असतानाच कलाकारांनीही आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला.
शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इस पिंक' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला.आज प्रसिद्ध झालेल्या या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांची लव लाईफ, त्यांच्या नात्यामध्ये येणारी वादळे, परिस्थितीनुसार बदलणारे नातेसंबंध यांची एक झलक दिसते.
कन्नड चित्रपट सृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला 'केजीएफ १' या चित्रपटानंतर आज 'केजीएफ २' या त्याच्या सिक्वलमधील नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. 'केजीएफ १' या चित्रपटाच्या हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि अन्य डब करण्यात आलेल्या भाषांतील चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
'भोपाळच्या प्रिय मतदारांनो, तुमच्या शहराला आणखी एका गॅस दुर्घटनेपासून वाचवण्याची वेळ आली आहे’, असे ट्विट फरहान अख्तर याने केले
युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (यूईएफए) चॅम्पियन्स लीग फायनल्समध्ये अभिनेता फरहान अख्तर विशेष पाहुणा म्हणून उपस्थित राहणार