पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुलांवर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात आहे. त्याचबरोबर या मुलांना जीवनाच्या प्रत्येक स्तरावर भेदभाव आणि शोषणाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानच्या बाल हक्क राष्ट्रीय आयोगाच्या (एनसीआरसी) एका अहवालात ही माहीती देण्यात आली असून सरकारने तातडीने यात लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
Read More
मध्य प्रदेशातील भोपाळच्या बाणगंगा भागात इस्लामिक कट्टरपंथींच्या दबावामुळे हिंदू कुटुंबांचे स्थलांतर झाल्याचा दावा केला जातोय. स्थानिक हिंदू कुटुंबांचा आरोप आहे प्रेम नगरमधील मुस्लिम समुदायाचे लोक हिंदूंच्या घरासमोर शिवीगाळ करतात, गोंधळ घालतात आणि तलवारीचा धाक देखील दाखवतात. ज्यामुळे त्यांना परिसर सोडण्यास भाग पाडले जात आहे. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने बाणगंगा परिसरात निषेध केला आणि हनुमान चालीसा पठण केले.
एका महिला आयपीएस ऑफिसरला तिचे पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध केलेल्या खोट्या आरोपांबद्दल सार्वजनिक माफी मागण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात मंगळवार, दि.२२ जुलै रोजी दिले आहे. या प्रकरणात महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे पती आणि सासऱ्याला अनुक्रमे १०९ आणि १०३ दिवस तुरुंगात राहावे लागले होते.
‘कोऽहम ते सोहम’ या ‘स्व’शोधाच्या प्रवासाला केवळ आध्यात्मिक आधार नसून, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात ‘मी कोण?’ या प्रश्नाचे उत्तर सापडणेही तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक संवादाबरोबरच आजच्या काळात स्वसंवादाचे महत्त्वही प्रकर्षाने अधोरेखित हवे. पण, दुर्दैवाने हा स्वसंवाद आज हरवलेला दिसतो. पर्यायाने आपल्या समस्या, त्यावरची उत्तरं ही बाहेर शोधण्याकडेच आजच्या पिढीचा कल. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात स्वविकासाचा जाण्याचा मार्ग हा स्वबोधातूनच जातो.
“जेव्हा एखादा कायदा अल्पवयीन मुलाच्या कल्याणाच्याआड येतो, तेव्हा त्या कायद्याच्या तुलनेत मुलाचे हित अधिक महत्त्वाचे ठरते”, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय नुकताच दिला आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’नुसार वडिलांनाच मुलांच्या ७ वर्षानंतर ताबा देण्याची तरतुद असली तरीदेखील न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठाने या निर्णयात एका ९ वर्षांच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे दिला आहे.
पाटोदा तालुक्यातील गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जमातीतील पारधी समाजातील दिव्यांग लोकेश सोपान पवार आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायी कारवाई विरोधात विवेक विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
एका विभक्त दाम्पत्याला विवाहाच्या ‘अपूरणीय विघटन’ (Irretrievable breakdown of marriage) तत्व म्हणजे पती-पत्नीमधील संबंध इतके ताणले जातात की, ते पुन्हा एकत्र येणे शक्य नसते. या तत्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नुकताच घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, “हा वैवाहिक संबध कायम ठेवण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. यामुळे पक्षांमध्ये केवळ वैर आणि मानसिक त्रास सुरू होईल, जे कायद्याच्या दृष्टीने वैवाहिक सुसंवादाच्या नीतिमत्तेच्या विरुद्ध
डीआरपीचे अधिकारी घरातील कर्ते मंडळी घरात नसताना ज्येष्ठ नागरिकांकडून जबरदस्तीने कागदपत्रांवर सही घेत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. 'अंगठे धरून संमतीच्या फॉर्मवर त्यांचे ठसे घेण्यात आले' असेही वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. मात्र,व्हिडिओत दिसणाऱ्या कुटुंबीयांशी दैनिक मुंबई तरुण भारतने संवाद साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. "अचानक आलेला घोळका हा कोणाला विचारून तुम्ही सर्व्हेक्षकांना इथे बोलवले? असे म्हणत आमच्यावर धावून आला. मी स्
भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ (पूर्वीचे आयपीसी कलम ४९८अ) अंतर्गत दाखल केलेला एका कुटुंबाविरुद्धचा खटला रद्द करत वैवाहिक कलहाच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाचे न्या.नितीन सांबरे आणि न्या.महेंद्र नेर्लीकर यांच्या खंडपीठाने नुकताच दिलेल्या निर्णयात नमूद केले की, “आजकाल क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या वादांमुळे हिंदू समाजातील पवित्र विवाह संकल्पनेला धक्का बसत आहे.”
हिंदू परंपरेत विवाह केवळ एक सामाजिक करार नसून ते एक पवित्र आणि सात जन्मांचं नातं मानलं जातं. हा विवाह केवळ त्या दोन व्यक्तींचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांचा आणि समाजालाही जोडणारा एक महत्त्वाचा बंध असतो. त्यामुळे पूर्वीपासून धर्म, कर्तव्य आणि समाजात संतुलन राखण्याच्या दृष्टीने विवाह संस्काराला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकाल अनेक विवाहांमध्ये आधुनिकतेच्या आग्रहापायी पारंपरिक विधी कमी प्रमाणात होत असले, तरी अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा सर्व भारतीय परंपरा आणि विधींसह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
“आईने तिच्या मुलाच्या पितृत्वासाठी डीएनए चाचणीस संमती दिली असली, तरीही न्यायालयांनी अल्पवयीन मुलांच्या हक्कांचे रक्षण करत, अशा चाचण्यांचे परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.” असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या खंडपीठाने नुकताच दिला आहे. या प्रकरणात एका आईने आपल्या मुलाच्या डीएनए चाचणी करण्याच्या कुटुंब न्यायालयाने दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
‘केरळ संयुक्त हिंदू कुटुंब व्यवस्था कायदा, १९७५’ मधील कलम ३ आणि कलम ४ हे हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ च्या कलम ६ च्या विरोधात आहे. त्यामुळे ती कलमे अंमलात आणता येणार नाहीत, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ईश्वरन यांच्या खंडपीठाने सोमवार, दि.७ जुलै रोजी दिला आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयाने मुस्लिम महिलेला तलाकच्या खुला पद्धतीद्वारे पतीच्या सहमतीविना तलाक करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने(आयएमपीएलबी) या निर्णयाविरुद्ध चर्चेसाठी मंगळवार, दि. १ जुलै रोजी बैठक बोलावली आहे.
पत्नी स्वत: कमवत जरी असेल तरी तिला पतीच्या उत्पन्नातून आर्थिक मदत किंवा पोटगी मिळणे आवश्यक आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. २६ जून रोजी दिला आहे. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये विभक्त महिलेच्या पतीने देखभाल खर्च म्हणून दरमहा १५,००० रुपये देण्याचे आदेश दिला होता. या आदेशाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या याचिकेला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी फेटाळून लावले आहे.
मुस्लिम महिलेला तलाकच्या खुला (तलाक) पध्दतीद्वारे तलाक करण्याचा पूर्ण अधिकार पतीच्या सहमतीविना आहे, असा निर्वाळा तेलंगणा उच्च न्यायालयाने मंगळवार दि. २४ जून रोजी दिला. मोहम्मद आरिफ अली विरुद्ध श्रीमती अफसरुननिसा या खटलात एका मुस्लीम पुरूषाने त्याच्या पत्नीने तलाक घेतल्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत, समाजाचे आपण देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी कायम धडपडणार्या मंगला बाळकृष्ण काकड यांच्याविषयी...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र परिवाराकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ज्यांच्या कुणाकडून हलगर्जीपणा झाला मग तो महिला आयोग असो पोलिस असोत किंवा भरोसा सेलच्या महिला पोलिस असो, सगळ्यांची चौकशी होईल. तसेच ज्यांच्याकडून चुका झाल्या असतील त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा होईल, अशी ग्वाही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने सध्या राज्यात एकच खळबळ उडाली असून यावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शुक्रवार, २३ मे रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यात कस्पटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वैष्णवीच्या वडीलांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असून हा निचपणाचा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Jamaat-e-Islami इस्लामी आंदोलन बांग्लादेश आणि हेफाजत-ए-इस्लाम यांनी सरकारने महिला व्यवहार सुधारणा आयोगाच्या अस्वीकार्य आणि वादग्रस्त शिफारशी त्वरित रद्द करण्याची मागणी केली. आयोगाने शनिवारी मुख्य सल्लागारांना ४३३ शिफारशींचा अहवाल सादर करण्यात आला.
( Compensation to family member if prisoner dies in custody ) राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास, त्याच्या वारसांना ‘राष्ट्रीय मानव अधिकार आयोगा’च्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंगळवार, दि. 15 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Vijay Vadettiwar काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
मोदी सरकारने काँग्रेसला पुन्हा एकदा तोफेच्या तोंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बोफोर्स’ तोफांच्या खरेदीतील दलालीचे हे प्रकरण इतक्या वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यामागे मोदी सरकारचा दीर्घकालीन डावपेच असू शकतो. या प्रकरणातील दलाली कोणाला आणि कशी देण्यात आली, याची नवी माहिती बाहेर आल्यास ती गांधी परिवारासाठी अडचणीची ठरू शकते, हे खरे!
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या हिंदू समाजाचे दैवत! मात्र, नेहरू-गांधी परिवार याला अपवाद असावे. छत्रपतींचे आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे या परिवाराला इतके वावडे की राहुल गांधींनी छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी चक्क महाराजांना श्रद्धांजली अर्पण करावी? अज्ञानी आहे, काही कळत नाही, असे म्हणावे, तर याच राहुल गांधींना परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याची तेवढी चांगलीच अक्कल आहे की! म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी श्रद्धाजंली वाहून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि करोडो शिवप्रेमींचा अपमानच
काँग्रेस पक्ष, गांधी घराणे आणि त्यांचे चीनप्रेम हे तसे परंपरागतच. गांधी परिवाराला अगदी चाचा नेहरूंपासून लाभलेला हा वारसाच. म्हणूनच एकीकडे नेहरूंच्या नेतृत्वात ‘हिंदी-चिनी भाई भाई’चा नारा भारतात गुंजत असताना, दुसरीकडे कुरापतखोर चीन लडाखमध्ये सैन्य घुसवून आपल्या मातृभूमीचे लचके तोडत होता. एवढेच नाही तर चीनने लडाखचा काही भूभाग गिळंकृत केल्यानंतरही, नेहरूंनी चिनी ड्रॅगनला फारसे गांभीर्याने घेतले नाही. कारण, ‘त्या जमिनीवर साधं गवताचं पातंही उगवत नाही,’ म्हणत चीनने हडपलेल्या लडाखमधील त्या भूभागाचे (अक्साई चीन) लष
(Ulhasnagar) उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या आणि कुटुंबियांच्या सांगण्यावरुन आपल्या एक महिन्याच्या बाळाला कळव्यातील एका कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय केवळ १० हजार रुपयात दत्तक दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बालिकेला दत्तक दिले असल्याची माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. यावेळी तिने संपूर्ण प्रकार सांगत बालिकेला पुन्हा देण्याची मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दि. ११ ते दि. १९ जानेवारी या कालावधीत ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. समाजाला (कुटुंबांना) रा. स्व. संघाची ओळख व्हावी, संघकार्याची (सेवाकार्यांची) माहिती मिळावी व प्रत्यक्ष संघ/सेवा कार्यातील त्यांचा सहभाग वाढीस लागावा, तसेच सेवा वस्तीतील कुटुंबांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेस पूरक सहकार्य ‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’तील ( Kutumb Prabodhan Gatividhi ) दोन उपक्रमांमधून मिळून त्यास चालना मिळावी, असा हेतू यामागे होता. तसेच ‘कुटुंब प्रबोधना’च्या वेगवेगळ्या आयामांच्या विस्ताराचाही
(CM Devendra Fadnavis) “राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसांत मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कल्याण : कल्याणमध्ये ( Kalyan Case ) मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी प्रांतवादाचा रंग देऊन परिस्थिती अधिक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, फिर्यादींच्या वकिलांनी या घटनेवर कठोर भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे.
(Kalyan) येथील योगीधाम परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना त्यांच्या शेजारी अखिलेश शुक्ला या अमराठी सरकारी अधिकाऱ्याने गुंड बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात तणावाचे वातावरण होते. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये निषेध व्यक्त केला.
नागपूर : कल्याण ( Kalyan ) येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली.
जन्मदरातील अभूतपूर्व घट कमी करण्यासाठी जपान सरकार निरनिराळे मार्ग अवलंबताना दिसते. तरुणांना कुटुंबनिर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जपान सरकारचे आता आपल्या कर्मचार्यांकरिता ‘चार दिवसांचा कार्य आठवडा’ लागू करण्याचा मानस असल्याचे समोर आले आहे.
‘थँक्सगिव्हिंग डे’ म्हणजे अमेरिका आणि कॅनडासारख्या काही पाश्चिमात्य देशात, त्यांच्या दैवतांप्रती, नातेवाईकांप्रती आणि एकंदरीत लाभलेल्या आयुष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी, पाश्चिमात्य देशांमध्ये ‘थँक्सगिव्हिंग डे’ साजरा केला जातो. यावर्षी दि. २८ नोव्हेंबर रोजी ‘थँक्सगिविंग डे’ साजरा झाला. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १७व्या शतकात झाली.
सत्ताधीश पदाची शपथ घेताना राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रकार्य यांना प्राथमिकता देण्याचे वचन जनतेला देत असतो. अशावेळी लोकशाहीतील महत्त्वाचे तत्त्व असलेल्या न्यायाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. मात्र, याठिकाणी राष्ट्रकार्य म्हणून बायडन यांनी कौटुंबिक निष्ठाच जपली, हेच खरे!
राष्ट्ररक्षणार्थ आणि हिंदुत्व समोर ठेवून प्रत्येकाने मतदानासाठी मैदानात उतरा : अग्रवाल कुटुंब (Malad East )
पैशापेक्षा माणुसकी जपणे महत्त्वाचे असल्याचे बाळकडू उमाकांत श्रीकृष्ण चौधरी ( Umakant Chaudhari ) यांना आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते. जीवनात अनेक चढउतार आले असतानाही त्यांनी पैशापेक्षा माणुसकी जपत संकटांना तोंड दिले. अशा परिस्थितीत ही त्यांनी चेहर्यावरील हसू कधी ढळू दिले नाही. त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश...
कोची : ‘वक्फ बोर्ड ( Waqf board ) सुधारणा विधेयका’ला मुस्लीम समाजाचा विरोध आहे. तर, हिंदू संघटनाही विधेयकाच्या बाजूने बोलत आहेत. देशभरात या विधेयकावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु, केरळमध्ये ‘वक्फ बोर्डा’च्या मनमानी कारभाराविरोधात एक हजार चर्चनी मोर्चा उघडला आहे. केरळमधील या चर्चच्या लोकांनी आरोप लावला आहे की, ‘वक्फ बोर्ड’ मोठ्या प्रमाणात गावकर्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहे. चर्चचा हा विरोध कोचीतील मुनंबम आणि चेराई गावातील जमीन वादावर आहे. वास्तविक, केरळच्या कोची जिल्ह्यात मुनंबम आणि चेराई नावा
पाकिस्तानातील (Pakistan) सिंध येथे एक हिंदू शेतकरी आणि त्याची तीन मुले मृतावस्थेत आढळून आली आहेत. उमरकोट जिल्ह्यातील पल्ली मोरजवळील आंब्याच्या बागेत एका ३२ वर्षाचे एका ३२ वर्षीय शेतकरी, चमन कोल्ही आणि त्याच्या तीन मुलांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. ८ वर्षांचा भागचंद्र, ६ वर्षांचा हिरो आणि ४ वर्षांची सोनी अशी या मुलांची नावे आहेत. ही घटना ४ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या घरी जाणार आहेत. सोमवारी यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.
गोव्यातील पेडणे गावचे रहिवासी असलेले मकबूल माळगिमनी हे गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सवाचा सण साजरा करत आहेत. मूळचे कर्नाटकातील हुबळीचे हे कुटुंब गोव्यात स्थायिक झालेले आहे. प्रत्येक वर्षी ते त्यांच्या कुटुंबीयांसह हा उत्सव मनोभावे साजरा करतात. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याच मुस्लीम समाजामधून विरोध करण्यात आला होता, परंतु मकबूल माळगिमनी यांनी गणेशोत्सव हा सर्वधर्मींयाचा सण आहे, असे आदरपूर्वक निक्षून सांगितले.
‘जनरल प्रॅक्टिस’ आणि ‘फॅमिली फिजिशियन’ ही देखील एक प्रकारची वैद्यकीय स्पेशालिटी आहे. ‘फॅमिली डॉक्टर’ला सर्व वैद्यकीय विषयांचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ‘हिस्ट्री’ व तपासणीवर अचूक निदान करण्याची क्षमता आवश्यक आहे. निदान पक्के झाल्यावर पुढील उपचार देणे सोपे जाते. आजारांच्या निदान व उपचार याशिवाय लसीकरण, कुटुंब नियोजन, साथीच्या आजारांचा नियंत्रणाबद्दल लोकशिक्षण, दुर्धर आजारात रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांस दिलासा देणे इत्यादी अनेक कामे चांगला ‘फॅमिली डॉक्टर’ करू शकतो.
कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व व ही व्यवस्था पार पाडीत असलेल्या जबाबदार्या पाहता, आपण सगळ्यांनीच ही व्यवस्था अधिक सक्षम, क्रियाशील व तिच्या सर्व भूमिका, जबाबदार्या पार पडण्यास सज्ज असेल, याचा प्रयत्न केला पाहिजे. आज समाजात मांडले जाणारे नको ते विमर्श, कुटुंबसंस्थेवर येऊन आदळणारी बाह्य संस्कृतीतील आव्हाने व भावी पिढी घडविताना काही प्रसंगी होणारे दुर्लक्ष यावर आपण काम करणे आज अनिवार्य आहे.
अभ्यासक हरिष मढीवाला व तत्वमसी दिक्षित यांनी आपल्या अभ्यासात प्रामुख्याने नमूद केल्यानुसार, सद्यस्थितीत एकूण उद्योग-व्यवसायांपैकी सुमारे ८५ टक्के उद्योग व मूलतः कौटुंबिक उद्योग वा कौटुंबिक व्यवसाय स्वरुपाचे असून, सध्या देशाच्या एकूण घरगुती उत्पादन म्हणजेच राष्ट्रीय जीडीपीच्या ६० टक्के ऐवढे योगदान या कौटुंबिक व्यवसायांद्वारे प्राप्त होत आहे. हा तपशील व आकडेवारी आर्थिक व्यवसायाच्या संदर्भात अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरते.
गेले काही दिवसांपासून डाबर कंपनीचे संस्थापक बर्मन कुटुंब व रेलिगेअर एंटरप्राईजच्या अध्यक्षा रश्मी सलूजा यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असतानाच रश्मी सलुजांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले आहे.रश्मी सलूजा व बर्मन कुटुंब यांच्यात रेलिगेअर कंपनीच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणावरून वाद झाला होता. यावर बोलताना,'मी पूर्णपणे स्वतःच्या कामावर आत्मविश्वास बाळगते. बर्मन कुटुंबांनी केलेल्या सगळ्या आरोपांचे खंडन करताना त्या म्हणाल्या, ' संचालक मंडळ व समभागधारकांचा आम्हाला पूर्ण प
बिहार ते मुंबई असा अभिनयासाठी प्रवास करणारे अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा आज ५५ वा वाढदिवस. मनोज वाजपेयी यांचा जन्म २३ एप्रिल १९६९ ला बिहारमध्ये झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मनोज यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी (Manoj Bajpayee) घरच्यांना आयएसचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे सांगितले होते. पण काही वर्षांनी मातीतला एक उत्तम नट तयार होत त्यांचे हे खोटे एका चांगल्या कारणासाठी हे मात्र सिद्ध झाले. चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारणारे मनोज वाजप
पीएमएलए प्राधिकरणाने काँग्रेसचे मुखपत्र नॅशनल हेराल्ड आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या जप्तीचे समर्थन केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोव्हेंबर २०२३ मध्ये नॅशनल हेराल्ड आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या ७५२ कोटींच्या मालमत्तेवर ही कारवाई केली होती. संबंधित मालमत्ता गुन्हेगारी मार्गाने संपादित केल्या गेल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
प्रभावशाली अभिनय, भाषेवरील उत्तम पकड असणारे अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या चित्रपट, ओटीटी ही दोन्ही माध्यमं गाजवत आहेत. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचा वेड लावले आहे. काही दिवसांपुर्वी एकीकडे त्यांच्या १०० व्या ‘भैयाजी’ चित्रपटाची (Manoj Bajpayee) घोषणा करण्यात आली तर दुसरीकडे बहुप्रतिक्षित ‘फॅमेली मॅन सीझन ३’ लवकरच येणार असल्याचे सांगितले. तर अशा या बहुआयामी अभिनेत्याला एका मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे.