’इनकम टॅक्स अॅक्ट १९६१’च्या ‘सेक्शन ८०सी’ नुसार गुंतवणूकदारांना ‘टॅक्स सेव्हिंग’साठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’ हा पर्याय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होताना दिसतो. खासकरून गुंतवणूक करताना ’इक्विटी’मध्ये होणार्या वाढीसोबत ‘टॅक्स सेव्हिंग’चाही विचार प्रामुख्याने करतात. मागील दोन वर्षांत ’इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’ श्रेणीमध्ये २२ लाख ‘फोलिओ’ जोडले आहेत. या श्रेणीतील ‘फोलिओ’मध्ये डिसेंबर २०२० पासून डिसेंबर २०२२ पर्यंत १.२३ कोटींवरुन १.४६ कोटींपर्यंत वाढ झाली.
Read More