गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या रेडिओ क्लब जेट्टीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, १५ जुलै रोजी याबद्दलची माहिती दिली.
Read More
गेटवे ऑफ इंडियाजवळील २२९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला काही अटींसह मुंबई उच्च न्यायालयाने परावानगी दिली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मंगळवार, दि.१५ जुलै रोजी ही मंजूरी दिली. ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने ही याचिका दाखल केली होती. जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाचा आराखडा, जागेची निवड, मंजूरी प्रक्रीया, आणि हरकती न मागवल्याचा मुद्दा या याचिकेत उपस्थित केला होता
"मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे आणि मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसतील", असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी व्यक्त केले. ते म्हणाले, "मला हिंदूंनी मतदान केले आहे, त्यामुळे मी त्यांचीच बाजू घेईन. हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे."
गेटवे ऑफ इंडियाजवळ उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधांच्या प्रकल्पावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, दि.२७ रोजी नकार दिला आहे. सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, “शहरात काहीतरी चांगले घडते आहे, हे लक्षात घेता प्रकल्पाला रोखणे उचित ठरणार नाही." या प्रकल्पासंबंधी याचिका मुंबई उच्च न्यायालयानेही जनहिताचा प्रकल्प ठरवून यापूर्वी ७ मे,२०२५ रोजी फेटाळली होती. २२९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा असल्याचे
( Nitesh Rane on Temporary boat facility at Jetty No 5 of Gateway of India ) गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’कडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात 49 बोटींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, या मार्गाचा वापर करणार्या बोटींमधून वाहतूक करणार्या प्रत्येक प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्र
५० लोकांची क्षमता असलेले ॲॅम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी सोयीसुविधांसह जेटी असणार आहे. रेडिओ क्लब येथील प्रवासी जेटी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि.१४ रोजी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
विक्रोळी आणि ट्रॉम्बे भागातील कोळी बांधवांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ट्रॉम्बे जेट्टी विकसित करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपयुक्त शर्वरी रणदिवे यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सागरी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतून जलमार्गाने एलिफंटा व अलिबागला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई मेरीटाईम बोर्डाने खुशखबर दिली आहे. ही खुशखबर नेमकी काय? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून
अलिबाग व एलिफंटा जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवी जेट्टी
मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात रविवारपासून २५ रुपयांची वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामासाठी ही दरवाढ केली जाते. यामुळे सागरी प्रवास दरवर्षीप्रमाणे महागणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ केली जाते. मागील वर्षीही पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.
गुहागर किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक घरटी
इंडोनेशियातील जकार्ताहून पांगल पिनांग शहराच्या दिशेने जात असलेले लायन एअरचे विमान सोमवारी सकाळी समुद्रात कोसळले. विमानातून दोन पायलटसह १८९ प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.