विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणार्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणार्या अनंत बेदरकर यांच्याविषयी...
Read More
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम ) ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन, रमण प्रीत यांनी पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या अनौपचारिक पत्रकार संवाद परिषदेत बोलताना एव्हिएशन मॅनेजमेंट आणि एव्हिएशन इंजिनीअरिंग , तसेच सेमीकंडक्टर डिझाइन या अत्याधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश असलेले अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करणार असल्याची घोषणाही केली.
भारताला सोमवारी एलसीए मार्क १ए लढाऊ विमान कार्यक्रमासाठी अमेरिकेकडून दुसरे जीई-४०४ इंजिन मिळाले आहे, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाची दोन्ही इंजिने उड्डाणानंतर काही सेकंदांच्या आत बंद पडल्याने अपघात झाला, असे अपघात तपासाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टे पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त (१) विक्रम कुमार यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पस्थळास भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला.
आपल्या आवडीचे क्षेत्र निवडत मिळालेल्या अनुभवातून स्वतःचे स्टार्टअप सुरू करत यशस्वी वाटचाल करणार्या पालघरमधील ‘सिम्युल मोशन स्टुडिओ कंपनी’चे संस्थापक सौरभ राऊत यांच्याविषयी...
मुंबईच्या सायन भागात राहणाऱ्या अक्षय रिडलाण या तरुण अभियंत्याने एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. त्याने तयार केलेल्या 'मिलाप सेतु' या प्लॅटफॉर्ममुळे हरवलेले लोक त्यांच्या कुटुंबांपर्यंत परत पोहोचू शकतात. ही योजना 'प्रोजेक्ट चेतना' अंतर्गत राबवली जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल . पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात अडच
पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मे रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाहोद येथे स्थापन झालेल्या रेल्वे उत्पादन युनिटमध्ये उत्पादित केलेल्या पहिल्या ९ हजार अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन करतील. पीपीपी मॉडेल अंतर्गत स्थापन झालेला दाहोद येथील रेल्वे कारखाना पुढील १० वर्षांत १,२०० इंजिन तयार करणार आहे, ज्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्याची योजना आहे. १०० टक्के मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लवकरच ही लोकोमोटिव्ह इंजिने पूर्णपणे तयार केली जातील.
(Sanjay Patil appointed as Chief Engineer of Mahavitaran Bhandup) महावितरणच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात नवीकरणीय उर्जा विभागात मुख्य अभियंतापदी कार्यरत असलेले श्री.संजय पाटील यांची बदली भांडूप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता पदी करण्यात आली आहे. आज मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी श्री. पाटील यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. ७) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या २८ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार, २२ मार्च रोजी हमीद इंजिनयर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो औरंगजेब समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
Holi पाकिस्तानातील कराचीतील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने कॅम्पसमध्ये हिंदूंचा होळी सण साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापक वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या आवारामध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती. अनेक हिंदू विद्यार्थ्यांविरुद्ध एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला.
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
नुकतीच म्हणजे दि. ३ फेब्रुवारी रोजी भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाची शंभरी गाठली. सन १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावल्यापासून ते आधुनिक विद्युतीकरणापर्यंत रेल्वे वाहतुकीने देशाच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या आजवरच्या प्रवासात मुंबईचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मुंबईकर आणि मुंबई लोकल हे नाते तर सर्वश्रुत. त्यामुळे भारतीय रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील मुंबई लोकलच्या प्रगतीचा आढावा घेणारा लेख...
आरोग्यदूत, कवयित्री आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सेवा देणार्या एका नामांकित कंपनीच्या संस्थापक कामेश्वरी कुलकर्णी ( Kameshwari Kulkarni ) यांच्या कर्तृत्वाचा आलेख...
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या झंझावातापुढे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला आहे. मनसेच्या पक्ष मान्यतेबरोबरच कायमस्वरुपी मिळालेले रेल्वे इंजिनही यार्डात जमा करण्याची वेळ राज ठाकरेंवर येण्याची शक्यता आहे.
गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,
ठाणे : “भारताशिवाय महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राशिवाय भारत नाही. असे असताना आज काही शक्ती महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत. अशावेळी महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी आवर्जून मतदान करा,” असे आवाहन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी केले.
( Double Engine Government ) पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वदेश, स्वभुषा, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक असून सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या इंजिनवर कवच प्रणाली बसविण्याची काम भारतीय रेल्वे मार्फत करण्यात येत आहे. सुमारे १० हजार लोको इंजिनवर ही प्रणाली बसविली जाणार असून त्यापैकी मध्य रेल्वे ७८६ लोकोवर बसविणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन पारंपरिक नोकरीची वाट न धरता, संगीतासाठीच आपले अवघे जीवन समर्पित करणार्या संगीतकार समीर सप्तीसकर यांच्याविषयी...
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणारे रस्ते प्रकल्प दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्तापूर्ण होण्यासाठी महानगरपालिका अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी देखील अभियंत्यांनी सजग राहिले पाहिजे. कॉंक्रिट रस्त्याचा आराखडा, तंत्रज्ञान, गुणवत्ता चाचण्या, हवामान यांसह कॉंक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना या विषयी महानगरपालिका अभियंत्यांनी कालानुरूप प्रशिक्षण घेऊन अद्ययावत राहिले पाहिजे. गुणवत्ता नियंत्रणासाठी अधिक सक्षमपण
डीईई डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेड (DEE Development Engineers Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ जूनपासून दाखल होणार आहे.DEE Piping System कंपनी आयपीओतून १.६ कोटीं समभाग (Shares) विक्रीसाठी काढणार आहे.या पब्लिक इश्यूचे मूल्य ३२५ कोटींच्या घरात असणार आहे. हा आयपीओ ( IPO) १९ जून ते २१ जून काळात बाजारात येईल. कंपनीच्या समभागाचे वाटप २४ जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले इंजीनियर रशीद या नावाने प्रसिद्ध असलेल्या रशीद शेख याने संसद सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी अंतरिम जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज केला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) दाखल केलेल्या खटल्यात दहशतवाद्याला वित्तपुरवठा केल्याच्या आरोपावरून राशिदला दि. ९ ऑगस्ट २०१९ पासून तिहार तुरुंगात आहे.
सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. पुस्तके, नाटक, अभिवाचन अशा विविध माध्यमांतून सावरकरांचे विचार बहुश्रुत झाले. पण, आधुनिक पिढीपर्यंत पारंपरिक पद्धतीने सावरकरांचे जाज्वल्य विचार मांडण्याऐवजी, त्यांना आवडेल त्याच प्रकारात ते सादर करण्याचा प्रयत्न करणार्या सावरकरप्रेमी कलाकार प्रांजल अक्कलकोटकर यांचे हे अनुभवचित्रण...
विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात अभियांत्रिकी कंपन्यांनी आर्थिक बोली जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे मंगळवार दि.२२ मे रोजी सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे
मुंबईच्या मध्यवर्ती भागात उद्या पाणीबाणी
'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया(BECIL)' अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक व पात्र उमेदवारांना विविध पदांकरिता अर्ज करता येणार आहे. 'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया'च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या भरतीसंदर्भात शैक्षणिक पात्रता, पद, वेतनमान व वयोमर्यादाबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता पदी उदय बोरवणकर यांनी नियुक्ती करण्यात अली आहे. बुधवार, दि. २ मे रोजी बोरवणकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (IRSME) च्या १९८८च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत.
पेशाने सिव्हिल इंजिनिअर असणारे; पण इकोफ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक घरे बांधणार्या, सांगलीतील प्रसन्न कुलकर्णी यांचा हा प्रवास...
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत मुंबई विद्यापीठाला पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी रुपये २० कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करून पायाभूत सुविंधाचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पी-एम उषा अंतर्गत देशातील विविध उच्च शिक्षण संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाचे डिजिटल लाँचिंग केले जाणार असून, मुंबई विद्यापीठा
'एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड(एआयईएसएल) अंतर्गत भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीद्वारे एआयईएसएल अंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'एआयईएसएल'मधील एकूण १०० रिक्त जागांसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. अदिती भारद्वाज असे या पीडित महिलेचे नाव आहे. ती काही काळ प्रियकर मोहम्मद अलीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अलीने पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव अजिया फातिमा असे ठेवले आणि ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने आपल्याच धर्मातील महिलेशी लग्न केले, असे सांगितले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यां. व वि.) यांची सुमारे ४०० पदे आणि दुय्यम अभियंता (स्थापत्य, यां. व वि.) यांची सुमारे ३५० पदे अशी एकूण ७५० पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती तसेच पदोन्नतीमुळेदेखील रिक्तन पदात वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेतील कार्यरत अभियंत्यांवर रिक्त पदांचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांना मानसिक ताणतणावास सामोरे जावे लागत आहे, असा आरोप करत रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सरचिटणीस यशवंत धुरी यां
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे कळविण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार, दि.२५ जानेवारी रोजी भांडुप पश्चिमेकडील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्याजवळ १,८०० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीमधे गळती झाल्याने महानगरपालिकेमार्फत तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे.
येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या सोहळ्याची भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येत राम मंदिरावर १६१ फूट उंचीवर धर्मध्वज फडकवला जाणार आहे. मंदिराची उंची १६१ फूट इतकी आहे. त्यावर ४४ फूट उंच ध्वज फडकवला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने यांत्रिकी स्वच्छ पर्यावरण प्रणालीचा राष्ट्रीय कार्यक्रम ‘नमस्ते’ (NAMASTE – National Action for Mechanized Sanitation Ecosystem) अंतर्गत ‘नमस्ते योजनेकरिता वैयक्तिक माहिती शिबीर (Profiling Camp for Namaste Scheme)’ उपक्रमाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाला.
देशातील रेल्वे वाहतूक जलद व्हावी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ही तांत्रिक प्रगती साधत असताना 'मेक इन इंडिया' तत्वावर भारतीय उपकरण निर्मितीवर देखील भर देण्यात येत आहे.
योग्य वेळी भाकरी न फिरविल्यास, जशी ती करपते, तसेच योग्य वेळी राजकारणात नव्या पिढीस सक्रिय न केल्यास, पक्षाची ‘काँग्रेस’ होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे राजकारणात नव्या पिढीस कसे सक्रिय करायचे, हे भारतात भाजप वगळता अन्य एकाही पक्षास सहजपणे जमत नाही, असे म्हणावे लागेल.
महावितरणच्या डोंबिवली विभागात गेल्या दोन महिन्यात २१० जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. ‘पॉवर ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांसह आवश्यक साहित्याचे वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे. नवीन वीज जोडणीसाठी कॉल किंवा संदेश आल्यानंतर कर्मचारी वाहनासह नवीन ग्राहकापर्यंत पोहचतात व सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ नवीन कनेक्शन देत आहेत.
सप्टेंबर २०२३ मध्ये ’युनेस्को’ने आपली जागतिक वारसा स्थळांची ताजी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतातील दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे बंगालमधील शांतिनिकेतन आणि दुसरं म्हणजे कर्नाटकातील होयसळ राजांनी बांधलेली अप्रतिम वास्तुकलेचे नमुने असलेली तीन मंदिरं.
'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 'बीईसीआयएल'कडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अ४ज मागविण्यात येत आहेत. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडने (BECIL) येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
महापालिका जी/उत्तर विभागात न केलेल्या कामाचे पैसे दिल्यामुळे माहिती अधिकाराच्या उत्तरात खोटे पुरावे तयार करुन सादर केल्याबद्दल अमोल गावित, सहाय्यक अभियंता अमोल गावित यांचेवर भादंसं १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी दादर येथील रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी परवानगी मागितली आहे
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पहिल्या महिला अभियंता म्हणून रोहिणी लोकरे यांनी आपल्या कामातून समाजात एक विशेष स्थान मिळविले आहे. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
एक कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या अहमदनगर एमआयडीसीतील सहायक अभियंत्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. एसीबीने अटक केलेल्या संशयिताचे नाव अमित किशोर गायकवाड असे आहे. तर धुळे एमआयडीसीतला कार्यकारी अभियंता गणेश वाघ (तत्कालीन नेमणूक अहमदनगर एमआयडीसी) हा फरार आहे.
९०च्या दशकात ‘डीएड’ करायचे व शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची, अशा काळात त्यांनी वेगळी वाट निवडत, कलाक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया वर्षा पवार यांच्याविषयी...
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी ABES कॉलेजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये स्टेजवर उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याने जय श्री रामचा नारा लावला तेव्हा ममता गौतम नावाच्या महिला प्राध्यापिकेने त्याच्याशी गैरवर्तन तर केले आणि स्टेजवरून खाली उतरवले. याप्रकरणी हिंदू संघटनांच्या विरोधानंतर आता आरोपी महिला प्राध्यापकाने तिच्या बचावासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये त्या स्वत:ला सनातनी असल्याचे सांगून जय श्री रामचा नाराही देताना दिसल्या. महाविद्यालय व्यवस्थापनाने प्राध्याप