जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे आवश्यक असलेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले आहे
Read More
बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ प्रक्रिया हा निवडणूक आयोगाने घेतलेला नियमानुकूल आणि व्यवस्थात्मक निर्णय आहे. मात्र, त्याभोवती विरोधकांकडून जो राजकीय आरोपांचा धुरळा उडवला जात आहे, तो जाणीवपूर्वक असुरक्षित वातावरण निर्मितीच्या योजनेचा भाग ठरावा. याच प्रक्रियेची अंमलबजावणी संपूर्ण भारतभर करण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा द्य
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीसंदर्भात मतदारांची बूथ निहाय्य किंवा विशेष गहन पुनरावृत्ती(Special Intensive Revision) करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिक मंगळवार, दि. ८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आठ विरोधी पक्षांनी दाखल केली आहे.
०२४मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार, दि. २५ जून रोजी फेटाळून लावली. चेतन अहिरे यांनी वंचित पक्षाचे अध्यक्ष वकिल प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५ लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, यासाठी त्यांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार नसून, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ही जबाबदारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दोन तासांत ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचा संशय व्यक्त करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या आरोपांची मुद्देसूद माहिती देत, स्पष्ट शब्दांत खंडन केले असून, "निवडणूक यंत्रणा कायद्याच्या चौकटीत आणि पूर्ण पारदर्शकतेने काम करते. अपयश पचवता न आल्याने काही नेते निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन करत आहेत," अशी टिपण्णी केली आहे.
(Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्प
'भारतीय निवडणूक आयोग’ ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची एक अत्यंत विश्वासार्ह आणि संविधानिक संस्था आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगाची भूमिका केवळ निवडणुका पार पाडण्यापुरती मर्यादित नसून, देशाच्या लोकशाही मूल्यांची रक्षण करणारी ती आधारशिला आहे. मात्र, कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या संस्थेवर जे आरोप केले आहेत, ते अत्यंत घातक आहेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर ‘अपयशी आणि निष्क्रिय’ अशी टिप्पणी करताना जे राजकारण केले, ते नेमके विरोधकांची मानसिकता दर्शवते.
( Hearing on Election Commissioner selection on April 16 ) मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १६ एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे.
(Maharashtra Legislative Council Elections 2025) राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतातील लोकशाहीला ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ म्हणून गौरवले जाते. मात्र, सध्या काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकशाही संस्थांबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. लोकशाहीचा आत्मा असलेल्या संस्थांवर संशयाचे ढग निर्माण करणे, त्यांचा हेतुपुरस्सर अपमान करणे आणि त्यांची विश्वासार्हता धूसर करण्याचा प्रयत्न करणे, हीच काँग्रेसची नवी राजकीय नीती आहे
काँग्रेसी युवराज राहुल गांधी, ठाकरे आणि पवार कंपनीने एकत्र येत, पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’ तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली. यापूर्वी या तिघांनी वैयक्तिकपणे हेच आरोप वारंवार केले होते आणि कोणीही दखल न घेतल्याने, एकत्र येत त्यांनी ते पुन्हा एकदा त्याच आरोपांचा पाढा वाचला. पण, म्हणतात ना तेरड्याचा रंग तीन दिवस, त्याप्रमाणे मविआच्या असल्या उथळ आरोपांनाही आता जनता गांभीर्याने घेणे नाहीच!
Rahul Gandhi राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. महायुतीने एक हाती विजय मिळवत महाविकास आघाडीला पाणी पाजले. त्यानंतर दिल्ली विधानसभा मतदारसंघात काही एक्झिट पोलने भाजपच विजयी होणार असल्याचा दावा केला. दिल्लीतील पराभव लक्षात घेता आता राहुल गांधी यांनी राज्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.
दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्याने निकालाच्या दिवशी काय बोलावे यासाठी राहुल गांधींची प्रॅक्टिस सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Delhi Assembly Election 2025 आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये गलगितुरा रंगला आहे. काही दिवसांआधी भाजपचे आपले आश्वासनपर पत्र जारी केले. त्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही पत्रक जारी केले. त्या पत्रकामध्ये त्यांनी यमुना नदी साफ करण्याचे आश्वासन दिले. हे अश्वासन याआधी अनेकदा दिले होते. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा भाजप सरकारच पाण्यात विष मिसळत असल्याने नदीचे पात्र साफ होत नसल्याचा निरर्थक तर्क लावला आहे.
(Dinesh Waghmare) राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले.
संजय राऊत यांनी केवळ पक्षनेतृत्वाच्या आशीर्वादामुळे आजवर राज्यसभेचे सदस्यत्व भूषविले आहे. पण, आपल्याला मिळालेले हे पद म्हणजे आपल्या (नसलेल्या) कर्तृत्वाची पावती असल्याच्या थाटात संजय राऊत हे भंपक, बिनबुडाची आणि बदनामीकारक वक्तव्ये करीत सुटले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादामुळे सत्तेची मलई खाण्याची संधी मिळालेल्या या बोक्याने महापालिका निवडणूक लढविण्याचे धारिष्ट्य दाखविल्यास त्यांना जनतेत आपले खरे स्थान काय आहे, ते दिसून येईल. महापालिका निवडणुकीतही त्यांचे डिपॉझिटही जप्त होईल, अशा राऊत यांनी भाजप आणि मोदी
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी पत्रकारपरिषदेत केली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
(Election Commission of India) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदानाबाबतचे गैरसमज दूर केले आहेत. काँग्रेस पक्षाला दिलेल्या सविस्तर प्रतिसादात आयोगाने मतदारांची नोंदणी अथवा नावे हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदारांची नोंद आणि मतदानाच्या टक्केवारीबाबत काँग्रेसच्या ( Congress ) भीतीचे निराकरण करण्यासाठी, निवडणूक आयोगाने त्यांच्या शिष्टमंडळाला ३ डिसेंबरला भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की ते काँग्रेसच्या सर्व न्याय्य चिंतांचा आढावा घेईल आणि पक्षाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून लेखी उत्तर देईल.
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thacheray ) यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरविल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रवक्ते दिलीप अलोणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सज्जाद नोमानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
(Kirit Somaiya) सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
(Women Controlled Polling Stations) केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंदा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा, हा यामागचा उद्देश आहे.
बॅग तपासणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली असून अप्रत्यक्षपणे त्यांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Uddhav Thackeray विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून आपली भूमिका बजावण्याचे काम केले. शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाने तपासली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मतदारसंघात गेल्याने ते चांगलेच संतापले आहेत. निवडणूक आयोगाला आपले काम करण्यापासून त्यांनी विरोध केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : ( Municipal Commissioner ) मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकार्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सुटी देणे संबंधित नियोक्तांसाठी बंधनकारक राहील. या नियमांचे पालन न करणा़र्यां नियोक्तांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण
( Keshav Upadhye ) महिलांबद्दल बेताल, अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि छत्रपतींच्या गादीचा कायमच अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि महविकास आघाडीच्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील लढतींचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून २८८ मतदारसंघात ४ हजार, १४० उमेदवार ( Candidate ) रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २८८ मतदारसंघात दाखल केलेल्या एकूण उमेदवारी अर्जांपैकी ७ हजार, ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २ हजार, ९३८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे अंतिमतः राज्यात एकूण ४ हजार, १४० उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
( Sunil Raut ) विक्रोळी मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले.
Election Commission लोकसभा निवडणुकीनंतर विविध राजकिय पक्षाकडून दुबार मतदानाच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी सहा विधानसभा क्षेत्रातील तब्बल १३ हजार ४३० दुबार मतदारांची नावे वगळण्याच्या सुचना संबधीत अधिकाऱ्यांना दिल्याचे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे दुबार मतदारांचा निवडणुक यंत्रणेला एक प्रकारे ताप झाला आहे.
( ECI on BVA Symbol Whistle )राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता ४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे.
( Trumpet Symbol ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 'ट्रम्पेट' या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरीत नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असेच ठेवले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे.
( Assembly Election 2024) विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दि.१९ ऑक्टोबर ही शेवटची संधी आहे. ज्यांचे नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट झालेले नाही त्यांनी आजच नाव नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन ठाणे जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी!’ म्हणत दारोदारी फिरणार्या शरद पवार गटाला ‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने झटका दिला आहे. ‘तुतारी’ चिन्हासारखे दिसणारे ‘पिपाणी’ हे चिन्ह यादीतून हटवण्याची त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. आता हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार असल्यामुळे ‘तुतारी’ची ‘पिपाणी’ वाजणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्हावर बंदी आणण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणूकीत आम्हाला पिपाणी चिन्हाचा फटका बसला आहे, असे सांगत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीले होते. पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. परंतू, आयोगाने पिपाणी चिन्ह हटवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता विधानसभेतही तुतारी चिन्ह विरुद्ध पिपाणी हा संभ्रम कायम राहणार आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५४.११टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
(Election Commission )लोकसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेवेळी मुंबईतील काही मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले होते. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात २१८ अतिरिक्त केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ इतकी होईल.
शरद पवार गटाच्या 'तुतारी' चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवले असून शरद पवार गटाचं तुतारी चिन्ह कायम ठेवलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम छेडछाडीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अर्ज केलेल्या असंतुष्ट उमेदवारांना निवडणूक आयोगाने अनेक पर्याय दिले आहेत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, लोकसभेच्या आठ उमेदवारांनी आणि विधानसभेच्या तीन उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या मेमरी/मायक्रोकंट्रोलरच्या फेर तपासणीसाठी अर्ज केला होता.
लोकसभा निवडणूकीत आम्हाला पिपाणी चिन्हाचा फटका बसला आहे, असे सांगत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रशासित असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निवडणुक आयोगाने दि. ७ जून रोजी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आयोगाने केंद्रशासित प्रदेशात निवडणुक चिन्ह वाटपासाठी नोंदणीकृत गैर-मान्यताप्राप्त पक्षांकडून अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. अलीकडेच सीईसी राजीव कुमार यांनी स्पष्ट केले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाला केंद्रशासित प्रदेशात या वर्षी ऑक्टोब
लोकसभा निवडणूकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार आहे. निवडणूकीच्या दिवशी पत्रकार परिषद घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. उद्धव ठाकरे कायद्याला अपवाद ठरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे. मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला ठाकरेंची पत्रकार परिषद तपासण्याबाबत पत्र लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. २४ मे २९२४ मतदानाच्या ४८ तासांच्या आत एकूण मतांची संख्या मागणाऱ्या याचिकेवर निवडणूक आयोगाला कोणताही आदेश देण्यास नकार दिला. न्यायालय लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्यास सांगितले आहे.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्सची (एडीआर) याचिका तहकुब केली आहे. त्यावर आता उन्हाळी सुटीनंतर सुनावणी होईल. लोकसभेचे मतदान झाल्यानंतर ४८ तासांच्या आत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी संकेतस्थळावर द्यावी, अशी एडीएआर या एनजीओची मागणी आहे.
राज्यात सोमवारी लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान पडले. मात्र, यादरम्यान, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.