यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' वितरीत करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या 'आनंदाचा शिधा' संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. 'आनंदाचा शिधा' संचाचे वाटप दि. १५ ऑगस्ट २०२४ ते दि. १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.
Read More
तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव-पाड्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून गणेश मंडळाचे कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीचे देखावे तयार करण्यासाठी मेहनत करतांना दिसत आहेत. मंगळवार (ता.१९) रोजी गणेश चतुर्थी असून ग्रामीण भागात गणेशोगणेशोत्वानिमीत्त जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक सणांचीही मंदियाळी आहे. या महिन्यात गणेश चतुर्थी, गोपाळकाला, पोळा यांसारखे अनेक सण साजरे केले जाणार आहेत. उपवास आणि सणांच्या दृष्टीने सप्टेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.