जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत म्हाडाने गृहप्रकल्प परिसरात दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या झाडांची निगा व देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन सुनिश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम 'म्हाडा'चे उपाध्यक्ष
Read More
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'म्हाडा लोकशाही दिन' म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता मंगळवार, दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी संगणकीय सोडत पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे सकाळी ०९.०० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मालकीच्या कोणत्याही जमिनीवर एखाद्या व्यक्तीस नवीन किंवा वाढीव पक्के बांधकाम करण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे पूर्व मुख्यालयातील तळ मजल्यावर असणार्या बांधकाम परवानगी कक्षात विहीत कागदपत्र दाखल करून बांधकामाची परवानगी घेणे अनिवार्य आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या सामान्य माणसाला अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधांची गरज पूर्ण करणार्या सरकारला जनाधार मिळत असतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या सुरक्षेबरोबरच सामाजिक सुरक्षेला दिलेले प्राधान्य विचारात घेता राज्य सरकारची वाटचालदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून सुरू असल्यानेच देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२२ पर्यंत पक्के घर असावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ ‘सर्वांसाठी घरे’ ही योज