आज लढले जाणारे युद्ध हे उद्याच्या अर्थात नव्या तंत्रज्ञानाने लढण्याची गरज आहे, असे सांगून भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी भारताने आपल्या संरक्षण क्षमतांचे आधुनिकीकरण करण्याची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
Read More
नक्षलवादी संघटना यूएलएफए(आय) (United Liberation Front of Assam-Independent) च्या म्यानमारमधील काही शिबीरांवर भारतीय सैन्याने ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाल्याचा आणि १९ जण जखमी झाल्याचा दावा यूएलएफएने केला आहे.
रविवारच्या चर्चेला आज खास रंगत आली होती. जयंतराव, आदित्य, मंगल काकू आणि मित्रमंडळी एकत्र आले होते. यावेळी गणपत पाटील, जयंतरावांचे शालेय मित्र आणि जालना जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरीसुद्धा हजर होते. "आदित्य, तुमचं हे ‘एआय’ फार भारी वाटतं. पण आमच्यासारख्या शेतकर्यांसाठी ते काय कामाचं?” गणपत काकांनी विचारलं. "काका, ‘एआय’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ही तंत्रज्ञानाची अशी ताकद आहे, जी सल्लागारासारखी तुमच्या निर्णयांना बळ देते,” आदित्य म्हणाला.
विशेष प्रतिनिधी पॅरिस येथे सध्या सुरू असलेल्या एअर शो २०२५ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ अत्याधुनिक मानवरहित वाहने (युएव्ही), प्रगत एव्हियोनिक्स आणि स्वदेशी संरक्षण प्रणालींसह स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन संपूर्ण जगासमोर करण्यास सज्ज आहे.
रशियाने युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. ४७९ ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रे रशियाने एका रात्रीत युक्रेनवर डागली आहेत. आतापर्यंतचा एका रात्रीतील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
(Russia-Ukraine War) रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रविवार, दि. १ जून रोजी युक्रेनने 'ऑपरेशन स्पायडरवेब' अंतर्गत रशियातील विविध लष्करी हवाई तळांवर एक अत्यंत सुनियोजित आणि यशस्वी ड्रोन हल्ला केला. हा युक्रेनने केलेला आजवरचा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. यावेळी युक्रेनने ‘ट्रोजन हॉर्स’ रणनीती वापरून ट्रक आणि ड्रोनने रशियावर हवाई हल्ला केला.
युक्रेनने रशियाच्या बॉम्बर्सवर ड्रोनचा हल्ला केला. यात रशियाचे मोठेच नुकसान झाले. ड्रोनचा वापर युद्धात किती घातक ठरू शकतो, याचे दर्शन याआधीही अनेकदा झाले होते. युक्रेनच्या हल्ल्यानंतर त्याचा प्रभाव अधिक अधोरेखित झाला. युक्रेनने केलेल्या हल्ल्याने सारेच जग आज स्तब्ध आहे. आधुनिक युद्धातील ‘ड्रोन’पर्वाची ही खरी सुरुवात आहे...
विशेष प्रतिनिधी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सांबा सेक्टरमधील एका चौकीचे नाव "सिंदूर" असे ठेवण्याचा आणि १० मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या जवानांच्या नावावर दोन चौक्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती बीएसएफचे पोलिस महानिरिक्षक (आयजी) शशांक आनंद यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे.
रशियाने २४ मे २०२५ रोजी युक्रेनची राजधानी कीववर मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात किमान १५ नागरिक जखमी झाले आहेत. कीवच्या सहा जिल्ह्यांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि अनेक इमारतींना नुकसान झाले.
(Four Children Killed in Pakistani Drone Strike in North Waziristan) पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली गावात सोमवारी २० मे रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर दोन महिन्यांच्या बाळासह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
७ मे २०२५ रोजी झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये इस्रोने भारतीय संरक्षण यंत्रणेला निर्णायक आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी यशस्वीपणे निकमी केले. ह्या मागे इस्रोचा मोठा वाटा आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तिसऱ्या दणक्यात भारतीय शहरांवर पाकिस्तानतर्फे डागण्यात आलेले तुर्की बनावटीचे जवळपास ३०० ते ४०० ड्रोन आपल्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्र प्रणालीने नष्ट केले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण मंत्र्यांसह सैन्यदलप्रमुखांनी भारताच्या कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे.
धारावीतली सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावी, असे धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या (डीआरपी) अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. २०२३ साली झालेल्या ड्रोन सर्वेक्षणालाच आधारभूत मानून सध्याच्या भाडेकरूंची ओळख पटविली जाणार आहे. तसेच, याच सर्वेक्षणाद्वारे धारावी अंतर्गत परिसरातील (डीएनए) मोकळ्या जागेची नोंद केली जाणार आहे. या सर्वेक्षणानंतर केलेले कोणतेही नवीन बांधकाम किंवा बांधकामाचा विस्तार हे अनधिकृत मानले जाईल आणि त्यांना पुनर्विकासाच्या लाभांसाठी अपात्र ठरवले जाईल.
नवी दिल्ली : तंत्रज्ञानामुळे मूलभूतपणे युद्धाच्या पद्धती आणि साधने बदलत आहेत. त्यानुसार भारतही सज्ज असून असून जगाचे ‘ड्रोन हब’ ( Drone hub ) बनण्याक़डे भारताची वाटचाल आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले आहे.
मोदी सरकारने भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले असून, त्याच अंतर्गत स्पेन आणि अमेरिकेसोबतही नुकतेच दोन करार करण्यात आले. पहिला म्हणजे, स्पेनच्या सहकार्याने एअरबस निर्मिती प्रकल्प आणि दुसरा भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला ‘एमक्यू-९बी’ ड्रोन खरेदी करार. त्याविषयी सविस्तर...
ड्रोन्सने केवळ युद्धभूमीतच नव्हे, तर कृषीपासून ते संशोधन अशा बहुतांश क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली. भारतातही आज ड्रोन्सचा सक्रिय वापर होताना दिसतो. मोदी सरकारने तर ‘ड्रोन दीदी’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण आणि महिला सक्षमीकरणाचाही हेतू साध्य केला. त्यानिमित्ताने भारतातील ड्रोन क्षेत्राच्या विकासाभिमुख प्रगतीचा घेतलेला हा आढावा...
हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने, रविवारी हैफा शहरातील इस्रायलच्या लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात, ४ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला असून, तब्बल ७० जणं जखमी झाल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
Israel vs Hezbollah War इस्त्रायलने २६ सप्टेंबर रोजी दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ला केला. यावेळी हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा ड्रोन युनिट प्रमुख आणि कमांडर मोहम्मद सरूर याला ठार मारण्यात इस्त्रायलला यश आले आहे. याघटनेचा इस्त्रायलच्या लष्करांनी दुजोरा देण्याचे काम केले आहे. तर दुसरीकडे लेबनॉन येथे युद्ध थांबवण्यास नकार दिल्याचा निर्णय इस्त्रायलने घेतला आहे.
अमेरिकन नौदलाचे 'मंटा रे' ड्रोन सॅटेलाईटवर दिसल्याने नवी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अमेरिकन सागरी ड्रोन कॅलिफोर्नियाच्या पोर्ट ह्युनेमे येथील नौदल तळावर दिसले होते. विशेष म्हणजे मंटा रे ड्रोनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
दक्षिण आशियातील कुरिअर आणि एकात्मिक एक्सप्रेस पॅकेज वितरण कंपनी ब्लू डार्ट’ने ड्रोन तंत्रज्ञानातील अग्रगण्य नाव, स्काय एअरच्या साथीने यशस्वीरित्या ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू केली. ही महत्त्वपूर्ण घडामोड स्वच्छ तसेच अधिक कार्यक्षम डिलिव्हरी पर्याय अधोरेखित करणारी आहे. सप्टेंबर 2021 मध्ये हैदराबादच्या विकाराबाद येथील त्यांच्या अग्रगण्य VLOS चाचण्यांच्या आधारे आणि तेलंगणा सरकारच्या 'मेडिसिन फ्रॉम द स्काय' उपक्रमांतर्गत BVLOS चाचण्यांच्या आधारे, ब्लू डार्ट लॉजिस्टिक्ससाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर
जागतिक घडामोडी या अतिशय गुंतागुंतीच्या असतात. इतिहासात घडलेल्या घटनांची सावली, वर्तमानातल्या घटनांवर पडलेली असते. अनेक देशांच्या उदाहरणातून हेच गृहितक सत्य असल्याचे प्रतीत होते. त्यातूनच निर्माण झालेल्या गुंतागुंतीतूनच संघर्षाची ठिणगी पडते. अशीच गुंतागुंत असलेल्या सायरसच्या सिलेंडरची माहिती या लेखातून घेऊया.
दक्षिणपूर्व आशियातील व्हिएतनाममध्ये ‘Save Vietnam's Wildlife' ही वन्यजीव संरक्षण संस्था बेकायदेशीर वन्यजीव व्यापारातून पँगोलिन वाचवत आहे. या पँगोलिनचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ ट्रॅकिंगचा वापर केला जात आहे. रेडिओ टेलिमेट्री ड्रोन वापरल्यामुळे संस्थेला सोडलेल्या पँगोलिनच्या अस्तित्वाचे मूल्यांकन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर पँगोलिनच्या वर्तणुकीबद्दल आणि अधिवासाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
येत्या हिंदू सणानिमित्त कुठल्याही प्रकारे अफवा पसरवणे, समाजकंटकांमार्फत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घटना तर संबंधित आरोपी कठोर कारवाईस पात्र राहिल, अशा कडक सूचना रांची पोलीसांनी दिल्या आहेत. यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी १७ एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या रामनवमीसाठी Ram Navami Drone Footage घेतली आहे. २०२३ मध्ये रामनवमीच्या निमित्त देशात काही ठिकाणी समाजकंटकांनी शोभायात्रांवर दगडफेकीसारखे प्रकार केले होते. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
अमेरिकेच्या काँग्रेसने (अमेरिकेच्या संसदेला काँग्रेस म्हटलं जातं) भारताला करण्यात येणाऱ्या ३१ प्रिडेटर ड्रोनच्या विक्रीला मंजूरी दिली आहे. या ३१ प्रिडेटर ड्रोनची किमत चार अब्ज डॉलर इतकी आहे. या ड्रोनचे मुख्य काम हे समुद्री सीमांची टेहाळणी करण्याचे आहे. अमेरिकेने दि. १ फेब्रुवारी २०२४ गुरुवारी या कराराला मंजुरी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले की, देशातील १ कोटी महिला लखपती दीदी बनणार आहेत. त्यांचा सत्कार केला जाईल. यापूर्वी आमचे लक्ष्य २ कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचे होते, मात्र आता ते ३ कोटी करण्यात आले आहे.
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांनी अदानी समुहाच्या 'अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस' द्वारे निर्मित दृष्टी १० स्टारलाइनर ड्रोन सादर केले आहे. हैदराबाद येथे असलेल्या अदानीच्या ड्रोन निर्मिती कारखान्यात भारतीय तंत्रज्ञानाने ते तयार करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने पामर लकीच्या ‘अँडुरिल’ कंपनीकडून काही रोडरनर ड्रोन्स खरेदी केली आहेत. अर्थात, अमेरिकेतली एक स्टार्टअप म्हणजे नवखी कंपनी जे करू शकते, ते अमेरिकन सेनादलाचे मुरब्बी वैज्ञानिक करू शकत नाहीत, असं थोडंच आहे? पण, नवीन पोरं काय करतायत बघूया तरी, म्हणून ‘पेंटेगॉन’ने ही रोडरनर घेतली आहेत.
नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'विकास भारत संकल्प यात्रे'च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही पंतप्रधानांनी सुरू केला. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी महिला किसान ड्रोन केंद्राचे उद्घाटनही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधतील. या योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहोचतील हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने देशभरात 'विकसित भारत संकल्प यात्रा' आयोजित केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय बैठकीत चर्चा करणार आहेत.
भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढणार आहे. आता लष्कराच्या ताफ्यात 'हेरॉन ड्रोन मार्क-2' येणार आहे. याच ड्रोन मार्कने अमेरिकेने अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी याला ठार केले होते. आता भारतीय हवाई दलालाही हेरॉन ड्रोन मार्क-2 असे गेम चेंजर अस्त्र मिळाले आहे.
पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, गुगलवरून घेतलेली कुलाबा येथील छाबडा हाउससह इतर संवेदनशील स्थळांची मोबाइलमधील छायाचित्रे आणि लॅपटॉपमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केल्याची माहिती राज्य एटीएसकडून देण्यात आली आहे.
'युद्धस्य कथा रम्या’ अशी एक म्हण आहे. परंतु, आता बदलत्या ‘स्मार्ट’ युगात युद्धस्य कथा या डिजिटल स्वरुपात म्हणजेच ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लढल्या जातील. युद्ध कथा वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीच चांगल्या वाटतात. मात्र, त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुभव ज्यांना येतो, त्यांच्यावर त्याचे नक्कीच दूरगामी परिणाम दिसून येतात. तरीही जग हे नेहमीच युद्धाच्या तयारीत असते. हे युद्ध कधीकाळी जमिनीवर लढले जायचे, त्यात कालपरत्वे बदल होत जाऊन ते पाण्यात आणि आकाशातही लढले जाऊ लागले.
नवी दिल्ली : केंद्र सरकार अमेरिकेकडून ३१ एमक्यू – ९बी रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) खरेदी करण्यासाठी अमेरिकी सरकारला विनंतीपत्र जारी करणार आहे. हा व्यवहार सरकार ते सरकार पद्धतीनुसार होणार आहे.
भारताच्या आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल होण्यास प्रारंभ झाला. त्यातही प्रामुख्याने कोरोना संसर्गाच्या कालखंडामध्ये भारतीय आरोग्य व्यवस्था अधिकच बळकट झाली. त्यामुळेच अपवाद वगळता कोरोना काळात आवश्यक औषधे, ऑक्सिजन पुरवठा, लसनिर्मिती आणि लसीकरण यशस्वी पार पडणे शक्य झाले. आता देशाची आरोग्यव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याविषयी...
'सप्तर्षी' या अर्थसंकल्पातील सात प्राधान्यक्रम. सर्वसमावेशक वाढ, शेवटच्या टप्प्यात प्रवेश, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा विस्तार, हरित विकास, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र.
ईशान्य बौद्धिक मंच (IFNE) आणि आसाम पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र, गुवाहाटी येथे Lokmanthan २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१, २२, २३ आणि २४ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. लोकमंथनाचे हे तिसरे पुष्प असून 'लोक परंपरा' ही यंदाची थीम आहे. यावेळी लोकपरंपरेतील आपले सांस्कृतिक भान जपण्यात आणि राष्ट्रवादाची भावना दृढ करण्यात त्याचा कसा वाटा आहे, यासंबंधित प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच चर्चा, परिसंवाद, सांस्क
जम्मू-काश्मीर : जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात संशयास्पद ड्रोन हालचालीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये शोध मोहीम सुरू केली. पोलिस उपअधीक्षक गरु राम भारद्वाज यांनी रविवारी सांगितले की, शोध मोहीम शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता सुरू झाली आणि रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत चालली, परंतु या काळात कोणतीही दोषी वस्तू सापडली नाही
‘ड्रोन’चे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबाबी भारत आणि भारतीयांसाठी नव्या आहेत. मात्र, अल्पावधीतच त्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांमध्ये सिद्ध झाली आहे.
चीनवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि हिंदी महासागरात पाळत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या सशस्त्र 30 ‘एमक्यू-9 बी’ ड्रोन तीन अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी पुढील टप्प्यात पोहोचल्या आहेत,
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची ड्रोन पुरवणी करण्याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू आणि काश्मीरमधील पाच जिल्ह्यांमध्ये आठ वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू केला आहे. जम्मू, श्रीनगर, कठुआ, सांबा आणि डोडा जिल्ह्यांमध्ये 'रेझिस्टन्स फ्रंट'च्या प्रमुख मॉड्यूलद्वारे शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांच्या खेपेसाठी वापरल्या जाणार्या ड्रोनला रोखल्याच्या प्रकरणात शोध घेण्यात आला. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे एक शाखा, एनआयएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ज्याचा शोध २१ वर्षे अमेरिका घेत होती, त्या ‘अल कायदा’च्या अयमान अल जवाहिरीला काबूलमध्ये ड्रोनद्वारे अमेरिकेने नुकतेच ठार मारले. अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचा बिनधास्तपणे भंग करून त्याला त्याच्या घरात घुसून अमेरिकेने त्याचा खात्मा केला. आपल्या तीन हजार नागरिकांना ‘९/११’च्या हल्ल्यात ठार करणार्या ‘अल कायदा’च्या प्रमुखाला संपवून अमेरिकेने प्रतिशोध शांत केला. जॉर्ज बुश यांच्यापासून जो बायडनपर्यंत नेते बदलत गेले. पण, अमेरिकेचे दहशतवादविरोधी धोरण मात्र तसेच वास्तववादी राहिलेले दिसून येते. ‘दहशतवाद्यांना त्यांच्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर दोन दिवसीय ‘ड्रोन फेस्टिव्हल २०२२’ चे उद्घाटन केले. यावेळी २०३० पर्यंत भारत जगाचे ‘ड्रोन हब’ बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष धोरण आखले आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांत ‘ड्रोन’चा वापर करणारे क्र. एकचे राज्य बनण्यासाठी मध्य प्रदेशने आघाडी घेतली असून वर्षभरात ५०० ‘ड्रोन’ पायलट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
युएईवरील ड्रोन हल्ल्यामुळे येमेनमधील युद्ध भारताच्या प्रवेशद्वारात आले असून, जगाच्या पाठीवर कुठेही स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देणारे मोदी सरकार या हल्ल्यांबद्दल काय भूमिका घेते, त्याबद्दल सर्वांना कुतूहल आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेली एक कोर आता चीनच्या विरुद्ध आक्रमक कोर म्हणून काम करेल. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियानामध्ये गुंतलेल्या सैनिकांना आता काढून लडाखमध्ये पाठवण्यात आले आहे. आता भारताची आक्रमक सतरा कोर चीनवर हल्ला करण्याकरता सज्ज झालेली आहे. यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता पुष्कळच वाढली आहे.
देशातील दुर्गम भागामध्ये आवश्यक त्या लशी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने 'मेडिसीन फ्रॉम द स्काय' या योजनेची सुरुवात केली आहे.
अमेरिकेशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपला दुसरा ‘रोबोट रणगाडा’ (युजीव्ही) ‘मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल’ जगासमोर आणला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘युजीव्ही रणगाडा’ १०० किमीपर्यंत मानवी मदतीशिवाय गस्त घालत आहे. इतकेच नव्हे, तर ‘युजीव्ही रणगाडा’ आपल्याबरोबर ‘स्वार्म ड्रोन्स’चे संपूर्ण सैन्य घेऊन चालत आहे. अशा परिस्थितीत रशियाचे नवे हत्यार पापणी लवते न लवते तोच कोणताही सैनिकी तळ उद्ध्वस्त करु शकतो. ‘युरन-९’ नंतर ‘युजीव्ही’ रशियाचा दुसरा रोबोट रणगाडा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले आहे. सीमावर्ती भागात पाच किलो ‘आयईडी’ हे स्फोटक बांधलेल्या ‘ड्रोन’ला नष्ट करण्यात यश आले