( Marathi language )राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या दोन्ही संस्थांच्या मंडळांची पुनर्रचना १५ ऑक्टोबर रोजी झाली. या दोन संस्था काय काम करतात, त्या का अस्तित्वात आल्या, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या या संस्थांची गरज सद्यस्थितीत काय? नव्याने झालेल्या संस्थांच्या मंडळांचा उद्देश्य आणि काम नेमकं काय असणर आहे याचा आढावा घेऊयात या व्हिडिओतून.
Read More
संत एकनाथ हे रामाचे बालभक्त होते. संत एकनाथांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यामध्ये ‘भावार्थ रामायण’ हा 40 हजार ओव्यांचा मोठा ग्रंथ आहे. पराक्रमी योद्धा श्रीरामाचे वीररसयुक्त दर्शन या ग्रंथातून घडते. मराठी भाषेतील हे पहिले रामायण लिहिण्याचा मान या संत एकनाथांना असून त्यांचा राम हा ‘नित्यविजयी रघुनंदन’ आहे. सलग दोन लेखांत आपण या रघुवीराचे दर्शन घेणार आहोत.
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य असताना त्यांच्यामुळे आपल्याला सुराज्य मिळाले असे म्हणणारे अनेकजण होते. लोकमान्य टिळकांनी त्यांचे हे म्हणणे अमान्य केले नाही, परंतु सुराज्य आणि स्वराज्य यातील फरक सांगत स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही असे टिळकांचे ठाम मत होते. त्या काळात आजच्या सारखी साधने नव्हती, तरीही लोकमान्य टिळक संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. त्यांच्यापूर्वी असा नेता या देशात कोणी नव्हता, वेगवेगळ्या प्रांतातील नेते होते. परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात लोकमान्य टिळक हे
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवार, ०१ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’, यावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार असून व्याख्यान सर्वासाठी खुले आहे. विचारमंथन व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प असून ठाणेकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा