कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पर्यटनमंत्री असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक बनवण्यसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. काही दिवसांपूर्वीच या शिवप्रताप स्मारकात उभारण्यात येणारा अफजल खान वधाचा भव्य पुतळा तयार झाला आहे. मंत्री लोढा यांनी सदर पुतळा घडवणारे शिल्पकार दीपक थोपटे यांचा मंत्रालयात सत्कार (२४ जुलै रोजी) केला. या पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येईल, असे यावेळी मंत्री लोढा यांनी सांगितले.
Read More