( Dr. Ashutosh Javadekar ) शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ! असा संदेश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. मात्र, आज समाज दुभंगला असुन संघर्षच (एजिटेट) करीत आहे. याला कारणीभूत आजची शिक्षणपद्धती आहे, तेव्हा ज्ञान देणाऱ्या शिक्षकापेक्षा 'जाण' देणारा गुरु हवा. असे मौलिक सल्ला सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ते, गायक दंतवैद्यक डॉ.आशुतोष जावडेकर यांनी दिला.
Read More
पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी दिली.