चाकण नगरपरिषदे अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना वापरण्यात आल्या. याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे.
Read More
महाराष्ट्रातील कोळीवाड्यांमधील मच्छीमारांच्या मुलांसाठी आता सागरी खेळांच्या प्रशिक्षणाची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. 'यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' आणि राज्य सरकारच्या 'मत्स्यव्यवसाय व बंदर विभागा'च्या संयुक्त विद्यमाने, सर्फिंग, सेलिंग आणि स्टँड-अप पॅडल बोर्डिंगसारख्या खेळांचे प्रशिक्षण अत्यंत माफक दरात दिले जाणार आहे.
ओडिसाच्या जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेला सुरुवात झाली की, मणिपुर येथे कांग उत्सवाची धुमधाम सुरु होते. कांग हा मणिपूरमधील मेईतेई समुदायाद्वारे साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे. याची रचना साधारण जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेसारखीच असते. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथावर बसून यात्रा काढली जाते. कांग उत्सवादरम्यान केले जाणारे विधी सुद्धा जगन्नाथ पुरी रथयात्रेसारखेच असतात.
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले आहे, असे आपण अगदी सहजपणे म्हणतो. संपर्कसाधनांच्या विस्तारामुळे मानवी आयुष्यातील हा एक सकारात्मक तांत्रिक आविष्कारच. परंतु, याच जग जवळ येण्याच्या वास्तवामुळे अमेरिकेसारखी महासत्ताही धास्तावलेली दिसते. म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य हल्ल्यांपासून देशाच्या रक्षणासाठी ‘गोल्डन डोम’ यंत्रणा विकसित करणार असल्याची घोषणा केली. तेव्हा, अमेरिकेला नेमके या सुवर्णकवचाची गरज का भासावी, याविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरावे.
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारा संभाव्य हल्ला परतवून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. ८ मे रोजी रात्री, पाकिस्तानकडून पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन्स पाठवले गेले होते. त्याचा मुख्य उद्देश अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा होता. भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने या ड्रोन्सना आधीच वर्तवले होते. त्यामुळे नाश करणे सोपे झाले. या घटनेचा व्हिडिओ भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन्सना कसे पाडले हे दाखवले आहे.
अक्षय्य तृतीयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी सोन्याच्या दरात मोठा फरक निर्माण झाला आहे. ३० एप्रिलच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,३०० रूपयांचा फरक पडला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७०० रूपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७०० रूपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला आहे.
अक्षय्य तृतीया, हिंदु धर्मातील एक पवित्र आणि शुभ सण मानला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करुन संपूर्ण घर स्वच्छ केले जाते. देवाची पूजाही केली जाते. दाराला सुंदर तोरण घराबाहेर सुबक रांगोळी काढली जाते.
जागतिक बाजारात वाढीला लागलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने उसळी घेतली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारण्यास ९० दिवसांचा ब्रेक लावल्याने देशांतर्गत बाजारात बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार, ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर १ लाख, १ हजार, ३८० झाल्याचे बघायला मिळाले. सोन्याच्या दराचा हा नवीन उच्चांक असून या पुढील काळात सर्वच उच्चांक मोडले जाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
Ranya Rao कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राण्या रावला सोन्याच्या तस्करी प्रकरणात जबाबदार धरण्यात आले आहे. या घटनेने कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. वाढत्या दबावाखीलल राज्याच्या सरकारने सोमवारी सायंकाळी हे प्रकरण सीआयडी विभागाकडे दाखल केले. एका दिवसानंतर, गृह विभागाकडे बंगळुरूमधील केम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिस अधिकाऱ्यांच्या संभाव्य चुका आणि कर्तव्यावर निष्कळजीपणाकडे बोट दाखवत भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
येथील जनरल एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू हायस्कूल कल्याण मधील १९७५ साली जुन्या एस एस सी च्या शेवटच्या बॅच च्या विद्यार्थी - विद्यार्थिनीचा सुवर्ण महोत्सवी स्नेह सोहळा नुकताच डोंबिवलीतील सीकेपी सभागृहात जो सौ मृदुल दवणे ह्यांनी उपलब्ध करून दिला होता तिथे नुकताच पार पडला. अर्थात १९७५ साली एस एस सी पास विद्यार्थी आजमितीस आजी - आजोबा झाले आहेत. या सोहळ्यात सुमारे ५० जण सहभागी झाले होते.
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तिच्याकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त केलं. गेल्या काही दिवसांपासून तिच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवलं होतं. १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्याने तिच्यावर संशय बळावला होता. सोमवारी रात्री ती भारतात परतत असताना, अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. या तपासात तिच्या
मराठी चित्रपटसृष्टी सध्या अनेकविध आव्हाने व स्थित्यंतरांतून मार्गक्रमण करीत आहे. एकीकडे नव्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद काहीसा संमिश्र असताना, अजूनही काही जुने चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. अशा या जुन्या चित्रपटांच्या हृदयस्पर्शी संवादांपासून ते थेट मनाला भिडणार्या गीतांपर्यंत, सर्व काही आजही जसेच्या तसे प्रेक्षकांच्या स्मृतिपटलावर कोरलेले आहे. त्यामुळे जुन्या मराठी चित्रपटांची जादू आजही टिकून आहेच. हे लक्षात घेता, मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी नावीन्याची कास धरण्याबरोबर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इबी-५’ व्हिसा कार्यक्रम संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्याऐवजी नवीन ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा योजना सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत, पाच दशलक्ष डॉलर्स अर्थात सुमारे ४३.५ कोटी रुपये गुंतवणूक करणार्या परदेशी नागरिकांना, अमेरिकेत स्थायिक होण्याची संधी दिली जाणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने अमेरिकेच्या स्थलांतर धोरणात मोठा बदल घडणार आहे.
Donald trump यांनी नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत परदेशातून आलेल्यांना ५ दशलक्ष डॉलर्स (भारतीय ४५ कोटी रुपये) देऊन विशेष गोल्ड कार्ड मिळवून ते अमेरिकेचे नागरिकत्व मिळवू शकतात. गोल्ड कार्ड हे ग्रीन गार्डचेच प्रीमियम व्हर्जन असल्याची माहिती दिली.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काच्या निर्णयामुळे, जगभरात व्यापारयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी बँका लंडन येथून अब्जावधी डॉलर्स मूल्याचे सोने, अमेरिकेत नेत आहेत. येणार्या काळात आर्थिक संकट तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळत आहेत.
अमृतसर सुवर्ण मंदिरापासून जेमतेम चार ते पाच मिनिटांवर असलेल्या ‘हेरिटेज स्ट्रीट’वर 30 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली. संविधानाची प्रतही जाळली. तेही नेमके प्रजासत्ताक दिनी! या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसारित झाला. ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकरच.
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
सोने खरेदी करणे म्हणजे गुंतवणुकदारांची पहिली पसंती राहिली आहे. परंतु सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेलच असे नाही. २०२४ या वर्षी सोने - चांदीने वाढीचा सर्वाधिक वाढीचा विक्रम केला आहे. सोन्याच्या दरात गेल्या वर्षभरात मोठी वाढा झाली आहे. जवळपास साधारण १७ ते १८ हजारांनी सोने महागले आहे.
Tajinder Singh भाजप नेते तजिंसदर बग्गा यांनी एका उजैन येथील हिंदू मंदिराला भेट दिल्याने त्यांची खिल्ली उडवल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही केवळ सनातन धर्माचे पालन करत आहात, सुवर्ण मंदिरातही डोके टेकवा. अशा डाव्या विचारधारेच्या पत्रकार मृणाल पांडे यांनी गरळ ओकली आहे.
Handicaped Chetan Pashilkar ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय ॲबीलिंपीक (Abylimpic) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ( Chandrababu Naidu ) यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे ‘स्वर्ण आंध्र-२०४७’ हे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाच्या अंतर्गत “आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात रालोआ सरकार आंध्र प्रदेशच्या जनतेचा शाश्वत विकास साधताना, श्रीमंत, निरोगी आणि आनंदी आंध्र प्रदेशच्या निर्माणासाठी कार्य करणार आहे,” असेदेखील नायडू यांनी सांगितले.
Sukhbir Singh शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी बुधवारी सकाळी मुंडण केले. यावेळी दहशतवादी नारायण सिंह चौरा याने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तनखैया तपश्चर्या करत असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा खलिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात वाढ दिसून आली आहे. सोन्याचा भाव एमसीएक्सवर ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहिला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव १,२०० रुपयांनी वधारला असून ७६ हजार रुपये प्रति तोळा पुढे गेला आहे. विशेष म्हणजे काल मंगळवारी सोन्याचा दर ७४,८५२ रुपये प्रति तोळा इतका कमी झाला होता.
मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, दहिसरमध्ये ( Dahisar ) तब्बल दोन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.
gold balls seized ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वडाळा येथून १ कोटी ११ लाख सोन्याचे चेंडू जप्त झाल्याची घटना आहे. ही घटना ८ नोव्हेबर २०२४ रोजी घडली. सोन्याचे पावडर असलेले चेंडू एका इलेक्ट्रिशियनकडे सापडले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती हा चेन्नईचा रहिवासी असल्याचे वृत्त आहे.
मौल्यवान वस्तूंवरील कस्टम ड्युटीतील कपातीस बराच अवधी उलटल्यानंतर आता आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज सोने-चांदी भाव घसरणीसह उघडले असून सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे ७६,४५० रुपये, तर चांदीचे वायदे ९०,६०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या आगामी भावात घसरण होत आहे.
सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात आज घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घट झाली असून एमसीएक्सवर सोने ७८,३५७ रुपयांच्या आसपास आला आहे. तर चांदीचे भाव ९४,२०६ रुपयांवर आले आहे. सकाळच्या सुरूवातीस एमसीएक्सवर चांदीचा बेंचमार्क १८१ रुपयांच्या घसरणीसह ९४,१०३ रुपयांवर उघडला. सोन्याच्या फ्युचर्स किमतीने या वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली होती.
Pune विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे नाकाबंदी झाली. सातारा महामार्गाच्या सहकारी नगर येथे पोलिसांनी तब्बल १३८ कोटींचे सोने पकडले आहे. ही घटना पुणे शहरात घडली असल्याचे वृत्त आहे. हे सोने एमएच ०२ ईआर ८११२ या टेम्पोतून घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी नाकाबंदीवेळी हा टेम्पो पकडला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदी दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींमुळे कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा अधिक दिसून येत असून सोने-चांदीच्या किंमती दिवसागणिक वाढत होताना दिसत आहेत.
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढती मागणी यामुळे सोने-चांदी दरात वृध्दी होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होताना दिसून येत आहे. विशेषतः गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक वाढली असून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. जगापेक्षा भारतात सोने खरेदी करणारा वर्ग खूप मोठा आहे.
( Olympic Games)आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
‘चतुरंग’ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज, रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी होणार्या कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, पं. उल्हास कशाळकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, ख्यातनाम उद्योजक बाबा कल्याणी, ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार, संगीतकार अशोक प
सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती वाढीने सुरू झाल्या असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)वर सोन्याचा ऑक्टोबरचा बेंचमार्क करार १६५ रुपयांच्या वाढीसह ७४,२०५ रुपयांवर उघडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.
कधीकाळी एकत्र कुटुंबपध्दतीचे प्रस्थ होते. मात्र सध्याच्या जमान्यात विभक्त कुटुंबपध्दतीचे स्तोम माजले असताना एकत्र कुटुंब पध्दतीचा वारसा चिंचोडयाचा पाडा येथील पाटील कुटुंबियांनी जपला आहे. एकत्रित राहून गणेशोत्सव देखील एकत्रित साजरा करणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या गणपतीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अनंत चतुदर्शीपर्यंत विराजमान होणा-या गणपतीच्या दर्शनासाठी आप्तेष्ट नातेवाईक, मित्र परिवार यांची गर्दी होत असताना सेलिबेट्रींची लाभणारी उपस्थिती ही पाटील यांच्या गणपतीची खासियत आहे.
पश्चिम बेंगळुरूमधून एक रंजक बातमी समोर आली आहे. एका शिक्षक कुटुंबाने तब्बल ४ लाख रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन घरात स्थापना केलेल्या गणेश मूर्तीला घातली होती, मात्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी ते ती चैन काढून घेण्यास विसरले आणि त्यांनी तसेच मूर्तीचे विसर्जन केले. जेव्हा विसर्जनानंतर सोन्याची चैन काढण्याचा आपल्याला विसर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी लगेच चैनीचा शोध सुरू केला. १० तासांच्या शोधकार्यानंतर अखेर ती सोन्याची चैन सापडली. या कालावधीत सुमारे १० हजार लिटर पाणी पंपच्या साह
Avani Lekhara पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवनी लेखरा या शूटरने सुवर्ण पदक पटकावले आहे. एअर रायफल स्टँडिंग एसएच १ अवनीने इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घालत सबंध भारताचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे बारताच्या मोना अगरवालने याच खेळात कांस्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. यामुळे देशाला दुहेरी आनंद मिळाला आहे.
'मुथूट फिनकॉर्प लिमिटेड'ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सादर केली आहे. 'व्यापारी विकास गोल्ड लोन' ही नाविन्यपूर्ण ऑफर व्यापाऱ्यांच्या विकसनशील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. व्यापारी समुदायाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत असताना या योजनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना अतुलनीय लवचीकता आणि मूल्य प्रदान करेल.
Neeraj Chopra भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. मात्र, नीरजच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. नीरज सुवर्णपदकाला गवसणी घालेल असे अनेक भारतीयांचे स्वप्न होते. मात्र, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमने ८ ऑगस्ट रोजी सुवर्णपदक पटकावून पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आशिया खंडाचे नाव उंचावले आहे. याचपार्श्वभूमीवर आता नीरज चोप्राच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली असून अनेकांची मने जिंकली आहेत.
दीडशे कोटींच्या भारतीय संघाला फक्त तीन ऑलिम्पिक कांस्य पदके...आणि त्या पाच कोटींच्या इवल्याशा केनियालाही एक सुवर्ण पदकासह एकूण तीन पदके मिळतायत... कशाला इतका जल्लोष करताय... एका भारतीय चाहत्याची पॅरिसमधील ही प्रतिक्रिया... आकडेवारीत तो बिलकुल चुकलेला नाही. चुकलाय तो त्याचा दृष्टिकोन. भारतीय खेळाडूंचे यश दुय्यम लेखताना त्याला जो ग्लास अर्धा रिकामा दिसला, तो मला मात्र अर्धा भरलेला दिसला. जो कधीही पूर्ण भरू शकतो, याचा विश्वास या पॅरिस ऑलिम्पिकने दिला आहे. भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ह
कमी जोखीम, सोन्याची शुद्धता आणि डिसुविधांमुळे डिजिटल सोन्यात भारतीयांचा वाढला रस आहे, असे नावीतर्फे सर्वेक्षणात दिसून आला आहे.
मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सराफा बाजारात किमतीत मोठी घट होत मुंबई शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७३,३४१ रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ९०,०८० रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात संमिश्र प्रतिक्रिया आल्याने सीपीआय (Consumer Price Index) आकडेवारी आल्यानंतर व युएस डॉलरमध्ये घसरण होताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या व चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
अमेरिकन फेडरल व्याजदर कपात होईल या आशेनंतर अमेरिकन पीएमआय आकडेवारीनंतर बाजारात सोने वधारले होते. काल झालेल्या वाढीनंतर पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी एस अँड पी ग्लोबलने परचेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) जाहीर केल्यानंतर उत्पादन क्षेत्रातील निर्देशांक मे मधील ५१.३ वरुन ५१.७ वर पोहोचला होता त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा कायम राहिली होती. मे मधील सेवा क्षेत्रातील पीएमआय ५४.८ वरुन जूनमध्ये ५५.१ वर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालींमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारातील आर्थिक आकडेवारीत घसरण झाल्यामुळे तसेच मध्यपूर्वेतील दबाव कायम असला तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने अमेरिकन बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारातील सोने महागले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव हटल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने ही घसरण तेलाच्या पातळीत झालेली वाढ व प्रति बॅरेल झालेल्या मागणीत घट यामुळे बाजारात कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस डॉलरमध्ये वाढ होतानाच सोन्याच्या किंमतीत दबाव निर्माण झाला. युएसमधील रोजगार निर्मिती आकडेवारीत अपेक्षेपेक्षा अधिक आकडेवारी आल्यानंतर युएस फेडरल रिझ र्व्ह व्याजदरात कपात होईल ही चर्चा सुरू झाल्याने बाजारात सोन्यात पडझड झाली आहे. चीननेही १८ महिन्यानंतर सोन्याच्या खरेदी थांबल्यानंतर बाजारात सोने स्वस्त झाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाल्याने भारतातील काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत घसरण तर काही ठिकाणी सोन्याच्या किंमती जैसे थे राहिल्या आहेत. अमेरिकन बाजारात शुक्रवारी जाहीर झालेली लेबल मार्केट आकडे वारी सकारात्मक दिसली आहे तसेच चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने १८ महिन्यांच्या सोने खरेदीनंतर खरेदीला पूर्णविराम दिल्याचे म्हटले आहे. तसेच यूएस बाजारातील समाधानकारक रोजगार आकडेवारी आल्यानंतर डॉलरच्या किंमतीत वाढ झाली होती. या सगळ्यांचा परिणाम झाल्याने सोने घसरले होते.
गुंतवणूकदारांना सोने व चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, युएस पेरोल डेटा, डॉलर्स निर्देशांकात झालेली वाढ व चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने घोषित केल्याप्रमाणे विदेशी मुद्रेत न झालेला बदल, देशांतर्गतील धोरणे, घटलेली मागणी अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या निर्देशांकात काल आणि आज मोठी घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावात नियंत्रण आल्याने कालपासून सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली असल्याने अखे