नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेबांचे अपमान करणे ही माझी आणि आमच्या पक्षाची संस्कृतीच नाही. मात्र, संसदेत काँग्रेसचा आंबेडकरद्वेष सिद्ध झाल्यानेच त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत केला.
Read More
मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित 'संविधान सन्मान रॅली २०२४' मध्ये मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी सक्रीय सहभाग घेतला. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी डॉ. आंबेडकर मेडिकोस असोसिएशन आणि सामाजिक समरसता मंचाद्वारे आयोजित हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले!
आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणातील फरक समजेनासा झाला म्हणजे, अंधारे, राऊत, आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांची पिलावळ पैदा होते. ज्यांना राज्याच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीची काही माहिती नाही, असे हे नेते केवळ राजकीय लाभासाठी बेछूट आरोप आणि कृती करताना दिसतात. अन्यथा, डॉ. आंबेडकर यांनी घटनेत महिलांना संपत्तीतील वाटा देताना ज्या परंपरेचा आधार घेतला, तिचा मनुस्मृतीत उल्लेख केला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवले असते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्ह
जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे कायमस्वरूपीचे नसून तात्पुरते होते. त्यानुसार हे कलम आता हटविण्यात आले असून आता कलम ३७० च्या भुतास कायमचे गाडून टाकण्याची वेळ आली आहे, असा युक्तीवाद वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी केला आहे.
चंद्रपूर : घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्य शासनसुद्धा नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने ‘नमो आवास’ घरकुल योजना सुरू केली आहे. या अंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यात १० लक्ष घरे निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
डॉ. हेडगेवार यांनी मुळात संघाच्या स्थापनेपासून प्रारंभिक काळात संघटनेची ज्या पद्धतीची बांधणी केली, तो वारसा पुढील पिढ्यांनी निगुतीने सांभाळला. गुढीपाडवा हा डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या या अलौकिक आणि द्रष्ट्या कर्तृत्वाचे स्मरण करणे औचित्याचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘गरिबी हटाव’सारखा सवंग नारा देण्यापेक्षा ‘सबका साथ, सबका विकास’ची घोषणा दिली आणि दारिद्य्रनिर्मुलनाची कमाल करून दाखवली. नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर दारिद्य्रनिर्मुलन झाले, तर दुसर्या कार्यकाळात ग्रामीण भागाला सशक्त करण्याच्या अनेकानेक केंद्रीय योजनांमुळे ग्रामीण भागातील दारिद्य्र घटत आहे.
खिलाफत चळवळीचा दुसरा टप्पा ऑगस्ट १९२० ते मार्च १९२२ या काळात झाला. हल्ले आणि हत्यांचे सत्र हे या टप्प्याचे वैशिष्ट्य होते. असहकार चळवळीच्या आडून मुस्लिमांनी दबावतंत्र वापरले. गांधींच्या अहिंसेचे डोस केवळ हिंदूंच्याच घशाखाली गेले होते. खिलाफतवाद्यांचा अहिंसेवर कधीच विश्वास नव्हता. अस्तनीतील खंजिराला पुरेशी धार चढल्यावर त्यांनी तो उपसून चालविण्यास सुरुवात केली.
दि. १४-१५ मार्च १९४१ ला मुंबईत ताजमहाल हॉटेलमध्ये काँग्रेस व मुस्लीम लीग वगळून अन्य पक्षांची बैठक भरली. त्यात सुमारे ४० नेते उपस्थित होते. ही एक अतिशय महत्त्वाची बैठक असून यात सावरकरांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. आंबेडकरही सावरकरांसमवेत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला सावरकरांनी विशेष मार्गदर्शन केल्याने त्यांचा आभाराचा विशेष उल्लेख अध्यक्ष बॅ. सप्रू यांनी केला. या काळात ब्रिटनचा द्वितीय विश्वयुद्धात सर्वत्र सारखा पराभव होत होता. या परिषदेने अनेक ठराव संमत केले. युद्ध संपताच ब्रिटनने हिंदुस्थानला वस
हिंदूंमधील जात्याभिमान दूर होऊन सर्व हिंदू समाज एक व्हावा, त्यांच्यामधील दुहीची भावना दूर व्हावी, यासाठी ते आयुष्यभर झिजले. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मंदिर प्रवेशाच्या डॉ. आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळीदेखील मध्यस्थी करून अस्पृश्यांना सन्मानाची वागणूक द्यावी व आदरपूर्वक त्यांना मंदिर प्रवेश करू द्यावा, यासाठी ते प्रयत्नरत होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘भोंसला सैनिकी शाळेत’देखील कधीही जातिभेदाला थारा दिला गेला नाही.
‘न्यू इंडिया’ हा जसा माझ्या स्वप्नातील भारत आहे तसाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील देखील भारत आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.