नवीन इमारतीमध्ये सर्व आवश्यक व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध, व्यावसायिकांची पुनर्वसन प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये राबविणार, छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे पुनर्वसन छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन हे महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये करण्यात येत आहे. या नवीन इमारतीमध्ये आवश्यक तसेच अत्याधुनिक अशा सर्व सेवा-सुविधा देखील पुरवण्यात आल्या आहेत, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Read More
न्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनांचा परवाना १५ सप्टेंबर पासून कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी तपासणी साठी नमुने घेतले होते. शासकीय विश्लेषक, औषध नियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई यांनी बेबी पावडरचे उत्पादन अप्रमाणित घोषित केल्याने ही कारवाई करण्यात आली.
पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो. म्हणजे, शांततेची चर्चा करायची, त्यातून स्वतःचे चांगले रुप पेश करायचे, जगभरातून निधी लाटायचा, पण तो पैसा देशाच्या उन्नतीसाठी नव्हे, तर पुन्हा भारताविरोधातच वापरायचा, अशी काही पाकिस्तानची योजना असू शकते.
कोल्हापूर, सांगली तसेच सांगली जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महिलांना येत्या दोन महिन्यांच्या आत सैन्यदलांमध्ये स्थायी नेमणूक देण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी दरम्यान दिले. भारतीय सैन्यदलांमध्ये यापूर्वी महिला अधिकार्यांना स्थायी नेमणूक न देता तात्पुरती नेमणूक दिली जात होती.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालानुसार नौदलात आता महिलांच्या स्थायी प्रतिनिधित्वाचा (पर्मनंट कमिशन) मार्ग मोकळा झाला आहे.
तालुक्यातील लाख या ३० ते ४० वस्ती असलेल्या गावी आजपावेतो कुठलाही रस्ता अथवा बस सेवा नव्हती त्यामुळे गावातील लोक सर्व आधुनिक काळात सर्व सेवा सुविधापासून वंचित होते.
शेतकर्यांना शाश्वत सिंचनासाठी त्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढ होण्यासाठी शासनाने जलसिंचनाच्या योजनावर भर देण्याचे काम हाती घेतले आहे.
वेब सिरीजसाठी होणारे पुरस्कार सोहळे या वेब मालिकांच्या एका वेगळ्या जगाचं प्रतिबिंब आहे. या वेब मालिकांमुळे सिनेसृष्टीला अनेक नामवंत कलाकार मिळाले आहेत. काय असतं असं या वेब सिरीज मध्ये?