कल्याण पूर्वेच्या रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स, आयुर हॉस्पिटल अणि रिक्षा चालक मालक असोसिएशन ( सिद्धार्थ नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहरातील सुमारे ११० रिक्षाचालकांनी आरोग्य तपासणी चा लाभ घेतला.
Read More
वार्धक्याच्या वाटा सुकर करायच्या असतील तर कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर समग्र विचार आवश्यक आहे. तेव्हा, वार्धक्याच्या हल्लीच्या काळातील समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
आजाराचे किंवा रोगाचे मूळ कारण जोपर्यंत शोधले जात नाही, तोपर्यंत आजाराच्या नुसत्या ‘रिझल्ट’ला उपचार करून भागत नाही. होमियोपॅथीमध्ये नुसत्या आजाराच्या नावाला महत्त्व नसते, तर आजार कशाप्रकारे लक्षणे व चिन्हे दर्शवतो व तो आजार होण्यासाठी मुख्यत्वे काय गोष्टी कारणीभूत होतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.म्हणूनच एकच निदान (Diagnosis) असलेल्या दोन रुग्णांचे औषध वेगवेगळे असू शकते. कारण, प्रत्येक माणसाचे शरीर व मन हे वेगवेगळ्या प्रकारे लक्षणे व चिन्हे दाखवत असतात व तसेच प्रत्येक माणसांमध्ये आजारी पडण्यामागची कारणे
सकारात्मक विचार करण्याची शक्ती तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे पैलू बदलू शकते आणि अभ्यास दर्शवितो की, आशावादी असण्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. सकारात्मक विचारसरणीमुळे दातांचे आरोग्यही सुधारणे शक्य आहे का? सकारात्मक राहण्याचा तुमच्या दातांवर उत्तम परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारी संशोधने झालेली आहेत.
राज्यात H3N2 ची रूग्ण संख्या वाढत चालली आहे. H3N2 विषाणूचे राज्यात ३५२ रूग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. H3N2 प्राणघातक नाही, वैद्यकीय उपचाराने बरा होऊ शकतो. घाबरण्याची गरज नाही, असे ही आरोग्यमंत्र्याकडून सांगण्यात आले आहे.
भारतामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस एच३ एन२ या विषानूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणा या राज्यात प्रत्येकी एक अशा संख्याने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील ८२ वर्षीय हासन हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू पावणारा देशातील पहिला व्यक्ती आहे. त्याचबरोबर हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाला आहे.
घर, संसार आणि नोकरीच्या रहाटगाडग्यात महिलांचे बरेचदा आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तेव्हा, आज, दि. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे संतुलित राखता येईल, यासाठी भिवंडी येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, ‘यश नर्सिंग होम’ आणि ‘सोनोग्राफी सेंटर’मध्ये प्रॅक्टिस करणार्या आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, भिवंडी’च्या प्रेसिडेंट डॉ. उज्वला बरदापूरकर यांच्याशी केलेली ही खास बातचित...
नकारात्मकतेच्या दीर्घकाळ होत राहिलेल्या आक्रमणामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
भारतीय जनता पार्टी, धर्मराज फाऊंडेशन व ओरॅकल नॅचरोपॅथी रुग्णालय,पुणो यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण जास्त आढळून आले. या रुग्णांवर नॅचरोपॅथी पध्दतीने औषधोपचार करण्यात आले आहेत.
‘कोविड’च्या आजारातून बरे झाल्यानंतरही शारीरिक आणि मानसिक थकवा बर्याच जणांना काही दिवस,अगदी काही महिन्यांनंतरही जाणवतो. तेव्हा, कोविडमधून बरे झालेल्यांनी आपल्या आहाराकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी आहारामध्ये काय बदल करता येतील, याची माहिती देणारा हा लेख...
हितकारक गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात जमवायच्या म्हटल्या तर आपल्याला मुळात इच्छा असावी लागते. स्वहिताच्या दृष्टीने परिश्रम करायची प्रेरणा असायला लागते. शिस्तबद्धता असायला लागते. आरोग्याच्या दृष्टीने पोषक अशा सवयी लावायच्या असतील तर चंचल मनावर आवर घालायला लागतो, तरच शिस्तबद्धता येईल.
विक्रोळीतली सत्यघटना. सधन संपन्न घरची १४ वर्षीय मुलगी वारली. घरात भावाला काही कारणामुळे क्षयरोग झाला. जंतूसंसर्गामुळे तिलाही झाला.
आरोग्य विम्याच्या मेडिक्लेमच्या ज्या पारंपरिक पॉलिसी आहेत, त्यात सर्व प्रकारचे आजार समाविष्ट असतात. पण, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार असे जे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, अशा आजारांसाठी खास पॉलिसीज उपलब्ध आहेत. मधुमेहींना संरक्षण देणार्या पॉलिसीजची जी कमतरता होती, ती आता भरून निघाली आहे. गंभीर स्वरूपाचे आजार असणार्यांनी त्यांच्या आजारासाठी असलेली खास पॉलिसी घ्यावीच, पण त्याशिवाय पारंपरिक पॉलिसीही घ्यावी.
सोप्या शब्दांत डॉक्टर सतीश नाईक मधुमेह आणि तत्संबंधित गोष्टी समजावून सांगत होते. कशाप्रकारे विविध ठिकाणी जाऊन तेथील व्यक्तींचा मानसिक, शारीरिक आणि त्यांच्या व्यवसायाचादेखील अभ्यास करून मधुमेहाची कारणे आणि त्यासंबंधीचे त्यांचे चाललेले संशोधन सांगत होते.
यकृताचे आजार हे भारतातील मृत्यूंच्या १० प्रमुख कारणांपैकी एक आहेत. सिरॉसिस हा एक काळाप्रमाणे वाढत जाणारा आजार आहे आणि यामुळे यकृताच्या पेशींचा नाश होतो व यकृताच्या पेशींवर कधीही भरून न निघणारे दुष्परिणाम होतात.
होमियोपॅथीची औषधे ही जरी चवीला गोड असली तरी सुध्दा लॅक्सेज पासुन बनवलेली असतात व जर मोजयचेच झाले तर एक दिवसात आपण जी होमियोपॅथीची औषधे घेते त्यातील साखरेचे प्रमाण हे अत्यंत अल्प असे असते