नाशिक जिल्ह्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गावागावात राजकारण तापलेले आहे. ठिकठिकाणच्या बाजार समितीमध्ये गटतट बघायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती, तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विशेष लक्ष आहे. आशिया खंडातील श्रीमंत बाजार समितीच्या यादीत पिंपळगाव बाजार समितीचे नाव आहे.
Read More
जनतेच्या सेवेसाठी भारतात दोन वर्ग हे कायम कार्यरत असतात. एक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि दुसरे म्हणजे शासकीय सेवक. याचीच प्रचिती या काळात आली. स्वतः कोरोनाबाधित होऊनदेखील अविरत सेवाकार्य सुरू ठेवून नागरिकांना मदत करणारे सेवक म्हणून नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांचे कार्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.
महापौरपदासाठी बुधवारी (दि. २०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ते चार नगरसेवकांची नावे अंतिमत: चर्चेत आहेत तर शिवसेनेत देखील दोन नावांवर अंतिम चर्चा सुरू आहे.