आमच्याच पक्षाने ईव्हीएम आणले होते, ते सुरू झाले तेव्हा सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या, असे सांगत काँग्रेस ज्येष्ठ नेते लक्ष्मण सिंह यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, निवडणूक काळात काँग्रेसने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यावर आता काँग्रेस नेत्याकडूनच स्पष्टीकरण आले आहे.
Read More
देशभरातील अन्य राज्यांसह मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा ढिसाळपणा दिसून येत आहे. इंदूर या राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराने आपला अर्ज नुकताच मागे घेतला. एवढेच नव्हे, तर त्याने भाजपमध्येही प्रवेश केला. या उदाहरणाद्वारे काँग्रेस राज्यात किती गांभीर्याने निवडणूक लढत आहे, हेच दिसून येते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भीमा कोरेगाव दंगल आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील संबंधित भूमिकांसाठी अटक करण्यात आलेल्या शोमा सेन आणि उमर खालिद यांचे समर्थन करणारी प्रतिक्रीया नोंदवली आहे. आपल्या 'एक्स' अकाउंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे.
याआधी दोन दिग्गजांनी अशीच पदयात्रा काढली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसरे चंद्रशेखर, जे देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा यात्रेचा कार्यक्रम तरुणांनी आयोजित केला. यातून तरुणांचे प्रश्न मांडले, पदभरती, कंत्राटी नोकर भरती, रिक्त जागा भरण्यासंदर्भातील मुद्दे आणि यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही संघर्ष यात्रेतून प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी काढलेली ही यात्रा राज्यात इतिहास घडवेल, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.
तीन प्रस्तावित फौजदारी कायद्यांना दिलेली हिंदी नावे घटनाबाह्य नाहीत, असे सांगून काही राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून होत असलेली टीका गृहखात्याच्या संसदीय स्थायी समितीने फेटाळून लावली आहे.भाजप खासदार ब्रिज लाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घटनेच्या कलम ३४८ मधील तरतुदीच दखल घेतली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये तसेच कायदे, विधेयके आणि इतर कायदेशीर कागदपत्रांमध्ये वापरली जाणारी भाषा इंग्रजी असावी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील ६, जनपथ या निवासस्थानी विरोधी पक्षांची अर्थात ईव्हीएमग्रस्तांची बैठक झाली. यामध्ये मतदान यंत्रे हॅक केली जात असल्याच्या शिळ्या कढीला पुन्हा एकदा ऊत आणण्याचा प्रकार घडला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असल्याचेच चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असताना राजस्थानात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला. 80 हून अधिक आमदार नाराज झाले आणि राजस्थान हातातून जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
हीमाचल प्रदेश सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, असा निर्णय घेणारे हिमाचल हे काही पहिले राज्य नाही. याआधीही उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरातमध्येही शालेय अभ्यासक्रमात गीतेचा समावेश करण्याचा निर्णय झालेला आहे
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षावरील नाराजी व्यक्त केली आहे. एका खाजगी कार्यक्रमादरम्यान रतलाममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. काँग्रेससाठी ही देशातील शेवटची निवडणूक असेल आणि त्यात पक्ष यशस्वी न ठरल्यास तो पुनरागमन करणार नाही, असे ते म्हणाले. सर्वात जुन्या असलेल्या या पक्षाला भविष्यात कार्यकर्ते मिळणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. पक्षात कार्यकर्ते स्वतंत्रपणे काम करत असल्याचे पाहून आपण
जम्मू-काश्मीरबाबत काँग्रेसच्या मालकांपासून ते अनेक नेत्यांपर्यंत प्रत्येकाचीच भूमिका देशाला विघातक आणि पाकिस्तानला पूरक ठरेल, अशीच असल्याचे दिसते. आताही आपल्याच नेत्यांचा विरोधाचा वारसा दिग्विजय सिंह यांनी पुढे चालवला आणि काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘कलम ३७0’ लागू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सत्तेत येताच जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘कलम ३७0’ लागू करु, असे आपल्या पक्षाधोरणाला साजेसे विधान काँग्रेस नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केल्याचे न
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या पक्षातच अडगळीत पडलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर निर्माणासाठी एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. पण, निधी संकलन करणाऱ्या रामभक्तांना नव्हे, तर त्यांनी हा धनादेश थेट पंतप्रधानांनाच दिल्लीला पाठविला.
श्रेयसी सिंह या भारताच्या नेमबाजदेखील आहेत
आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन विधिवत पार पडणार आहे.
भारतातली गाव-खेड्यातली निरक्षर व्यक्तीही सांगेल की, प्रभू श्रीरामचंद्राचे नामस्मरण हे स्वत:च इतके शुभ आहे की, त्यांच्या नामस्मरणासाठी आणि कार्यासाठी कोणताही मुहूर्त हा शुभच आहे. पण, अति अतिपुरोगामी निधर्मी पक्षाचे अर्थात नाव घ्यायला हवे का? तर त्या निधर्मी पुरोगामी पक्षाचे नेते दिग्विजय सिंग म्हणाले, “राम मंदिराचा शिलान्यास हा वेदांद्वारा स्थापित मान्यतांच्या विरूद्ध होत आहे.” थोडक्यात, त्यांना म्हणायचे आहे की, राम मंदिराच्या शिलान्यासाचा मुहूर्त शुभ नाही.
कर्नाटकमध्ये दिग्विजय सिंग काँग्रेसच्या आमदारांना भेटण्यास आलेल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई
सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.
अनेक लहानमोठ्या पक्षातल्या बहुतांश नेत्यांचीही 'एक्स्पायरी डेट' होऊन गेलेली आहे. पण, त्यांचाच उपयोग चालू असल्याने त्या पक्षांची प्रकृती सुधारण्यापेक्षा अधिकाधिक ढासळत गेलेली आहे.
आपला जनाधार टिकविण्यासाठी रामायण डोक्यावर घेऊन चालणारे सीताराम येचुरी आता रामायणातील हिंसेमुळे अस्वस्थ आहेत.
साध्वी प्रज्ञासिंह यांचा काँग्रेसवर प्रहार'
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपने साध्वी प्रज्ञा यांना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
देशासमोर आता दोन प्रकारची उदाहरणे असतील. एक असेल हिंदूंना दहशतवादी ठरविण्याच्या प्रयत्नांचे आणि दुसरे असेल तो खोटा कलंक पुसून काढण्याचे
हिंदू दहशतवादाची भ्रामक संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी मालेगाव स्फोट, समझोता एक्सप्रेस आदी घटनांचा तपास वळविण्याचा अभद्र उद्योग केला आहे.
या पत्रात नमूद करण्यात आलेला मोबाईल क्रमांक हा दिग्विजय सिंह यांचाच आहे. या वृत्ताला पुणे पोलीसांनी दुजोरा दिला आहे.
मध्य प्रदेशमध्ये सलग १५ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या कॉंग्रेसने निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. मात्र, त्यांचेच नेते राहुल गांधी यांना डोकेदुखी ठरत असल्याचे सध्या दिसून येत आहे.
बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या १९७४ च्या ’कसौटी’ या चित्रपटातील गीताचे वरील बोल आज असे एकाएकी आठवण्याचे कारण म्हणजे काँग्रेसच्या दिग्विजय सिंहांचे एक विधान.
दिग्विजय सिंह हे नक्षलवाद्यांचे हितचिंतक असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याची टीका भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी करण्यात आली.
कॉंग्रेस पक्षाने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी निर्माण केलेला हिंदू दहशतवादाचा बुडबुडा आता फुटला आहे.