मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाने रोजी मध्य प्रदेशच्या एकूण १७ धार्मीक स्थळांवर मद्यविक्री करण्यास बंदी घातली आहे. माध्यमांशी संवाद साधत या संदर्भात माहिती देताना यादव म्हणाले की नवीन उत्पादन शुल्क धोरणाची अंमलबजावणी थोड्याच दिवसांमध्ये केली जाईल. यानंतर एकूण १७ धार्मीक स्थाळांवर मद्यविक्री करण्यावर बंदी घातली जाईल. गुरूवार दिनांक २३ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Read More
( Nayab Singh Saini )हरियाणामध्ये भाजपने खांदेपालट केला नसून नायबसिंह सैनी हेच नवे मुख्यमंत्री असणार आहेत. पंचकुला येथील भाजप कार्यालयात झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली.
( Sanjay Raut ) मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिली आहे.
एका महिलेचा पादचारी रस्त्यावर लैंगिक अत्याचार (Girl Sexual Assault) केल्याची घटना मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात घडली आहे. यावेळी पीडितेवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे काँग्रेस आणि भाजपात वादाची ठिणगी पेटली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मतदारसंघात हा गुन्हा घडला असून निदर्शनास आणून देत विरोधी पक्षाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल केले आहेत. तर भाजपने काँग्रेस याप्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा दावा करत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी विधानसभेत आपल्या भाषणात सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या उज्जैन दौऱ्यावर असताना बाबरच्या हल्ल्यापूर्वी अयोध्येचे राम मंदिर सम्राट विक्रमादित्यने बांधले होते, असे उद्धृत केले होते. हे मंदिर दोन हजार वर्षांपूर्वी बांधले गेले. तसेच यादव म्हणाले की, राम हे फक्त नाव असले तरी त्यांची लीला सर्वत्र आहे. राम नामात, राम घोषात, आराम, विश्रांम अशा सर्व गोष्टी श्रीरामांनी व्यापून टाकलेल्या आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार परवानगीनंतरच धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या मोठ्या निर्णयाचा भाग म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. एवढेच नाही तर उघड्यावर मांसविक्रीवर बंदी घालण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
मोहन यादव लवकरच मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नेड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक नेते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
डॉ.मोहन यादव यांनी मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवराजसिंह चौहान यांच्या जागी भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्याची कमान दिली आहे. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकारांनी त्यांना विचारले की, पक्षाला बंपर विजय मिळवून देण्यासाठी एवढी मेहनत करूनही त्यांना मुख्यमंत्री न करून भाजपने त्यांच्यावर अन्याय केला का? ते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर नाराज आहेत का? याला प्रत्युत्तर देताना शिवराज सिंह चौहान जे काही बोलले ते ऐकून लोक त्यांचे कौतुक करत
अंजुमन इंतेजामिया मशिद कमिटीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली असून, वाराणसीतील ज्ञानवापी येथील एएसआय सर्वेक्षणावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. मशिद कमिटीने जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात याचिका दाखल करून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आणि सांगितले की या प्रकरणातील वादी बाजूच्या (पूजेच्या मागणीसाठी कोर्टात पोहोचलेल्या महिलांची बाजू) लोकांनी एएसआयच्या सर्वेक्षण पथकाने खर्च दिलेला नाही. त्यामुळेच आता सर्वेक्षणावर बंदी घालावी.