समय रैनाच्या "इंडियाज गॉट लेटेंट" या शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. वादग्रस्त असा प्रश्न अलाहाबादियाने एका स्पर्धकाला चालू कार्यक्रमात विचारला. या एपिसोडमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा जी इंस्टाग्रामवर 'द रेबल किड' म्हणून ओळखली जाते. यांच्यासारखे कंटेंट क्रिएटर्सही सहभागी होते. रणवीरच्या या वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडलाय. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनीही त्याच्या वक्तव्यावरून टीका केली आहे.
Read More