उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
Read More
‘सुशीला-सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक एकत्र येत असून हा चित्रपट पुढील वर्षी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची दोन महिन्यांपूर्वी घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल रसिक आणि चित्रपटसृष्टीत मोठी उत्कंठा लागून राहिली आहे.
साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगत बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटानं मोठा मान मिळवला आहे. झी s5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज ‘धर्मवीर २’ या चित्रपटानं मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर २:साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. प्रेक्षकांनी धर्मवीर १ ला जितका प्रतिसाद दिला तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रेम धर्मवीर २ ला मिळालं. चित्रपटगृहात उत्तुंग कामगिरी केल्यानंतर प्रसाद ओक, क्षितीज दाते यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रसाद ओक याने फेसबूकवर पोस्ट करून ‘धर्मवीर २’ ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. ‘ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हि
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली फुलवंती ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर आली आहे. प्राजक्ता माळी निर्मित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत असून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील काही कलाकार देखील यात झळकले आहेत. दरम्यान, त्यांना किती मानधन दिलं त्याबद्दल आता प्राजक्तानेच खुलासा केला आहे.
देशाचे दिग्गज उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री उशीरा निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून विविध क्षेत्रातील मंडळी शोक व्यक्त करत आहेत. अगदी सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, कलाकार, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू देखील आपल्या सोशल मिडियावरुन रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली वाहात आहेत.
मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अभिनयाने गाजलं होतं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांनी या नाटकात साकारलेली सावळा कुंभार आणि गंगी ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकताच स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित-अभिनित ‘फुलवंती’ या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कादंबरी आता चित्रपटरुपात आपल्यासमोर येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे यांचं पहिलं दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी हिची पहिली निर्मिती असणारा ‘फुलवंती’ हा ऐतिहासक चित्रपट असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला.
धर्मवीर २' हा चित्रपट २९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना आवडली असून त्याची प्रचिती बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. 'धर्मवीर २ :'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची हिंदुत्वाची व्याख्या दाखवण्यात आली आहे.
प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर १'च्या यशानंतर नुकताच ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनाही दुसऱ्याही भागाला उत्तुंग प्रतिसाद दिला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन दिवसांत तुफान कमाई केली आहे. प्रसाद ओक यांची प्रमुख भूमिका असणारा 'धर्मवीर २'चे सर्व शो हाऊसफूल होत आहेत.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट नुकताच मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित-लिखित या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यात अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत तर अभिनेता क्षितिज दाते माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसत आहेत.
प्रविण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात दिघे साहेब आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती हे अधोरेखित करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत नेमकं काय घडलं? ज्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊस उचललं आणि थेट गुवाहाटी गाठली? महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ ला घडलेल्या राजकारणातील नाटकाचा पडदा लवकरच धर्मवीर चित्रपटाच्
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख राज्यात ओढावलेल्या पुरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आधी ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र आता प्रदर्शनाची नवी तारीख जाहिर करण्यात आली आहे.
गेले काही दिवस राज्यभरात मुसळगार पाऊस पडत असल्यामुळे महाराष्ट्रात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि याचमुळे बहुचर्चित ‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘धर्मवीर – २’ चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवरही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता ‘धर्मवीर २’ बद्दल अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटात श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याचा उलग़डा झाला आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मिळवलेल्या यशानंतर आता पुढचा भाग अर्थात धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रविण तरडे दिग्दर्शित, लिखित या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांची असून अभिनेता प्रसाद ओक यांन
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर १ : मुक्कास पोस्ट ठाणे या चित्रपटानंतर आता दुसरा भाग धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ९ ऑगस्ट रोजी देशभरात मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यावेळी चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीज दाते याने पहिल्यांदा प्रसाद ओक यांना आनंद दिघेंच्या वेशात पाहिल्यावरचा अनुभव सांगितला आहे.
साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या "धर्मवीर - २" या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन,ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. या म्युझिक लाँच कार्यक्रमासोबतच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 'आनंद माझा' या पुरस्काराने गौरवण्यात आले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनाचा आढावा घेणारा धर्मवीर..मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला होता. आता धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी या पुन्हा एकदा नव्या
क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या "धर्मवीर -२" या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरने 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की' या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतले आहे. ‘धर्मवीर – २’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६३व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा कॅलिडोस्कोप’ अंतर्गत आयोजित केलेल्या ‘बायोपिक आणि मी’ या कार्यक्रमात अभिनेते सुबोध भावे, प्रसाद ओक आणि सुनील बर्वे यांनी त्यांचे अनुभव सांगितले. चरित्रपटांशी त्यांचं असलेलं विशेष नातं, महान व्यक्तिमत्त्वांसारखं दिसणं, त्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा अनेक विषयांवर त्यांनी डोंबिवलीकरांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत प्रमुख भूमिकेसाठी सुबोध भावे नाही तर दुसऱ्याच अभिनेत्याची निवड केल्याचे देखील भावे यांनी सांगि
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. आता दोन वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. ३० जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख रिलीज करण्यात आली. धर्मवीर २ हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा धर्मवीर १ आणि धर्मवीर २ हे चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज कलाकार अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर उपस्थित होते. यावेळी सचिन यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्पा जवळ आला असून २० मे रोजी चो संपन्न होणार आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानात लोकांनी आपला हक्क बजावला असून शेवटच्या टप्प्यातही लोकांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन कलाकारांकडून देखील केले जात आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून दिले आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम अल्पावधीत फार लोकप्रिय झाला. महाराष्ट्रच नाही तर जगभरातील प्रेक्षक या कार्यक्रमाचे चाहते झाले. आत्तापर्यंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर दौरा केला आहे. आता पुन्हा एकदा हे विनोदाचे हास्यवीर परदेशातील प्रेक्षकांना खळखळून हसवायला जाणार आहेत. यावेळी ही स्वारी दुबईला जाणार आहे. जून महिन्यात दुबईमध्ये या कार्यक्रमाचे शो पार पडणार असून लेखक अभिनेते
अभिनेता प्रसाद ओक सोशल मिडियावर सक्रिय असतो. ट्रेण्डिंग रिल्स करणं किंवा समाजात, राजकीय विश्वात घडणाऱ्या घडामोडींवर तो बेधडक आपले मत मांडत असतो. नुकतीच या अभिनेत्याने कुटुंबासह अयोध्या (Ayodhya Ram Mandir) वारी केली आहे. त्याचे फोटो, व्हिडिओ त्याने सोशल मिडियावरुन (Ayodhya Ram Mandir) शेअर केले आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी गेल्या वर्षी म्हणजे २०२३ रोजी सुनील शेळके दिग्दर्शित आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या भूमिकेतील 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाची (Mahaparinirvan) घोषणा करण्यात आली होती. मुळात चित्रपटाच्या नावावरुन कथानक काय असाणार याची उत्सुकता निर्माण झाली होतीच. आणि आता 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या टीमने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना संगीतमय मानवंदना देत 'जय भीम' हे गाणं प्रदर्शित केले आहे. गायक नंदेश उमप यांच्या आवाजातील क्रांती
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपट हिंदीनंतर आता मराठी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा (Swatantryveer Savarkar) मराठी भाषेतील स्क्रिनिंग सोहळा संपन्न झाला. या खास शोसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता प्रसाद ओक पत्नी मंजिरी ओकसोबत उपस्थित होता. चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओक याने खास पोस्ट शेअर केली आहे.
आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer 2) यांचा जीवनपट मांडणारा ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ (Dharmaveer 2) चित्रपटाची घोषणा करण्य
शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Mahaparinirvan) अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' (Mahaparinirvan) या चित्रपटाच
'धर्मवीर' चित्रपटाच्या यशानंतर आता सिनेरसिकांना 'धर्मवीर २' चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि निर्माता मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या चित्रपटाविषयी भाष्य केले आहे.
‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच सुरु झाले असून चित्रकरणाची पहिली झलक समोर आली आहे.
आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. हीच जबबादारी अभिनेता प्रसाद ओक याने लिलया सांभाळली आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी ‘महाएमटीबीशी’ संवाद साधताना अभिनेता प्रसाद ओक याचे दिग्दर्शकाला प्रश्न विचारणारा नट अशा शब्दांत कौतुक केले.
“हिंदुत्व हा माझा प्राण आहे”, असे अभिनेता प्रसाद ओक याने म्हणत त्याच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या त्याने मांडली आहे. ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना प्रसाद ओक याने त्याच्यासाठी हिंदुत्व काय आहे? हे व्यक्त केले. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने त्याच्यातील कौशल्यांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केले. सध्या कुटुंबीयांसोबत प्रसाद परदेशात असून त्याचे परदेशी जाण्ये कारण देखील खास आहे. प्रसादच्या मुलाचा सार्थकचा पदवीचा समारंभ परदेशात झाला यासाठीच पर्साद, मंजरी आणि मयांक सोबत गेला होता.
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याचा 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. एकीकडे चित्रपटाची चर्चा जोर धरु लागली असताना दुसरीकडे भाऊबीजेच्या निमित्ताने प्रसाद ओकने केलेली पोस्ट देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. प्रसाद ओक याने या पोस्टमध्ये प्रत्येक भाऊ हा आनंद दिघे यांच्यासारखा असावा असे म्हटले आहे.
विविधांगी भूमिका साकारणारा प्रसंगी हसवणारा तर कधी रडवणार असा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. एकीकडे दिग्दर्शकाची धुरा सांभाळणाऱ्या प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट ‘महापरिनिर्वाण’ सध्या चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रिकरण पुर्ण झाल्याची माहिती स्वतः प्रसादने दिली.
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी "कच्चा लिंबू", "हिरकणी", "चंद्रमुखी" अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे.
मराठी चित्रपटांकडे तशी आशय आणि विषयांची कमतरता नाही. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने खर्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२३ या वर्षाची दणक्यात सुरुवात केली. ‘बॉक्स ऑफिस’वर इतर भाषिक चित्रपटांच्या सोबतीने भरघोस कमाई करीत मराठी चित्रपटांसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. पण,
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्रातीलच नाही तर परदेशातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारा फिल्टर पाड्याचा बच्चन अर्थात अभिनेता गौरव मोरेची ट्रेन सध्या सुसाट धावत आहे. नुकताच अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या 'परिनिर्वाण' या आगामी चित्रपटात तो झळकणार असल्याची माहिती समोर येत होतीच आणि त्याचा आगामी 'अंकुश' हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या मार्गात असताना गौरव हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकली. या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर आता धर्मवीर २ ची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पोस्टरचे अनावरण केले. धर्मवीर २ च्या घोषणेनंतर मुंबई तरुण भारतशी बोलताना चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, धर्मवीर २ या चित्रपटाची संपूर्ण टीम ही तीच असणार आहे. प्रसाद ओक दिघेंच्या भूमिकेत असणार असून क्षितीज दातेच एकनाथ शिंदे
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. धर्मवीर चित्रपटाच्या यशानंतर आता धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेत निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे.
’कच्चा लिंबू’, ’हिरकणी’, ’चंद्रमुखी’ अशा एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा हरहुन्नरी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक पुन्हा एकदा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. गोड कुटुंबाची तिखट गोष्ट सांगणारा ’वडापाव’ या चित्रपटाची नुकतीच प्रसादने घोषणा केली असून लंडनमध्ये या चित्रपटाच्या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा संपन्न झाला.
'कच्चा लिंबू', 'हिरकणी', 'चंद्रमुखी' अशा एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा हरहुन्नरी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक पुन्हा एकदा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. गोड कुटुंबाची तिखट गोष्ट सांगणारा वडापाव या चित्रपटाची नुकतीच प्रसादने घोषणा केली असून लंडनमध्ये या चित्रपटाच्या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा संपन्न झाला.
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित " धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाला प्रदर्शित होउन दि. १३ मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेते प्रसाद ओक यांनी जनतेचे आभार मानले. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले. यानिमित्ताने प्रसाद ओकने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपट दुसरा तिसरा कुठला नसून "धर्मवीर" चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसाद येणाऱ्या नव्या भागालासुध्दाला मिळावा अशी आशा प्
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते.
साल २००१ रोजी गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दिघेंची भेट घेतली होती. मात्र तेव्हाचे शिवसेना नेते आणि आजचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र दिघे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेले नव्हते. आताही त्याच उद्धव ठाकरेंनी धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातील आनंद दिघेंचा अपघात व त्यांच्यावरच्या उपचारा
कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक
तिच्या डोळ्यातला चंद्र मावळात नाही...खरेच हिरकणीचे वर्णन करणारे अतिशय समर्पक शब्द आणि भावना असलेल्या 'हिरकणी' या चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे आज प्रदर्शित झाले. 'आईची आरती' हे चित्रपटातील नवीन गाणे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी गायले आहे.