जो मराठी तरुण गोविंदा रे गोपाळा म्हणत दहिहंडीत नाचताना दिसला नाही तो अंबानींच्या लग्नात नाचताना दिसला, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंवर केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत तेजस ठाकरेंवर निशाणा साधला.
Read More
तेजस ठाकरेंच्या नृत्य करतानाच्या व्हायरल व्हिडीओवर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. वडील नटसम्राट आणि लेक नृत्यसम्राट असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोघांवरही निशाणा साधला. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली.
केदारनाथमध्ये उद्धव ठाकरेंसमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे. बद्रीनाथच्या दर्शनाला उद्धव ठाकरे गेले असताना तेथे शिवसैनिक देखील हजर होते. तर यावेळी बेळगावमधल्या सीमा भागातील काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी केली. 'बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' "उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत!" अशी घोषणाबाजी करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून भारतातील कमी ज्ञात असलेल्या दुर्लक्षित प्रजातींवर 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'कडून महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. खास करुन पश्चिम घाटात अधिवास करणाऱ्या प्रदेशनिष्ठ प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कमी ज्ञात असलेल्या दुलर्क्षित प्रजातींच्या संशोधनाची गरज आणि त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता, याविषयी भूमिका मांडणारी 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'चे प्रमुख तेजस उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत. ( tejas thackeray )
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील बरे गावातून गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या प्रजातीला घाटियाना द्विवर्णा असे नाव देण्यात आले आहे. या खेकड्याच्या अंगावर दोन प्रकारचे रंग असल्याने या खेकड्याला घाटियाना द्विवर्णा असे नाव देण्यात आले आहे. ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन, भारतीय प्राणी सर्वेक्षण (पुणे) आणि कर्नाटक वन विभाग यांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनातून या खेकड्याची नोंद करण्यात आली आहे. या नवीन प्रजातींचे वर्णन करणारा संशोधन लेख ‘नौप्लियस’ या ब्राझिलियन क्रस्टेशियन स
शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत कलह सुरू आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त शिवसैनिकांनी जागोजागी बॅनरबाजी केली आहे. तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी ठिकठिकाणी होर्डिंग लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेजस ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघातही बॅनरबाजी केली आहे.
पालींच्या काही दुर्मिळ प्रजातींचा नव्याने शोध लागला आहे. शरीरावर उंचवटे, गोल बुबुळ आणि भरपूर खवले असणाऱ्या पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी अशा तीन दुर्मिळ पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.
मत्स्यपालनातील मागणीमुळे संवर्धन गरजेचे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.