सामान्य माणसापेक्षा अगदी आगळा असणारा बहिणाबाईचा जीवनप्रवास. स्थैर्य नसलेला. अस्थिर असलेला हा प्रवास. हक्काचं घर नसलेला हा प्रवास. माथ्यावर सावली नसली तरी भगवंतांची घनदाट सावली लाभलेला हा प्रवास. सामानाचं ओझं नाही की भार नाही. सगळा भार भगवंतावर सोपवलेला प्रवास! प्राक्तनाची पडणारी पावलं, त्याला परमार्थाची भक्कम साथ लाभून जीवनप्रवास सुखाचा करणारी बहिणा!
Read More