पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांचे ९ महिन्यांचे बाळ कुठे आहे? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या आदेशानंतर अखेर ते बाळ ताब्यात घेण्यात आले आहे.
Read More
(Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India) डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्षा निवास्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले आहे. मंगळवार, २० मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांकरिता ८ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य शासनाने हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५ महामंडळांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाचही महामंडळांचे अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. बुधवार, १४ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्याने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या भेटीचे काही फोटो पोस्ट करत रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत.
Changes in law are necessary to empower cooperatives CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे 'दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि'. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण' परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून आपण सारे याच क्षणाची वाट पाहत होतो. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.
(CM Devendra Fadnavis Gauravshali Maharashtra program) “मी तीनवेळा मुख्यमंत्री झालो. आधी सलग पाच वर्षे आणि त्यानंतर 72 तास. त्यामुळे सर्वांत अधिक आणि सर्वांत कमी काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. तर सर्वाधिक वेळा आणि सर्वांत कमी वेळ म्हणजे 72 तास उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. पण, महाराष्ट्रात सध्या असलेल्या समीकरणांची मुहूर्तमेढ त्या 72 तासांच्या काळातच रोवली गेली होती,” अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. 3 मे रोजी केली.
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती पुढे आली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत त्यांच्या दोन्ही बाळांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत २४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून शुक्रवार, दि. २ मे रोजी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स'चा शुभारंभ करण्यात आला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन गुरुवार, दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
(IMEC SUMMIT 2025) "एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था हे लक्ष्य ठेवून महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (आयमॅक) महाराष्ट्र पूर्णपणे सुसज्ज आहे. शिवाय पायाभूत सुविधांची कामे ही प्रामुख्याने प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आयमॅक केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर यात सहभागी सर्वच राष्ट्रांसाठी गेमचेंजर ठरेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'आयमॅक समीट २०२५'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
दि. १५ ऑगस्ट २०२५ पासून शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणार नाही, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिला.
हलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून सर्व व्हिसाधारक आणि अवैध पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
मुंबईत नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी (UMTA) बिल, २०२५'च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.
सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये म्हणजेच प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न तिप्पट म्हणजेच जवळपास १२२ कोटींची भरघोस वाढ नोंदवली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
"उबाठा गट या देशाचा इतिहास विसरलेला दिसतो. युद्धाची किंवा युद्धसदृश्य परिस्थिती असताना आणि देशावर हल्ला झालेला असताना, भारतातील राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. हा या देशाचा इतिहास आहे. मात्र अशा परिस्थितीत उबाठा गटाकडून विरोध करणे, उपहास करणे किंवा मूर्खासारखी वक्तव्ये करणे सुरू आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी केला.
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण देखील केले.
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिल
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान, माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फार जुने नाते असून आम्ही अधूनमधून भेटत असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्षामार्फत नाशिकमधील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी यांचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (Nashik Ring Road) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी दिले. तसेच नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मंगळवार, १५ एप्रिल रोजी सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
( One card for local, metro, mono and bus Devendra Fadanvis ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “येत्या महिनाभरात ‘मुंबई वन’ या सिंगल स्मार्टकार्डची अंमलबजावणी सुरू होईल,” अशी घोषणा केली आहे. “या एका कार्डच्या आधारे मुंबईमध्ये कोणत्याही वाहतुकीच्या पर्यायाने लोकांना प्रवास करता येणार आहे. लंडनच्या ‘ऑयस्टर’ कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुकर आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बसप्रवासासाठी वापरता येणार आहे.
छत्रपती शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. तर देश आणि जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
रायगडला केवळ पर्यटनस्थल नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
( maharashtra cabinet will be paperless ) फडणवीस सरकारच्या यापुढच्या कॅबिनेट ‘पेपरलेस’ होणार आहेत. राज्यात लवकरच ई-मंत्रिमंडळ प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार असून, असा निर्णय घेणारे करणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य ठरणार आहे.
Devendra Fadnavis भुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन, नव्याने निविदा काढण्यात याव्यात आणि ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिले.
( Mulund dumping ground ) मुलुंड कचराभूमीमधील (डंपिंग ग्राऊंड) कचऱ्यावर प्रक्रिया करून एका वर्षात तो हटवला जाणार आहे. महापालिकेने निवड केलेल्या जागेवर हा सर्व कचरा टाकला जाईल, अशी ग्वाही महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली.
मुंबई : ( ecosystem for investment in every district Devendra Fadanvis ) “महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागांत गुंतवणूक व्हावी, यासाठी ‘इकोसिस्टम’ तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी दिली.
( Chief Minister's Relief Fund Cell help )बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. मात्र, गावकऱ्यांच्या तत्परतेने, सरपंचाच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या त्वरित मदतीमुळे या मुलीचे प्राण वाचले. अवघ्या दोन तासांत १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. या मदतीमुळे हवालदिल झालेल्या मुलीच्या कुटुंबाला आधार मिळाला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ९ निर्णय घेण्यात आले आहेत.
( Chief Minister Devendra Fadnavis ramnavmi programe ) “प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावी, याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी केले. मानखुर्द येथे ‘संजोग सोसायटी’च्यावतीने आयोजित संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
(CM Fellowship Programme 2025-26) राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.