म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्
Read More
मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवार, ८ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली यामागचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
दत्ताजी भाले सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे किन्नर समुदायाच्या हितासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समुदायाच्या समस्या, उपाययोजना आणि भावी कामकाजावर चर्चा झाली. याच वेळी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर “किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांत” या नव्या परिषदेच्या डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले.
पोलिसांनी कालपासून सुरू केलेली दादागिरी आणि गुंडगिरी कधीही सहन करणार नाही. मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असून हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी, अशा शब्दात मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर येथील प्रकरणावर संताप व्यक्त केला
‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा आणि प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने दि. १८ जून, २०२५ ते १७ जुलै, २०२५ या कालावधीत राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार, ८ जुलै रोजी दोन्ही सभागृहात केले.
उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळ यांची औलाद आहे, असा हल्लाबोल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी केल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल 'व्हिट्स'च्या लिलावातील गैर प्रक्रियेचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने लिलावात राजकीय दबावाचा वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली.
अक्कलकुवा तालुक्यातील मृत अंगणवाडी सेविकेच्या नावे पगार उचलल्याच्या प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. या प्रकरणात बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकेला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, दि. ७ रोजी केली.
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या अनधिकृत गोदामांवर लवकरच कारवाई केली जाईल.तसेच या बांधकामांना अप्रत्यक्षपणे परवानगी देणाऱ्या किंवा कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ७ जुलै रोजी विधान परिषदेत दिली.
आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर आणि अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक वारशाला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नांतुन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंतचा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे ह्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार भोईर यांचे आभार मानले आहेत.
(Ashadhi Ekadashi 2025) पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह केली.
आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांचा महासागर आज दि. ६ जुलै रोजी बघायाला मिळाला. टाळ मृदुंगाचा गजर करत, हरी नामाच्या भक्तीरसात तल्लीन होऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात वारकऱ्यांमुळे अवघा परिसर भक्तीमय झाला. तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या पंढरपूरात दाखल झाल्यानंतर भाविकांनी पंढरपूरात एकच गर्दी केली. प्रशासनाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक
नुकताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. शनिवार, ५ जुलै रोजी त्यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
केंद्र सरकारने ‘वक्फ सुधाराणा कायद्या’अंतर्गत ‘एकीकृत वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास नियम, २०२५’ हे नवी नियमावली गुरूवार, दि. ३ जुलै रोजी अधिसूचित केली आहे. हे नियम वक्फ मालमत्तेच्या पोर्टल आणि डेटाबेस निर्मितीपासून नोंदणी, लेखापरीक्षण आणि देखभालीपर्यंतच्या विविध प्रक्रियांशी संबंधित आहेत.
"छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराज्याची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांन
शिक्षक परिषदेचे कार्य महाराष्ट्रात आता न थांबता अविरतपणे सुरू राहणार, असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे अ.भा राष्ट्रीय उपाध्यक्ष भिखाभाई पटेल यांनी केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
पानगाव इथे गावकर्यांनी ठराव संमत करून पारधी समाजाच्या दहा कुटूंबावर बहिष्कार टाकला. राज्यभरात या घटनेचा तिव्र निषेध होत आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चालू अधिवेशनात कायद्यात सुधारणा करणार ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांना ‘मकोका’ लावला जाणार आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
उत्तराखंडला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, ढगफुटी सदृश्यस्थिती झाली आहे. याचा फटका महाराष्ट्रातील दोनशे भाविकांना बसला आहे. यमुनोत्री धाम येथे दर्शनासाठी गेलेल्या ६०० भाविकांपैकी २०० जण हे महाराष्ट्रातील आहेत. सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली घोषणा; १२ वे प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वीकारला पदभार महाराष्ट्र भाजपचे १२ वे प्रदेशाध्यक्ष म्हणून आ. रविंद्र चव्हाण यांची मंगळवार, दि. १ जुलै रोजी बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे केंद्रीय निवडणूक अधिकारी किरेन रिजिजू यांनी भाजप महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात याबाबत घोषणा केली.
अमित साटम; आवर न घातल्यास कोणीतरी खान मुंबईचा महापौर होईल मुंबई आणि महानगर परिसरामध्ये गेल्या ११ वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत प्रकल्प मार्गी लावून शहर आधुनिक व सुरक्षित करण्याचे प्रयत्न होत असताना, मुंबईचा रंग बदलण्याचे काही घटकांचे प्रयत्न आहेत. मतांच्या राजकारणासाठी या शहराचे ध्रुवीकरण करण्याचा यामागे डाव असल्याचा दावा अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
समाजाला सुसज्ज स्थितीत आणण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न साकारायचे आहे - विवेक विचार मंच त्या दिशेने काम करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले. छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त विवेक विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. "हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. २९ जून रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकपार पडली.
उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेल्या व्यक्तीनेच पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी तो अहवाल स्विकारला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रवींद्र चव्हाण यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस कुणाच्या सोबत लढो किंवा स्वबळावर लढो त्याचा परिणाम आधीच ठरलेला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. रवींद्र चव्हाण यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
२८८.१७ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईतर्फे आज, रविवार दि. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला भाजपा विधान परिषद गटनेते, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन प्रथा आणि परंपरेनुसार व्हावे, यासाठी दीर्घकालीन, पर्यावरणीय उपाययोजनांचा समावेश असलेले आणि न्यायालयात टिकेल, असे धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २७ जून रोजी दिले.
मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकारांचा उपयोग करा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. गुरुवार, २६ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठवाडा आणि दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असल्यास शक्तीपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुरुवार, २६ जून रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘महावितरण’ने गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षांत कंपनीच्या वीजखरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. ‘महावितरण’ने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होईल. यानिमित्ताने ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
आणीबाणीच्या काळात जर आमच्या लोकतंत्र सेनानींनी लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतात कुठलेच अंतर राहिले नसते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुधवार, २५ जून रोजी राजभवन येथे 'संविधान हत्या दिवस' आणि आणीबाणी विरोधी संघर्ष केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ 'लोकशाही सोहळा' आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला आज ५० वर्ष पूर्ण होत असून त्याकाळात भारतात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुधवार, २५ जून रोजी राजभवन येथे 'संविधान हत्या दिवस' आणि आणीबाणी विरोधी संघर्ष केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ 'लोकशाही सोहळा' आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मंत्री दादाजी भुसे यांना पहिलीपासून हिंदी सक्तीबाबत सगळ्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली असून आमच्या मुलांच्या आणि मराठीच्या हिताचाच निर्णय आम्ही घेऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बुधवार, २५ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पाकिस्तान जगातील एक सर्वाधिक समस्याग्रस्त देश. सध्या त्यांच्याकडे असलेल्या समस्या या पराकोटीच्या वाढलेल्या आहेत. याच पाकिस्तानने लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्राच्या विकासास सुरुवात केल्याचा दावा अमेरिकेच्या एका अलीकडील अहवालात करण्यात आला. या क्षेपणास्त्राची क्षमता थेट अमेरिकेतील भूभाग गाठण्यास सक्षम असल्याचेही त्या अहवालात नमूद केले आहे. तथापि, या अहवालाबरोबरच काही मूलभूत, पण अत्यंत महत्त्चाचे प्रश्न निर्माण होतात.
कोणत्याही राज्याला स्थिर सरकार मिळाल्यानंतर त्या राज्यामधील मोठ्या शहरांबरोबरच इतरही लहान शहरे कशी कात टाकतात, याचा अनुभव नाशिककरांना आला. नाशिकच्या विकासाला अधिक गती मिळावी, यासाठी छगन भुजबळ यांनी नाशिकच्या हवाई कक्षा अधिक रुंदावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली असून विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ने घेतला. लगोलग या धावपट्टीसाठी 200 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मंगळवार, २३ जून रोजी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवनंतर तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना केला आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील टक्केवारीवरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गास मंजूरी ते महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा यासह विविध ८ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवार, २४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २४ जून रोजी ई-कॅबिनेटचा शुभारंभ करण्यात आला. 'ई-मंत्रिमंडळ : कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल' या उपक्रमांतर्गत मंत्रालयात पहिलीच ई-मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले.
पावसाळ्यात मान्सूनपूर्व आणि दरम्यानही पश्चिम रेल्वे मार्गातील भुयारी गटारांच्या स्वच्छतेवर आता कॅमेराची नजर ठेवली जाणार आहे. नेमके काय आहे हे तंत्रज्ञान ? पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली माहिती.
लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचे अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोमवार, २३ जून रोजी विधानभवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
"संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, संगीतामुळे आपल्या संवेदना चिरकाल जीवंत राहतात " असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव २०२५ आणि आशा रेडिओ पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते. दि. २१ जून रोजी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, येथे पार पार पडला. यावेळी महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण आशाताई भोसले, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सां
खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राने कुस्तीचे पदक पटकावण्यासाठी निश्चितपणे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शनिवार, २१ जून रोजी नागपूर येथे आयोजित येथे 'मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या' उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. संदीप जोशी, आ. कृपाल तुमाने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वारीच्या पवित्रतेसाठी आणि भक्तिमय वातावरण अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी मार्गावरील गावांमध्ये मद्य-मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी याबाबतची मागणी केली असून आता त्या मागणीला यश आले आहे.
राहुल गांधींनी गृहपाठ करावा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राहुल गांधींनी मेक इन इंडियाबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. रविवार, २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशई संवाद साधला.
सी पी टँक रोड येथील लक्ष्मी नारायण मंदिर, माधवबाग हॉल येथे २१ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दक्षिण मुंबई भाजपा अध्यक्षा शलाका साळवी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण मुंबई विभागातील डॉक्टर, वकील, व्यापारी ह्यांची बैठक पार पडली ह्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते मंगलप्रभात लोढा, तसेच आमदार, नगरसेवक अतुल शाह होते तसेच ह्या कार्यक्रमाचे निवेदन महेंद्र जैन यांनी केले.