२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात १.२७ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे तयार करण्यात आली आहेत. हा संरक्षण उत्पादनातला नवा विक्रम आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, "एका आर्थिक वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक संरक्षण उत्पादन आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा मैलाचा दगड आहे. भारताला जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे."
Read More
: भारताच्या संरक्षण निर्यातीने २०२२-२३ या आर्थिक वर्षांत आतापर्यंतची सर्वात मोठी निर्यात केली आहे. या काळात संरक्षण सामुग्रीची १५ हजार ९२० कोटींची उच्चांकी निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.