Deepak Karanjikar

राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून , सहकार क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार , भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा विश्वास

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले. या राष्ट्रीय सहकार धोरणाचे सर्व स्तरातून, विशेषतः सहकार क्षेत्राकडून, महिला आणि युवा पिढीकडून स्वागत केले जात आहे. भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनीही या धोरणाचे स्वागत केले असून राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read More

कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी “मराठवाडा वॉटर ग्रीड” संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे ६७ टीएमसी पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाईपलाईनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यात फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रीड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणाच्या आर्थिक

Read More

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या क

Read More

खासगी वन जमिनीवरील रहिवाशांचे राहत्या जागीच शासनाने पुनर्वसन करावे: प्रविण दरेकरांची सभागृहात मागणी

खासगी वन जमिनीवर राहत असलेल्या रहिवाशांचे राहत्या जागीच पुनर्वसन करावे, अशी मागणी आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात शासनाकडे केली.

Read More

पोलिसांना वर्षातून दोनवेळा आरोग्य तपासणी बंधनकारक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पोलिसांचे मानसिक आरोग्य, निवास आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष लक्ष पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, तसेच त्यांच्या निवास सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ५० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून दोनदा, तर ४० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून एकदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि निवासाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले.

Read More

मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले, असे गौरवोद्गार भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत काढले.

Read More

पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या

स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी रहिवाशांना दिला. रुपेश फाऊंडेशन आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी येथे आयोजित केलेल्या ‘स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन’ शिबिरात दरेकर मार्गदर्शन करीत होते.

Read More

मुंबई शिक्षक विकास मंडळाचे महायुवा संमेलन उत्साहात संपन्न!

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात

Read More

कर्तव्यपथा'वरुन सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल! प्रत्येकाला न्याय मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र

Read More

जागतिक महिला दिनाच्या चर्चेवर सभागृहात बोलताना भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

विधानपरिषदेत आज जागतिक महिला दिनाचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत सहभाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी विनातारण १० हजारापासून २५ हजार रूपये मुंबई बँक अत्यल्प व्याज दरात पैसे देईल आणि १५०० चे १५ हजार कसे होतील ही महिला दिनानिमित्त महिला भगिनींना मानवंदना देणार असल्याचे सांगितले.

Read More

श्वेतांबरा स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

(Devendra Fadanvis) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक साहाय्याने चारकोप ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावीवाटपाचा कार्यक्रम मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री खा. पीयूष गोयल, माजी मंत्री आ. योगेश सागर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर असतील.

Read More

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी घेतली पोलीस मुख्यालयात एसआयटी पथकाची भेट

Pravin Darekar राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारकडून कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्यात आली होती. आज या एसआयटी पथकाची भाजपा आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई पोलीस मुख्यालयात भेट घेतली आणि आपल्या

Read More

महाडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासकीय जमीन देण्याचा नवा जीआर काढा - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ( Mahad's Super Specialty Hospital ) उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार

Read More

ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेऊ

ठाणे : दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि. आणि सहकार विभाग ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पहिले महा अधिवेशन पार पडले. या महा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी फोनवरून संवाद साधत ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी, जे काही निर्णय घेणार आहात त्याची सोडवणूक करण्यासाठी माझ्या दालनात निश्चितपणे बैठक बोलवीण, असे आश्वासन दिले. तर मुंबईत स्वयंपुनर्विकास ज्याप्रमाणे होतो तशा प्रकारची गृहनिर्माण संस्थांची स्व

Read More

"अटलबिहारी वाजपेयींनी राजकारणात घालून दिलेले आदर्श विसरता येणार नाही"

मुंबई : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ( Atalbihari Wajpayee ) यांनी जीवनाची वाटचाल ध्येय्याप्रती, मुल्यांप्रती, कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वाना सोबत घेऊन आदर्श राजकारण काय असते ते पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत, पक्षाचे नेतृत्व करताना दाखवून दिलेय. वाजपेयी यांची कार्यसंपदा, साहित्य मोठं होते. राजकारणात त्यांनी घालून दिलेले आदर्श, पाळंमुळं कुणालाही विसरता येणार नाहीत, अशा शब्दांत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121