मुंबईमध्ये झालेल्या २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याच्या प्रर्त्यापणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मूळचा पाकिस्तानचा राहणारा राणा कॅनडाचं नागरिकत्व बाळगून होता. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी जोडला गेलेला दहशतवाद्यांच्या या म्होरक्याला अमेरीकेने २००९ साली अटक केली होती. दहशतवादी कारवाईंसाठी त्याची रवानगी भारतात होऊ नये यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. अखेर अमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका रद्द केली आहे.
Read More
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. तहव्वूर (६२) हा अमेरिकेच्या तुरुंगात बंद आहे. लॉस एंजेलिसच्या जिल्हा न्यायालयाने १६ मेच्या आदेशात म्हटले आहे की, ज्या आरोपांच्या आधारावर भारताने तहव्वूरच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, ते पाहता त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते.