उबाठा गटाचे चांदिवली विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. रविवार, २२ जून रोजी मंत्री आशिष शेलार आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले, असे गौरवोद्गार भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत काढले.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २५ येथील शौचालयाचे आणि ओम गगनगिरी सोसायटीच्या सभामंडपाचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आणि भाजपा सहसंयोजिका निशा परुळेकर यांच्या पुढाकाराने नुकतेच पार पडले.
स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी रहिवाशांना दिला. रुपेश फाऊंडेशन आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी येथे आयोजित केलेल्या ‘स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन’ शिबिरात दरेकर मार्गदर्शन करीत होते.
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या “खाजगी वने” म्हणून संरक्षित केलेल्या वन जमिनी “संरक्षित वन” क्षेत्रातून वगळण्याबाबतचा प्रवीण दरेकरांनी मांडलेला ठराव आज जिल्हा नियोजन समितीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबतचा पाठपुरावा केंद्र शासन, राज्य शासन व न्यायालयाकडे करण्यात येईल, असे आश्वासनही मुंबईचे पालकमंत्री ॲङआशिष शेलार यांनी समिती सदस्यांना दिले.
मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात
स्वातंत्र्यसंग्रामात केवळ हातातील शस्त्रास्त्रांनी नव्हे, तर आपल्या धारदार लेखणीनेही शेकडो लेखक, कवींनी ब्रिटिशांना अक्षरश: घायाळ गेले. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता प्रकाशित केल्यामुळे सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही क्रांतीची मशाल पेटवणारे कवी म्हणजे कवी गोविंद उपाख्य आबा त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा परिसस्पर्श झालेल्या या कवीच्या अनेक कविता ब्रिटिशांनी जप्त केल्या. त्यांच्या लेखनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रिटिश राजवटीला भीक न घा
मुंबईत सुरु असलेल्या गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासंदर्भात आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाकरिता अर्थ पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.
हा नवीन भारत आहे. तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर तुमच्यावर बॉम्बचा वर्षाव केला जाईल, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पाकिस्तान आणि चीनला दिला आहे. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बोरिवली पूर्व येथील नँसी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते उदघाटन पार पडले. यावेळी भर कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नँसी आणि सुकरवाडी एसटी डेपोच्या पुढील ३ महिन्यांत निविदा काढणार, अशी घोषणाच केली.
( pravin darekar on operation sindoor ) दहशतवादापुढे भारत झुकणार नाही, घरात घुसून कठोर कारवाई करील, माता, भगिनीसमोर निशस्त्र आप्तांना गोळ्या घालणाऱ्यांचा बदला त्यांच्या भूमीत जाऊ घेतला जाईल, हे पुन्हा एकदा देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "ऑपरेशन सिंदूर" च्या माध्यमातून दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
(Praveen Darekar takes charge as Committee Head of the Legislative Council Committee) विधानमंडळाच्या महत्वाच्या विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा आ. प्रवीण दरेकरांनी आज विधानभवन येथे जाऊन पदभार स्वीकारला.
विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा दरेकरांनी पदभार स्वीकारला
स्वयंपुनर्विकास योजना ही महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रात 'गेमचेंजर' ठरेल, असा विश्वास स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी शुक्रवार, दि. ३ मे रोजी व्यक्त केला.
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
( pravin darekar on sanjnay raut ) उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी पलटवार केला आहे. “संजय राऊत यांचे बोलणे कोत्या मनोवृत्तीचे असून रोज उठल्याबरोबर त्यांचा भोंगा वाजलाच पाहिजे. अशा प्रकारचा विषय घेऊन भावना भडकविता येतात का?” असा केविलवाणा प्रयत्न त्यांचा असल्याची टीकाही दरेकरांनी केली आहे.
Devendra Fadnavis भुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन, नव्याने निविदा काढण्यात याव्यात आणि ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिले.
( Inauguration development works in Poladpur taluka by MLA Pravin Darekar ) पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामांचे उदघाटन आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी रस्ता, कामथे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॅाक्रिट रस्त्याच्या कामासह कुलस्वीग बेवर्ज प्रा. लि. सावित्री पॅकेज अँड ड्रिंकीग वॅाटर प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. दरेकर यांनी पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका दूर करण्याचा प्रयत्न करू, अस
( self-redevelopment Pravin Darekar ) गुढीपाडवा म्हणजे केवळ नववर्ष नव्हे, तर नवीन संकल्प करण्याचा दिवस. या दिवशी अनेकजण संकल्प करतात. भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनीही “स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विशेषतः मराठी माणूस जो चाळीत राहतो, त्याला मोठे घर मिळावे,” हा माझा गुढीपाडव्यानिमित्ताने संकल्प असल्याचे प्रतिपादन केले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईतील फनेल झोनमधील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा करुन मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच फनेल झोनसारखे निर्णय स्वयंपुनर्विकास चळवळ पुढे घेऊन जाण्यास नक्कीच प्रोत्साहित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले गाणे आणि उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी युट्यूबच्या माध्यमातून हेच गाणे पुन्हा टीकात्मक आविर्भावात गाऊन दाखवल्यामुळे त्या दोघांवरही बुधवार, २६ मार्च रोजी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.
( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
( government bring a lake plan for fishermen in Konkan pravin darekar ) कोकणात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. पर्यटनसोबत कोकणच्या आर्थिक विकासाला मासेमारीतून मोठा उपयोग होणार आहे. ज्याप्रमाणे सरकार मागेल त्याला शेततळे देते त्याप्रमाणे कोकणात मच्छिमारांसाठी मागेल त्याला तलाव ही योजना आणणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना विचारला.
जोगेश्वरी भूखंड माफिया प्रकरणी काय म्हणाले प्रवीण दरेकर!
( Develop the historical footprints of Maa Jijau at Pachad Pravin Darekar ) राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ दर्जेदार पध्दतीने विकसित केले पाहिजे. तेथे दर्जेदार अशा कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत. समाधी स्थळ हे ऐतिहासिक पाऊलखुणा आहे, त्या टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेऊन शासनाने मूल्यमापन करावे, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
( Health Department take strict action against bogus doctors and hospitals Manisha Kayande & Pravin Darekar ) विधानपरिषदेत आज आमदार मनिषा कायंदे यांनी नाशिकच्या पंड्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरकारभाराबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी बोगस डॉक्टर, दवाखान्यांवर सार्वजनिक आरोग्य विभाग कठोर कारवाई करणार का, ? असा सवाल उपस्थित केला.
( incident in Nagpur was a pre-planned Pravin Darekar ) नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परीस्थिती हाताळत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली खरी मात्र आज या हिंसाचाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी या घटनेचा निषेध करत ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा मोठा आरोप केला. तसेच या घटनेमागील मास्टरमाईंड शोधून काढून दंगेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई कराव
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सोमवार, १७ मार्च रोजी सभागृहात केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार प्रविण दरेकर यांना अटक करण्याचा प्लॅन असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ११ मार्च रोजी केला. मुंबई शहरातील अभ्युदय नगर येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१ व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
( Pravin Darekar on ST employee get their salaries on time ) एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यांना ठरलेल्या तारखेला व वेळेत पगार मिळावा यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करणार का? आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित केला.
( pravin darekar on Dhangarwadi victims ) डोंगराला वणवा लागून त्या वणव्याची झळ रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात असलेल्या इंद्रदेव धनगरवाडीतील घरांना आणि गोठ्यांना बसली. या आगीत घरांचे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई शासनाने बाधितांना तात्काळ द्यावी, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेच्या सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली.
( Pravin Darekar ) सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआयमार्फत दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली.
विधानपरिषदेत आज जागतिक महिला दिनाचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत सहभाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी विनातारण १० हजारापासून २५ हजार रूपये मुंबई बँक अत्यल्प व्याज दरात पैसे देईल आणि १५०० चे १५ हजार कसे होतील ही महिला दिनानिमित्त महिला भगिनींना मानवंदना देणार असल्याचे सांगितले.
ठाणे शहरातील वाहतुकीच्या समस्येला ठाणे महानगरपालिका आणि नगररचना विभागाचा नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, अशी स्पष्ट भूमिका प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडली. विधान परिषदेत प्रविण दरेकर यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडी, वाहतूक पोलीस व टोईंग कंत्राटदारांचा गैरव्यवहार, महापालिका व नगर रचना विभागाचा नियोजनशून्य कारभार याविषयी नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून त्यासाठी निधीही पूर्णतः मंजूर झालेला नाही. शासनाने यात लक्ष घालून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली.
आज विधान परिषदेत दुग्ध विकास विभागाच्या तारांकित प्रश्नावर चर्चा सुरु असताना दुग्धशाळा वसाहतींच्या विकासासाठी शासन एकात्मिक योजना तयार करेल का, असा उपप्रश्न भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे थीम पार्क संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या थीम पार्क संग्रहालयाचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने घोषित करावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी संताप व्यक्त करत औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीवर राजद्रोह, देशद्रोह व राज्य अस्थिर करण्याच्या गुन्ह्याखाली तत्काळ अटक करावी, अशी मागणी सभागृहात केली आहे.
(Devendra Fadnavis) स्वयंपुनर्विकास नाही, हा तर आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण ‘श्वेतांबरा’चे उद्घाटन केले आहे. श्वेतांबरा चे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितले, तेव्हा खर्या अर्थाने स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते, हे माझ्या लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल, तर आत्मनिर्भरता आली,” असा विश्वास मु
''स्वयंपूर्ण विकास नाही हा आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण श्वेतांबरीचे उद्घाटन केलेले आहे. श्वेतांबरीचे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितलं तेव्हा खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते हे त्या मला लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आत्मनिर्भरता आली, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या
(Devendra Fadanvis) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक साहाय्याने चारकोप ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावीवाटपाचा कार्यक्रम मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री खा. पीयूष गोयल, माजी मंत्री आ. योगेश सागर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर असतील.
सत्तेचा दुरुपयोग करून नेत्यांना अडकविणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे वक्तव्य भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी गुरुवार, २१ फेब्रुवारी रोजी केले.
Pravin Darekar राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारकडून कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्यात आली होती. आज या एसआयटी पथकाची भाजपा आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई पोलीस मुख्यालयात भेट घेतली आणि आपल्या
विरोधकांना चितपट करत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस्ती जिंकले, असे प्रतिपादन भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केले.
मुंबईतील मूळ मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचे महत्व आणि राज्य सरकारची यातील भूमिका याविषयी स्वयंपुनर्विकासाचे जनक भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्याशी दैनिक 'मुंबई तरुण भारत'ने साधलेला संवाद
(Pravin Darekar) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. त्याला भाजप विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्यासारख्या महान सल्लागाराच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. ते स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहेत. संजय राऊत वास्तुशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषी असतील त्यांनी तो धंदा करावा. मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे दरेकर म्हणाले.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ( Mahad's Super Specialty Hospital ) उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार
मुंबई : संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी. कुणाचा उदय होतोय हे पाहण्यापेक्षा आपल्या पक्षाचा अस्त होतोय त्याची काळजी करावी. राऊत केवळ बोलघेवडेपणा करू शकतात. कुठलेही रचनात्मक, विकासात्मक भाष्य त्यांच्याकडून होऊ शकत नाही, हे महाराष्ट्र पाहतोय, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी केली आहे.
Konkan Mahotsav 2024-25 भाजपा आणि मुलुंड सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कोकण महोत्सव २०२४-२५" या भव्य सांस्कृतिक सोहळ्याला काल सायंकाळी भाजपा मुंबई अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री, आदरणीय ऍड. आशिष शेलार साहेब, विधान परिषद गटनेते, आमदार प्रवीण दरेकर जी आणि आमदार मिहीर कोटेचा जी यांनी उपस्थिती दर्शवली.