दापोली तालुक्यातील मांदिवली गावाचे उपसरपंचाने सापाला ठार करुन त्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला होता (snake killing in dapoli). यावर दापोलीतील वन्यजीव प्रेमींना आक्षेप घेतल्यावर दापोली वन विभागाने उपसरपंचाच्या विरोधात गुन्हा तर दाखल केला, मात्र त्याला न्यायालयात हजर केले नाही (snake killing in dapoli). वन्यजीव शिकारीच्या गेल्या काही प्रकरणांमध्ये दापोली वन विभागाने अशाच पद्धतीने 'बाॅण्ड'वर आरोपींना सोडले आहे. (snake killing in dapoli)
Read More
कोकणात उबाठा गटाला गळती सुरु असतानाच आता पुन्हा एकदा दापोलीतील पाच नगरसेवक उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करणार असल्याची माहीती आहे. दरम्यान, या पाचही नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याचेही सांगण्यात येत आहे.
(Ratnagiri Bus Accident) दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचा रविवार, दि. १२ जानेवारीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरीच्या शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळील एका वळणानजीक असलेल्या दरीत ही बस कोसळली. झाडाझुडपांमधून खाली घरंगळत जाताना बस त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून तिथेच अडकून पडल्याने जागेवर थांबली. जर ही बस पूर्णपणे दरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी दापोलीतून विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिलं आहे. तसेच पुन्हा एकदा शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखळी जाणारी 'एकदांडी' म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स' (Dipcadi concanense) ही प्रजात प्रथमच दापोली तालुक्यात बहरली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही निवडक सड्यांवर सापडणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते (Dipcadi concanense). या रोपण यशस्वी झाले असून या 'संकटग्रस्त' प्रजातीच्या संवर्धनाला हातभार लागला आहे. (Dipcadi concanense)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमंक काय घडतं? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आता एकीकडे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे खिचडी घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलायं.तसेच रवींद्र वायकरांवर ही ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे या तिन्ही घटनांचा वेध घेत आज आपण साई रिसॉर्ट प्रकरण, खिचडी घोटाळा, पंचतारींकित हॉट
'डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
केशवसृष्टी कृषी संशोधन संस्था १९८४ साली स्थापना झालेली नोंदणीकृत ‘धर्मादाय’ संस्था असून कृषी व कृषि पूरक व्यवसायाचे शिक्षण, प्रशिक्षण व प्रसार या क्षेत्रात कार्यरत आहे. कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास उत्तन कृषीचा एकच ध्यास म्हणजेच कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास... या ध्येयासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल या लेखात घेतलेला हा मागोवा...
अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत.
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले. यानंतर परब यांनी प्रतिक्रीया देत माजी खासदार किरीट सोमय्यांच्या विरोधात हक्कभंगाची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषद उपसभापती यांच्याकडे ही मागणी केली आहे.
दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरामध्ये बोटींवर जप्त करण्यात आलेल्या डिझेल साठ्याच्या मुळाशी जावून कस्टम विभाग शोध घेणार आहे. शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ५ च्या दरम्यान डिझेल तस्करी करणार्या सोन्याची जेजुरी बोटीवर रत्नागिरी कस्टम विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. बोटीतील १७ कंपार्टमेंटमधील २ कंपार्टमेंट रिकामे होते.
दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट संशयास्पद नाही, असा खुलासा तटरक्षक दलाने केला आहे. विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली आहे.शिवाय नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
शिवसेना आ. Yogesh Kadam यांनी गुलदस्त्यातली गोष्ट आणली बाहेर!
दापोलीत अनाधिकृत साई रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी वादात असलेले माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
निवडून येण्याची क्षमता नसून देखील केवळ उद्धव ठाकरेंच्या गुडबुक्समध्ये असल्याने मागच्या दाराने विधानभवनात दाखल झालेले अनिल परब आज आहेत कुठे? कधीकाळी शिवसेनेतर्फे कायद्याचा किल्ला लढवणारे परब स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने तोंडात मिठाची गुळणी भरून गप्प राहिलेत का? हे सगळे प्रश्न उपस्थित होतात कारण संजय राऊतांना अटक झाली तेव्हा परब गप्प राहिले. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत ते कुठेही दिसले नाहीत. हाल्ली उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला देखील अनिल परब दिसत नाहीत तिथे राष्ट्रवादीतून सेनेत आयात केलेले सचिन
महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील कांदळवन असलेल्या आणि कांदळवन नसलेल्या क्षेत्रावर निसर्ग वादळाचा झालेला परिणामांचा अभ्यास नुकताच प्रकाशित करण्यात आला. मंगळवारी आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते प्रकाशित करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत त्यांच्या विरोधातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. आता या संबंधात भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांनी ज्या विभास साठेंकडून जमीन विकत घेतली होती, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी केली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांनी सोमवारी (दि. ३० मे) ईडी कार्यालयात हजेरी लावली. अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर शुक्रवार, दि. २७ मे रोजी संजय कदम यांच्याही मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याचे समन्स ईडीने कदम यांना बजावले होते. या पार्श्वभूमीवर कदम हे ईडी कार्यालयात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.
ईडीकडून कारवाई सुरु झाल्यानंतर दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा करणारे शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवे पुरावे समोर आणले आहेत
भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप नेते निलेश राणे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते तोडण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. २६ मार्च) दापोलीत दाखल झाले आहेत. सोमय्यांना दापोलीत पाय ठेऊन देणार नाही असा ईशारा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरीट सोमय्या यांना देण्यात आला होता. मात्र समर्थकांच्या मोठ्या ताफ्यानिशी ते दापोलीत दाखल झाल्यचे यावेळी दिसून आले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्षकेंद्रीत केलं आहे.
'बर्ड फ्लू'च्या तपासणीसाठी नमुने पुण्यात
कोकणी माणूस कधीच कोणापुढे वाईट परीस्थिती असतानाही हात पसरत नाही. कोरोनाच्या प्रभावामुळे कोकणात निसर्ग चक्रीवादळाने जे नुकसान केले त्याची चर्चा झाली नाही. कोरोनाच्या आपत्तीमधून सावरण्या आधीच आलेल्या या वादळामुळे कोकणवासियांचे न भरून निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने ४ जून रोजी कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला. रायगड आणि दापोलीसह उत्तर रत्नागिरीतील अनेक किनारी भागांचे या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दापोली आणि मंडणगड भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु असून सुमारे २०० स्वयंसेवक कार्यरत आहेत.
कोरोनानंतर 'निसर्ग' वादळाचा फटका बसल्यानंतर आता कोकणवासीयांना प्रशासकीय जाचाला सामोरे जावे लागत आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या केंद्रीय पथकाची भेट घालून द्या, अशी विनंती करणाऱ्याच्या अपेक्षेने गेलेल्या ग्रामस्थांवर तहसिलदार धावून आल्याचा व्ही़डिओ व्हायरल झाला आहे. 'लिगल राईट्स ऑब्झवेटरी' (Legal Rights Observatory) या ट्विटर हॅण्डलद्वारे हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
लघुशंकेचा बहाणा करून कोरोना रुग्ण पळाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे घडली आहे. बुधवारी दापोलीत चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना उपचारासाठी आणण्यासाठी रुग्णवाहिका गावात गेल्या होत्या.
कांदे-बटाटे विकण्याच्या निमित्ताने तस्कर गावागावांमध्ये सक्रिय
दापोली म्हटलं की आपल्यासमोर हिरवीगार गच्चं गर्द झाडी, अथांग पसरलेला समुद्र आणि शांततेत वसलेली मंदिरं यांचं रमणीय चित्र उभं राहातं .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे तेज आज जग व्यापून राहिले आहे. या तेजाला आंतरिक साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाईंचा त्याग आणि कष्ट विसरून चालणारच नाहीत. रमाबाई आंबेडकरांचे दापोली येथील जन्मगाव वणंद हे आ. विजय(भाई) गिरकर यांनी ‘आमदार आदर्श गाव योजनें’तर्गत दत्तक घेतले. त्या वणंद गावाचे नंदनवन होण्याचा हा प्रवास...
दापोली-खेड महामार्गावर शुक्रवारी सकाळी डंपर आणि प्रवासी वाहनाच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी अंबेनळी घाटात कोसळलेली दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीतून काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.