DRP

टाटा समूहाचा कौतुकास्पद निर्णय! एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी 'विशेष ट्रस्ट'ची स्थापना, ५०० कोटींची देणगी

(Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्क

Read More

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात पायलटच्या चुकीमुळे? अमेरिकी वृत्तपत्राचे दावे एएआयबीने फेटाळले!

(AAIB slammed The Wall Street Journal Report) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयासमोर सादर केला. या अहवालामध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झालेला संवाद आणि इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अहवालावर अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राने वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कटऑफ मोडवर हलवल्याचा दावा केला होता. या दाव्याला एएआयबीने टीकात्मक प्रत्युत्तर देताना 'हा अहवाल अपू

Read More

विमान अपघातानंतर माध्यमांच्या वार्तांकनांमुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांना भावनिक ठेच पोहोचल्याचा आरोप!

विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read More

अपघातापूर्वी विमानाचे टीसीएम बदलण्याचा फ्युएल कंट्रोल स्विचमधील बिघाडाशी संबंध नाही : अहवाल

(Air India Plane Crash AAIB Report) गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल एएआयबीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला १२ जुलै रोजी सादर केला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेपूर्वी, एअर इंडियाने विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच आणि थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोन वेळा बदलले होते, असे अहवालात म्हटले आहे.

Read More

एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर

Read More

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात 'ब्लॅक बॉक्स'चेही नुकसान! डेटा रिकव्हर करण्यासाठी अमेरिकेत पाठवणार?

(Air India Plane Crash) एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला निघालेल्या AI 171 बोइंग ड्रीम लायनर 787 या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला होता. उड्डाणानंतर अवघ्या मिनिटांतच ते विमानतळाजवळील नागरी परिसरात कोसळले. या अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहितीचा उलगडा होणे गरजेचे आहे. मात्र भीषण स्फोटात ब्लॅक बॉक्सचे बरेच नुकसान झाल्यामुळे भारतात त्याच्यातील माहिती मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता हा ब्लॅक बॉक्स विश्लेषणाकरिता अमेरिकेत पाठविला जाणार आहे.

Read More

अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?

अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?

Read More

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट या

Read More

"मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा"; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी देऊ,

Read More

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे म

Read More

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच

Read More

"हा माझा पुनर्जन्मच..."; विमान दुर्घटनेतून बचावलेल्या भूमी चौहानने सांगितला अनुभव

(Bhumi Chauhan) गुजरातमधील भरूचमध्ये राहणारी भूमी चौहान अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातून सुदैवाने वाचली आहे. कारण भूमीला विमानतळावर पोहोचण्यास दहा मिनिटे उशिर झाला होता. त्यामुळे भूमीची फ्लाईट मिस झाली अन् सुदैवाने तिचा जीव वाचला. भूमीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ती अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाने प्रवास करणार होती. पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ती सरदार वल्लभभाई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दहा मिनिटे उशिरा पोहोचली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विमानतळावर तिला एन्ट्री न

Read More

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121