पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात यशस्वीपणे सुरू आहे. यात जानेवारी २०२२ पासून १५-१८ वर्षे वयोगटातील तरुणांचाही समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' या कंपनीने तयार केलेल्या 'कॉर्बेवॅक्स' (Corbevax) या लसीला औषध नियामक प्रशासनाने (डीसीजीआयने) सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी आपत्कालीन मान्यता दिली आहे. यामुळे भारतातील १२ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला वेग येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
'कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन'ला 'डीसीजीआय'ची अखेर मंजुरी
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोविड -१९ लस कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराकरिता औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) अर्ज केला आहे. व असा अर्ज करणारी ही पहिली स्वदेशी कंपनी ठरली आहे.