ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता ( code of conduct ) लागु आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ३१ ऑक्टोबर दुपारपर्यंत ३४८ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींमधील ३०६ तक्रारींचे १०० मिनिटांच्या आत जलद निराकरण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
Read More