लक्ष्मीबाई टिळक, शांताबाई शेळके यांच्या पासून सिंधूताई सपकाळ तसेच बालकवी यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्या वेशभूषा साकारलेल्या बालकांनी आपापसात साहित्यिक चर्चा केली.
Read More
रेस्टॉरंट मालकांनीही उघडपणे भारतीय कपड्यांना मागास म्हणून वर्णन करण्याचे काम सुरू केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो दिल्लीतील अंसल प्लाझामधील अक्विला रेस्टॉरंटचा आहे. तेथील एक कर्मचारी महिला पत्रकार अनिता चौधरी यांना सांगत आहेत की, साडी हा स्मार्ट पोशाख नसल्यामुळे ते त्यांना रेस्टाॅरंटमध्ये येण्यास परवानगी देऊ शकत नाहीत.
सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जिन्स किंवा टी-शर्ट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयातील पोशाखाबाबत सरकारने नवी मार्गदर्शिका लागू केली आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये काम करणार्या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड मार्गदर्शिका असणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचारी वर्गात काहीशी नाराजी असली तरीही सर्वसामान्यांनी मात्र, या निर्णयाचे स्वागत केली आहे.
बेळगावच्या डायसिसच्या बिशप डेरेक फर्नांडिस यांनी धारण केलेली हिंदू संतसादृश्य वेशभूषा. हिंदू वेशभूषा, राहणीमान धारण करून डेरेक यांना काय साध्य करायचे होते? अर्थात, त्यांच्या बचावाला नेहमीप्रमाणे त्यांचा गोतावळा आलाच. त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनुसार डेरेक यांनी वेशभूषा केली. त्यात काय झाले? उलट, स्थानिक लोकांच्या धर्मभावनेचा आदरच केला. आता यातले सत्य आणि तथ्य काय असेल हे उघड गुपित आहे.