राज्य व केंद्र शासनाच्या नामांतर धोरणाच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव ‘संत बाळूमामा नगर’ करण्याची मागणी सोलापूर येथील समाजसेविका माया श्रावण लवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडेही पत्राद्वारे निवेदन दिले आहे.
Read More
महाराष्ट्रात विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमधे विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमधे आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे. मात्र पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री एँड.आशिष शेलार यांनी नुकतेच दिले.
पश्चिम रेल्वेने भाईंदर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान आवश्यक देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवार, २४ मे आणि रविवार, २५ मे रोजी पहाटे घेण्यात येईल. ट्रॅक, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टमची स्थिती सुधारण्यासाठी देखभाल महत्त्वाची असून ब्लॉकच्या वेळेत जलद गाड्या त्यांच्या नेहमीच्या ट्रॅकवरून धावणार नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर हल्ले केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठीकत पाकीस्तानच्या ठिकाणांचे झालेले नुकसान सॅटलाईट चित्रांच्या सहाय्याने दाखवले. पण पाकिस्तान ने हे सगळे खोटे आहे, असा दावा केला होता. मात्र, आता ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका रिपोर्टने पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी वाढेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. चीनला पर्याय म्हणून भारताकडे संपूर्ण जग आशेने पाहत असून, जगाचे उत्पादन केंद्र होण्याकडे भारत म्हणूनच निश्चितपणे वाटचाल करत आहे.
( Uddhav Thackeray presence in the legislature ) आमदारपदाला महाराष्ट्रात फार महत्त्व आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी वाचा फोडणारा ‘हितदर्शी’ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तो करीत असतो. आ. उद्धव ठाकरेंची कृत्ये मात्र याला अपवाद ठरली आहेत. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यापासून त्यांचा विधिमंडळाशी संबंध केवळ ‘सही’पुरताच आला असून कामकाजातील सहभागही शून्य मिनिटांचा असल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असतानाच आता त्याचे गाणेही आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. नुकताच अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे ‘आया रे तुफान’ या गाण्यावर जबरदस्त डान्स सादर करण्यात आला. प्रसिद्ध डान्सर लॉरेन गॉटलीब आणि रोहित गिजारे यांच्या टीमने केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कसं असेल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचे संपूर्ण वेळापत्रक? Vidhansabha
राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करतायेत हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘न्यूयॉर्क टाईम्स’ने आपल्या 7 ऑगस्टच्या अंकामध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जे हल्ले होत आहेत, ते हल्ले म्हणजे ‘सूडहल्ले’ आहेत, अशा आशयाचा मथळा देऊन त्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. पण, ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने जो मथळा दिला होता, त्याची तीव्र प्रतिक्रिया ‘नेटिझन्स’मध्ये उमटली. अनेक राष्ट्रीय विचारांच्या समाजमाध्यमांतून ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या मथळ्यावर टीका करण्यात आली.
ओटिटी विश्वातील मोठी बातमी पुढे येत आहे. व्हिडिओ ओटिटी सर्विसेस देणारी सुप्रसिद्ध कंपनी अमेझॉनने एमएक्स प्लेअर (MX Player) चे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. भारतात व्यवसायिक सेवा वाढवण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय अमेझॉनकडून घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मुस्लीम महिला सबा नाज आणि तिच्या दोन मुलांना सलीम पन्नी नावाच्या कट्टरपंथीने त्याच्या पाच ते सहा साथीदारांसोबत घरात घुसून जबर मारहाण केली. आई सबा आपल्या दोन मुलांसोबत राजकीय गप्पा मारत होती. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ निवडून येणार, असा विश्वास सबा नाज यांनी व्यक्त केला होता. दरम्यान त्यांचा हा संवाद बाहेरून जाणाऱ्या सलीमने ऐकला आणि त्याला संताप अनावर झाला. तो आपल्या सहा ते सात मित्रांसोबत एकटी असलेल्या सबाच्या घरी शिरला.
अलीकडे मराठी कलाकार एकामागून एक लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपासून अभिनेता प्रथमेश परब लग्न करणार अशी चर्चा सुरुच होती आणि अखेर तो क्षण आलाच. दगडूला त्याच्या जीवनातील प्राजू भेटली आणि तो बोहल्यावर चढला. १४ फेब्रुवारीला प्रथमेशचा थाटामाटात साखरपुडा झाला. त्यानंतर सर्व चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता होती. अखेर प्रथमेश लग्नबंधनात अडकला आहे. क्षितीजा घोसाळकर सोबत प्रथमेशने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
मुझफ्फरनगरमध्ये टाइम बॉटल बॉम्ब बनवणाऱ्या जावेदच्या अटकेनंतर पोलिसांनी एसटीएफच्या साहाय्याने मुख्य सूत्रधार इमराना हिला अटक केली आहे. दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी पोलीसांनी तिला तिच्या घरातून अटक केली. आता तिची चौकशी सुरु आहे. एसटीएफनंतर दिल्लीची आयबी टीमही इमरानाची चौकशी करत आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात असे उघड झाले आहे की, इमराना १५ वर्षांपूर्वीपर्यंत भट्टीवर मजूर म्हणून काम करत होती, आज तिच्याकडे अनेक घरे आणि प्लॉट आहेत. याशिवाय ती महागड्या कारमधूनही प्रवास क
सोमवार, दि. २२ जानेवारी हा दिवस जगभरातील तमाम हिंदूंसाठी आणि भारतीय संस्कृतीवर ज्यांचा विश्वास आहे, त्यांच्यासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. हजारो वर्षांच्या संघर्षानंतर भारतीय संस्कृतीचे, अस्मितेचे प्रतीक असलेल्या रामललाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील रामजन्मभूमीच्या उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात झाली. ’हे विश्वची माझे घर’ असे मानणार्या भारतीय संस्कृतीचा राम हे विश्वरुपच. त्यामुळे रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा जगभरात झाली. पण, या चर्चेला नकारात्मकतेकडे नेण्याचे काम पाश्चिमात्य आणि ‘अल जजीरा’
अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जगभर जय्यत तयारी सुरु आहे. दि. २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील ११,००० मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यासोबतच जगभरातील राम भक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे.
२२ जानेवारी २०२४ हा दिवस केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी अवघे जग आतूर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जगातील तब्बल १६० देशांत यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, त्याचवेळी अयोध्येतून त्याचे थेट प्रक्षेपणही होणार आहे.
टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने 10 इस्रायली आणि ४ थायलंड नागरिकांसह 14 हून अधिक ओलिसांना हमासच्या बंदिवासातून सोडल्याची माहिती दिली आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी हमासने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे इशारा म्हणून दोन दुहेरी रशियन-इस्त्रायली नागरिक, येलेना ट्रुपानोव आणि तिची आई इरेना टाटी यांना सोडले. त्यानंतर आई आणि मुलीला इस्रायलला परतल्यानंतर शेबा मेडिकल सेंटरमध्ये आणण्यात आले.
स्ट्रीक्स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन केलेल्या हेअर केअर, कलर,टेक्स्चर व स्टाइलसाठी प्रोफेशनल उत्पादक श्रेणीने प्रोफेशनल्सना कट, कलर व स्टाइलच्या क्षेत्रात सन्मानित करणारी स्पर्धा ' स्ट्रीक्स प्रोफेशनल टाइम्स इंडिया हेअर स्टाइल आयकॉन २०२३ ' च्या विजेत्यांची घोषणा केली. प्रोफेशनल्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही स्पर्धा केशभूषा उद्योगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा शोध घेते, ज्यांचे परीक्षण जोकिम रुस, योली टेन कॉपेल,विपुल चुडासामा,आणि सॅव्हियो जॉन परेरा यांसार
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान १७ ऑक्टोबर रोजी गाझा शहरातील अल-अहली हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला झाला होता. यात ५०० जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला इस्रायलने केल्याचा दावा करण्यात येत होता. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त वारंवार प्रकाशित केले होते.
कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए (Dearness Allowance) मध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याशिवाय ६ रबी पिकांसाठी एमएसपी ( Minimum Support Price) मध्ये ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
शिवराज अष्टकातून लोकांपर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचवणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा इतिहासातील महत्वाचे पान उलगडणार आहेत. शिवरायांचा छावा हा चित्रपट धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. ‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहे. त्यामुळे हा चित्रपट टाइम्स स्क्वेअरवर मोशन पोस्टर प्रदर्शित करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
न्यूजक्लिक ऑनलाइन मीडिया आउटलेटचा संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन प्रमुख अमित चक्रवर्ती यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयाने बेकायदेशीक कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्ग (युएपीए) दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हे निर्देश दिले आहेत.
आपल्या देशात एखाद्या साध्या नेत्याकडून त्याच्या खात्याचा पदभार काढून घेतला, तरी राजकीय तर्कवितर्कांना उधाण येते. त्यातच तो मंत्री कुणी दिग्गज असेल तर मग विचारायलाच नको म्हणा. राजकारणातील बदलते वारे पाहता, अशाप्रकारे होणारे खांदेपालट ही खरं तर राजकीय पक्षांसाठी तशी ‘रुटीन प्रॅक्टिस.’ पण, चीनमध्ये शी जिनपिंग यांची एकाधिकारशाही प्रस्थापित झाल्यापासून अशाप्रकारे उच्चपदस्थ अधिकार्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत हकालपट्टीचा नवीन पायंडाच पडलेला दिसतो. काही महिन्यांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग एकाएकी गायब झाले
"भारताने जी-२० शिखर परिषदेतून खुप काही मिळवलं. जी-२० शिखर परिषदेच्या माध्यमातून भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर स्वत:ला अधिक मजबूत बनवलं. भारत एक असा देश आहे, ज्याला अमेरिका आणि रशिया दोघेही पाठिंबा देतात." हे शब्द आहेत, चीनीच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ग्लोबल टाईम्स न्यूज पेपरच्या संपादकीय लेखातील. १० महिने, ६० शहरं, २०० बैठका आणि शेवटी ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेली जी-२० शिखर परिषद. मागच्या एक वर्षापासून देशात सर्वाधिक चर्चेत राहिलेला शब्द कोणता असेल तर तो म्हणजे जी-२०.
दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेचा रविवारी समारोप झाला. या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात आले होते. त्यामुळेच भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेकडे जगाच्या नजरा खिळल्या होत्या. जगभरातील माध्यमांनी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या जी-२० च्या बातम्यांकडे विशेष लक्ष दिले.
‘भारत महोत्सव’, ‘आझादी का अमृत महोत्सव’ ते ‘अमृत काल’ घोषणेपर्यंतचा भारताच्या प्रवासाचा भव्य सोहळा २६ ऑगस्ट २०२३ रोजी, न्युयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर प्लाझा येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. एक भारत' च्या एकात्म भावनेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने नवीन उंची गाठली. न्यूयॉर्कमधील भारताचे कौन्सिल जनरल रणधीर जैसवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अमृता फडणवीस, डेप्युटी कमिशनर दिलीप चौहान हे विशेष अतिथी म्हणून सन्मानित होते. कौन्सिल जनरल यांच्या कार्यालयात झ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची परिक्षा १ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे. तर इयत्ता बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चांद्रयान ३ मोहीम फत्ते करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरविणारा पहिला देश म्हणून बहुमान मिळविला. सबंध जगभरातून इस्त्रोच्या अतुलनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाले. त्यातच आता लिंक्डइन या वाणिज्य आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित वेब पोर्टलवर एका पोस्टने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पिरामल इंटरप्रायझेसचे ग्रुप हेड राजीव बॅनर्जी यांनी इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहीमेच्या यशावर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान’ उतरवण्याचा ऐतिहासिक पराक्रम भारताने केला आणि संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले. अवकाशातील महासत्तांमध्ये भारताचा झालेला समावेश साहेबांच्या इंग्लंडला पचनी पडलेला नाही, म्हणूनच त्यांची पोटदुखी सुरू झाली आहे. ‘बीबीसी’ने त्याबाबत केलेले वार्तांकन हे त्याचेच लक्षण!
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षाही कमी काळ शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज आतापासूनच लावला जात आहे. दरम्यान, टाईम्स नाऊ ईटीजीने या वृत्तसंस्थेने २०२४ च्या निवडणूकीच्या आधी ओपिनियन पोल केला आहे. यामध्ये काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
चीनची अर्थव्यवस्था एखाद्या ‘बॉम्ब’सारखीच! कारण, ती कधीही फुटू शकते. चीन सगळ्यात वाईट अर्थव्यवस्थेच्या काळाला सामोरा जात आहे,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन नुकतेच म्हणाले. इतके बोलूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी चीनचा फक्त संताप अन् संताप होईल, मात्र जगाला खरे वाटेल, अशीही टिप्पणी केली. बायडन पुढे म्हणाले की, “वाईट माणसं वाईट काळात आणखीन वाईट वागतात.” अर्थात, वाईट माणूस म्हणजे चीन, असे बायडन यांचे म्हणणे.
रविवारी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका अहवालाने जगभरात खळबळ उडाली. या अहवालाने चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड तर केलाच. पण, त्यासोबतच सर्वाधिक चर्चा रंगली ती ‘आयटी’ क्षेत्रातील दिग्गज अमेरिकी उद्योजक नेव्हिल रॉय सिंघमची. हाचं नेव्हिल रॉय सिंघम चिनी कम्युनिस्ट पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी जगभरातील माध्यम संस्थांना, राजकीय पक्षांना आणि ‘थिंक टँक्स’ला फंडिंग करत होता, असा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. अशी फंडिंग भारतातील ’न्यूज क्लिक’ नावाच्या न्यूज संकेतस्थळालाही करण्यात आली. त्
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेली घोषणाबाजी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांमुळे दि. ७ ऑगस्ट रोजी लोकसभेचे कामकाज एकदाचे तहकूब करण्यात आले. एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. तेव्हाच विरोधी पक्षांचे खासदार मणिपूरच्या मुद्द्यावर घोषणा देत सभापतींच्या आसनाजवळ आले. यावेळी त्यांनी काही फलकही फडकावले. दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर चीनच्या सहकार्याने भारताविरोधात वाताव
चीन सरकारने २००५ पासून २०१४ पर्यत काँग्रेसला पैसे दिले होते. त्यामुळे "राहुल गांधीकी नफरतकीं दूकानमें चायनीज सामान!", अशी टीका भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर चीनच्या सहकार्याने भारताविरोधात वातावरण निर्माण केल्याचा आरोप दुबे यांनी केला.
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल कनाल यांचा फोटो झळकला आहे. येथे फोटो लागणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल हे काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात आले. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंसह, खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असा तिघांचा फोटो न्यूयॉर्क टाइम्समध्ये झळकला आहे.
आपण म्हणत आलोत ’उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी’ नाही, तर जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करून ’छत्रपती’ होण्याचे स्वप्न लहान शिवबांच्या मनात पेरलच नसतं. म्हणूनच त्यांच्या चारित्र्यातून उद्योग-व्यवसाय कसा करावा, यशस्वी उद्योजक कसं व्हावं, याचीही प्रेरणा आपल्याला मिळू शकते.
निवडणुकीदरम्यान आकाशवाणी आणि दूरदर्शनवर राजकीय पक्षांना दिले जाणारे वेळ आता ऑनलाइन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने, राजकीय पक्षांद्वारे सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापरासाठी विद्यमान योजनेत सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञानप्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल टाइम व्हाउचर जारी करण्याची तरतूद सादर करून हे केले गेले आहे. या सुविधेमुळे, राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान वेळेचे व्हाउचर मिळवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी ECI/CEO कार्यालयात पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणा, सर्व भागध
पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट शून्य असला तरी सर्जिकल मायक्रो स्कोपच्या साहाय्याने त्यांच्या शरीरातील स्पर्म शोधून काढता येतो. याला मायक्रो टिसा असे संबोधले जाते. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट शून्य असल्यास बहुतांश आयव्हीएफ सेंटर मध्ये ते दाताकडून घेतले जातात. मात्र मायक्रो टिसा या पध्दतीचा वापर करणारे आयव्हीएफ स्पेशालिस्ट डाॅक्टर महाराष्ट्रात केवळ दोनच आहे. अशा पध्दतीची उपचार आता डोंबिवलीत मिळणार असल्याने आई बाबा होता न येणाऱ्या दांपत्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. या पध्दतीचा वापर करून ३५ टक्के जोडप्यांना स्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशविदेशात भारताची प्रतिमा दिवसेंदिवस अधिक उज्वल होत असून, मोदी यांच्या नावाचा डंका सुरूच आहे. त्यामुळे विरोधक त्यातही डाव्या विचारसरणीच्या बोरुबहाद्दरांकडून ‘अंधभक्त’, ‘गोदी मीडिया’ अशा शब्दांत टीका-टिप्पणी केली जाते. मोदी यांच्या कर्तृत्वाचा करिष्मा केवळ भारतातच आहे, असे नाही आजवर त्यांनी ज्या-ज्या देशांना भेटी दिल्या तेथील नेते आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने मोदी यांचे स्वागत करत गुणगान गायले, ते पाहता त्यांनाही आपण ‘अंधभक्त’ म्हणाल काय? मोदी यांच्या अलीकडच्या दौर्
डॅनियल एल्सबर्गने अमेरिकन युद्धखात्याने म्हणजेच पेंटेगॉनने ‘आण्विक युद्ध कार्यक्रम’ या विषयावर बनवलेल्या मजकुराची तब्बल सात हजार पाने ’न्यूयॉर्क टाईम्स’च्या स्वाधीन केली. दि. १३ जून, १९७१ या दिवशी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने या ’पेंटेगॉन पेपर्स’वर आधारित पहिला लेख प्रसिद्ध केला आणि अमेरिका हादरली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वास्तवाची जाण असून ते जनतेची नाडी अतिशय नेमकेपणाने ओळखण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमाचाही मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वृत्तपत्राने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्रात मुजिब मशाल यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेस ‘डिकोड’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत माता की जय! चा गजर केला. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये २३ मे रोजी 'मोदी-मोदी'चा आवाज घुमला. पंतप्रधान मोदींनी येथे २० हजारांहून अधिक भारतीयांना संबोधित केले. ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज म्हणाले की, "पीएम मोदी हे बॉस आहेत!" भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. ऑस्ट्रेलियात मोदींच्या उपस्थितीत सिडनीच्या पश्चिमेकडील हॅरिस पार्कचे नामकरण 'लिटिल इंडिया' करण्यात आले. हॅरिस पार्कमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे.
जपान प्रतिनिधी - जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जपानमधील वाकायामा शहरात भाषणादरम्यान एका व्यक्तीने स्मोक बॉम्ब फेकल्याची धक्कादायक माहिती मिळते आहे. मात्र बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ‘द जपान टाईम्स’च्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार होते, त्याआधीच हा स्फोट झाला.
न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य काही परदेशी प्रसारमाध्यमे सातत्याने भारताविषयी द्वेष व्यक्त करत असतात. त्यामुळे अशा प्रसारमाध्यमांकडून भारतास लोकशाही शिकण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतविरोधी परदेशी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी लगाविला आहे.
महाराष्ट्राच्या मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचे सोमवार, दि. ६ मार्च रोजी निधन झाले. मुंबईतील अंधेरीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वि. वि. करमरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये, तर अर्थशास्त्रात एम.ए.चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. कारण जसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य समर्थक आहेत, तसेच परदेशात देखील तरूणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला लागली आहे. त्यामुळेच न्यू यॉर्क येथे कामानिमित्त असलेल्या काही तरूणांनी त्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे केक कापून साजरा केला.
दि. २८-२९ जानेवारीला नाशिकला अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनेक सरकारमान्य विद्वान आणि साहित्यिकांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाच्या दोन दिवसांत पाच परिसंवाद होणार आहेत. परिसंवादांपैकी पहिला परिसंवाद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘मुस्लीम : प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि दुसरा ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर होणार आहे. हे दोन्ही परिसंवाद हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तरीही या परिसंवादात पारंपरिक दृष्टिकोनातून ज्यांना ‘उजवे विचारवंत’- 'A
विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी महामोर्चा आयोजित केला असून, मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलीये. मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी 13 अटी घातल्या आहेत. सकाळी 11 वाजता हा मोर्चा मुंबईतील रिचर्डसन्स क्रुडास मिल पासून निघणार असून, टाइम्स ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे.
'बिझनेस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहातील 'टाटा कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेड' (TCPL) बिस्लेरी खरेदी करणार आहे. हा करार झाल्यानंतरही विद्यमान संचालक मंडळाकडून कंपनीने व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. बिस्लेरी कंपनीचे भारतासह इतर देशांमधील मिनरल वॉटरच्या बाजारपेठेवर मोठे वर्चस्व आहे. मागील तीन दशकांपासून अधिक काळ मिनरल वॉटरच्या बाजारपेठेत वर्चस्व असणारी बिस्लेरी कंपनी ही आता 'टाटा' समूहाच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. टाटा समूह बिस्लेरी कंपनी सहा ते सात हजार कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे. लवकरच हा