(Harshwardhan Sapkal) "आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील", असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलिबाग येथील युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी केले आहे.
Read More
काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोलेंचा पत्ता कट करण्यात आला असून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियूक्ती करण्यात आली आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली.
पक्षाने संधी दिल्यास प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडेन, असे विधान काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केले आहे. मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीशी त्यांनी बोलताना आपली ईच्छा बोलून दाखवली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोलेंचा पत्ता कट होणार का? अशा चर्चा सुरु आहेत.
(Prithviraj Chavan) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी पुन्हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्याची साद घातली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अर्ज मागे घेण्यापर्यत वेळ आहे अस त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशुन म्हटलं आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर संतापल्याचे वृत्त होते. मात्र अजित पवार यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे म्हणत याविषयावर पडदा टाकला.
र्चेत राहण्यासाठी कायम अशी वक्तव्ये करायची आणि त्यावरून वादंग निर्माण झाला की, सपशेल माघार घ्यायची, हे म्हणा राऊतांसाठी अजिबात नवीन नाही. काही दिवसांपूर्वी संपुआच्या अध्यक्षपदासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे राऊतांची आता चांगलीच कोंडी झाली.