Conflict

इराण 'होर्मुझ'चा जलमार्ग बंद करण्याच्या तयारीत! भारतासह जगाच्या व्यापारावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर...

Strait of Hormuz : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर चवताळलेल्या इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला आहे. यानंतर इराण कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता इराणच्या कायदेमंडळाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदी निर्णयाला मान्यत

Read More

"भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये मध्यस्थी स्वीकारणार नाही", पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे फोनवर चर्चा! मोदींनी स्पष्टच सांगितले...

(PM Narendra Modi) कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर जी-७ शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट होणार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत लवकर परतल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोघांमध्ये फोनवरुन ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल ट्रम्प यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र सचि

Read More

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. एअर

Read More

"भारताचं राफेल विमान पाकिस्ताननं पाडलं का?" या प्रश्नावर ए. के. भारती यांनी दिलं उत्तर! म्हणाले, "प्रश्न हा..."

(India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत

Read More

India-Pakistan Conflict : आयातींनंतर आता पाकिस्तानी जहाजांनाही भारतीय बंदरात 'नो एन्ट्री'! भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका

(Ban On Pakistani Ships) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करणे, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना हद्दपारीचे आदेश देणे, याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि एक्स हँडल्सवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली. अशात पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आय

Read More

युद्धाच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली! २९ जिल्ह्यात बसवले सायरन, मोबाईल बंद ठेवण्याच्या सूचना

(Pakistan Installed Sirens In 29 Districts Of Khyber Pakhtunkhwa) युद्धाच्या भीतीने भेदरलेल्या पाकिस्तानात नागरिकांना सावध करण्यासाठी भोंगे बसवण्यात आल्याची माहिती आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी मंत्र्यांकडून सातत्याने 'भारत कधीही हल्ला करू शकतो' अश्या आशयाची विधानं केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेपासून (LoC) अनेक किलोमीटर दूर असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील २९ जिल्ह्यांमध्ये सायरन प्रणाल

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री क्षेत्र नाणीजधामहून हिंदू हुंकार

"भारतीय संस्कृतीने कधीही कुणावर आक्रमणे केली नाहीत उलट ज्या शरणार्थींना आश्रयाची गरज होती त्यांची मदत केली. पारसी, ज्यू किंवा अन्य कुठल्याही समाजाला त्यांच्या देशातून हुसकावण्यात आले त्यांना भारतीय संस्कृतीने आपल्यात सामावून घेतले. हा भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा मोठेपणा आहे. शिवाय आपल्या संतपरंपरेने दुबळ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना अध्यात्मिक शक्ती देण्याचे काम केले. म्हणूनच आपली संस्कृती हजारो वर्षे टीकू शकली.", असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121