पावसाळ्यात वाहनांची विशेषत्वाने चारचाकींची जरा अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी निश्चितच विमा संरक्षण हा एक उत्तम पर्याय. त्यानिमित्ताने आजच्या लेखात वाहनांसाठीच्या विमासंरक्षणाची सविस्तर माहिती करुन घेऊया...
Read More
पालकांच्या दुर्दैवाने किंवा त्या बालकांच्या दुर्दैवाने काही पालकांना जन्मत:च दोष असलेली काही ‘खास’ मुले त्यांच्या पदरी जन्माला येतात. या बालकांची विशेष काळजी घ्यावी लागते. यांच्या पालनपोषणासाठी सामान्य मुलांपेक्षा जास्त खर्च होतो. परिणामी, अशा मुलांना आरोग्य विम्याचे काय संरक्षण आहे, याविषयी आजच्या लेखात माहिती करुन घेऊया.
‘आरसेप’च्या माध्यमातून भारताची बाजारपेठ आपल्या वस्तू व उत्पादनांच्या माध्यमातून काबीज करण्याचा चीनचा मनसुबा होता. मात्र, नरेंद्र मोदींनी ‘राष्ट्रहित सर्वोपरी’चा मूलमंत्र जपत ‘आरसेप’वर स्वाक्षरी केली नाही व आमच्या अटी मान्य झाल्या तरच आम्ही त्यात सामिल होऊ, हा संदेशही दिला. आशियात आपली दादागिरी कायम राखण्याचा चीनचा इरादा मात्र यामुळे धाराशायी पडला.
२०१४ साली महाराष्ट्रामध्ये कुपोषणामुळे मृत्यू पावणाऱ्या बालकांचे प्रमाण १२.६ टक्के होते. ते २०१८ साली ६.४ टक्क्यांवर आले. इतकेच नाही तर गेल्या ४ वर्षांत ४९ हजार कुपोषित बालकांना वाचवण्यात महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या योजनांना यश आले आहे.