अक्षय्य तृतीया, हिंदु धर्मातील एक पवित्र आणि शुभ सण मानला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करुन संपूर्ण घर स्वच्छ केले जाते. देवाची पूजाही केली जाते. दाराला सुंदर तोरण घराबाहेर सुबक रांगोळी काढली जाते.
Read More
प्रत्येक कोकणी माणसाच्या घराच्या बांधावर असणारा आंबा म्हणजे रायवळ. हापूस आंब्याच्या झगमगाटात दुर्लक्षित राहिलेला रायवळ आंबा टिकवणे म्हणजे आपल्या इतिहासाला, संस्कृतीला आणि चवीला अभिवादन करणे होय. त्याविषयी आढावा घेणारा हा लेख...
दिवाळी म्हटलं की सर्व प्रथम डोळ्यासमोर येतात ते म्हणजे फराळाचे पदार्थ. वर्षभर फराळांचे पदार्थ बाजारात मिळत असले तरी दिवाळीत त्यांना विशेष मागणी असते. त्यातही तयार फराळाला ग्राहकांकडून विशेष पसंती दिली जाते. पण यंदा फराळांच्या पदार्थांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळे तयार फराळाला महागाई ची फोडणी बसली आहे.
अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठित कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आंबा-काजू उत्पादकांसाठी राज्य सरकारतर्फे मोठी घोषणा करण्यात आली असून कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मुंबई : विक्रांत आचरेकर फाऊंडेशन च्या वतीने मुंबईच्या दादर भागात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथील ‘आंबा महोत्सव’ कार्यक्रमाला भेट दिली आणि मार्गदर्शन केले. १२, १३ आणि १४ मे दरम्यान छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथे दुपारी ४ ते रात्री १० या वेळात हा आंबा महोत्सव भरविण्यात आला होता.
पावसाचा लहरीपणा तसा सर्वश्रूत. हल्लीतर एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव मिळतो. निसर्गाच्या याच लहरीपणामुळे मात्र सर्वसामान्यांचे गणित कोलमडते, ज्याचा विचार फारसा कुणी करत नाही. हल्ली राज्याच्या अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले रब्बी पीक तसेच द्राक्ष आणि आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी मदतीवर विसंबून असलेला, जगाला अन्नबळ देणारा बळीराजा यामुळे अशक्त झाला. एकीकडे पावसाळ्यात दुष्काळाचा अनुभव येत असतो, तर उन्हाळ्यात अवकाळीमुळे शेतकरी हैराण.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आंवा, काजु, द्राक्ष या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. २५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार. तर, ३१ मे पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारांनी दिली.
अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि फळ बागायत दारांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, जांभुळ, करवंद यांसह अनेक फळभाज्यांचे नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमधील या नुकसानी नंतर त्याचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असते आणि ती नुकसान भरपाई शेतकऱ्याला योग्य प्रकारे मिळावे यासाठी प्रशासनाकडून पंचनामे देखील केले जातात.
राज्यात काही भागात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्गात वाढत्या तापामानाचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत आले आहेत. दुपारी प्रचंड ऊन आणि रात्री वातावरणात निर्माण होणारा गारवा, यामुळे आंब्याचा मोहर गळून पडण्याची भीती बागायतदारांना सतावत आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक मेट्रिक टन आंब्याची भेट पाठवली आहे.
कोकणातील आंबा, काजू, फणस ही उत्पादने आणि त्यांच्यावर आधारित उद्योग हे तसे परंपरागत. याच परंपरागत व्यवसायाला आपल्या शिक्षणाची, तंत्रज्ञानाच्या कौशल्याची जोड देऊन कालसुसंगत व्यवसाय उभा करणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून कोकणातील अतिशय दुर्गम, डोंगराळ खेड्यातसुद्धा ’शंतनु फ्रूट प्रॉडक्ट्स’च्या माध्यमातून उद्योजकतेचा वसा जपणारे आजचे उद्योजक राजेंद्र निमकर यांचा उद्योजकीय प्रवास उलगडणारा हा लेख...
आपण पाठवलेले आंबे खाऊन श्रीमंत देशांच्या नेतृत्वाला आपल्याविषयी आपुलकी वाटावी व त्यांनी कटोर्यात पैसे टाकावेत, अशी पाकिस्तानची इच्छा असावी. परंतु, झाले उलटेच, पाकिस्तानने केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ची खटपट अपयशी ठरली आणि अमेरिका, कॅनडा इतकेच नव्हे तर पाकिस्तानचा घनिष्ठ मित्र चीननेही पाकिस्तानच्या आंब्यांना नकार दिला.
सोमवारी सकाळी पडलेला अवेळी पाऊसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. असा पाऊस पिकाला घातक असल्याचे बोलले जात असल्याने चक्रीवादळ, अतिवृष्टी, कोरोना आता आणखी मोठे संकट बळीराजावर येत नाही ना, अशी भीती सर्वांना आहे. कोकणचा राजा, नगदी पिक मानला जाणारा हापूस दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत आहे. त्यामुळे बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हापुसला पोषक अशी अचानक थंडी गायब होऊन वरुणराजाचे झालेले आगमन यंदाचे बागायतदारांचे अर्थकारण बिघडवणार की काय, अशी भीती भिती व्यक्त केली जात आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सावरकर मुद्द्यावरून आंदोलन
: उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू झाला असून बाजारात हापूसला ग्राहकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगली पसंती दिली आहे. मात्र, कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावे व्यापारी कर्नाटकातील आंबा ग्राहकांच्या माथी मारत आहेत. ही विक्री नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये सर्रास सुरू आहे. आंबा विक्री करणारे कर्नाटकचा आंबा हापूस सारखाच दिसत असल्याचा फायदा घेत आहेत.
कोकणातील आंबा बागायतदारांना यापुढे नव्या युगाची चाहूल घेऊन स्वत:ची विक्री व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेरील दुसरा कोणी येऊन आपल्याला भरपूर भाव देईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
आंबा, कदंब, पळस आणि रुद्राक्ष हे वृक्ष भारतात वेदकाळापासून पूज्य ठरत आलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या पूजनीयतेबद्दल...
कोकणचा राजा हापूस आंब्याला ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा व जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर ‘जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग’ची (जीआय टॅग) मोहर उठली आहे.
आज अशाच काही हटके सरबतांची माहिती आजच्या ‘उदरभरण’मध्ये...
Jalgaon, Sharad Kottavar, Mangolalji Bafna, Ambani Group
आंब्याच्या झाडाच्या ६ कैर्या तोडल्याने १२ वर्षी मुलाचा झाडाच्या सालीने गळाफास लावून खून केल्या प्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आंब्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेे.मात्र हे आंबे कशा प्रकारे पिकविण्यात येतात. झाडांवर अद्याप कैर्या पुर्णत्वास येण्यास बाकी असतांना जिल्ह्यात जागोजागी आंबे विक्री होतांना दिसत आहे.
आंबा हे सर्वांचेच आवडते फळ. त्यामुळे त्याची चव चाखली नाही, असा एकही जण सापडणार नाही. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला की सर्वांना आंबा खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण हा आंबा खाणे शरीरासाठी किती महाग पडू शकतो