मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित रक्तदान संकल्प शिबिराचा शुभारंभ आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
Read More
महाविकास आघाडी ही केवळ कागदावरच होती. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा खूप अपमान झाला, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत शासनाने २००९ साली काढलेल्या जीआरची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवार, १४ जुलै रोजी विधानसभेत केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सकारात्मक उत्तर दिले.
गुरुवारी (०३ जुलै) विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सत्रादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले, “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यातल्या रुग्णालयांची संख्या आपण वाढवण्याच्या आपण प्रयत्नात आहात हे कधी पर्यंत वाढणार?”
उत्तर मुंबई भाजपच्या निषेध मोर्चात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी
महाविकास आघाडीतील लोक आजही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही, असा घणाघात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी औरंगजेबाची कबर हटवणे हा इतिहास संपवण्याचा प्रकार आहे, असे वक्तव्य केले होते. यावर भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले.
यापुढे कुणालाही सरसकट मशीदींवरील भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. भोंग्याबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल. जर त्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
Atul Bhatkhalkar Birthday स्वयंसेवक, कुशल संघटक, पक्षाची जबाबदारी सांभाळणारा नेता व कांदिवली पूर्व विधानसभेचे लोकप्रिय जनप्रतिनिधी आणि भाजप आमदार असा अतुल भातखळकर यांचा प्रदीर्घ प्रवास आहे. असा प्रवास करीत जनसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणार्या अतुल भातखळकर यांच्या जीवनप्रवासाचा त्यांच्या जन्मदिनी घेतलेला मागोवा...
(MLA Atul Bhatkhalkar) काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी २३ डिसेंबरला परभणी दौऱ्यावर असताना सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक आरोप केले आहेत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं आहे.
नागपूर : विरोधी पक्षातील सर्व आमदार ईव्हीएमवर निवडून आले. त्यामुळे आधी त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करण्याचे धाडस करावे, असे उत्तर आमदार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी दिले आहे. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. यावर भातखळकरांनी उत्तर दिले.
मुंबई : कांदिवली पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी दि. २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा फॉर्म भरण्यासोबतच प्रचाराला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कांदिवलीत प्रचाराचा झंजावात उभा केला. दि. २४ ऑक्टोबर रोजीपासून ते सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजीपर्यंत त्यांनी कांदिवलीत १६ हून रथयात्रा, २० हून पदयात्रा, असंख्य स्थानिक भेटी आणि संवाद, तीन जाहीर सभा, खुल्या चर्चा अशा सर्व माध्यमांतून प्रचार केला.
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर यांच्या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या रथयात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी कांदिवलीतील वार्ड क्रमांक २७ मध्ये साई मंदिर परिसरातून काढण्यात आलेली रथयात्रा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि विविध घोषणांच्या जल्लोषात पार पडली.
मुंबई : रांगोळी, कंदील, दिव्यांची आरास करीत कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांचे स्वागत केले. मंगळवारी सायंकाळी कांदिवलीतील वॉर्ड क्र. ४४ मध्ये रथयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपचे विधानसभा अध्यक्ष अप्पा बेलवलकर, विधानसभा प्रभारी सुधीर शिंदे, मुंबईचे सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, माजी नगरसेवक आणि विधानसभा समन्वयक एकनाथ शंकर हुंडारे, माजी नगरसेवक संगीता शर्मा, दक्षा पाटील, महायुतीचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस
BJP MLA कांदिवली पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांच्याशी साधलेला विशेष संवाद
कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमाननगरमधील राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवन येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे अकाउंट असिस्टंट, टॅली ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग असे कोर्स शिकवले जाणार आहेत. त्यामुळे या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
कांदिवली पूर्व मतदारसंघातील आमदार अतुल भातखळकर यांची भाजपच्या माध्यम विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. 23 जुलै रोजी याबाबत माहिती दिली. नुकत्याच पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना “सडेतोड भूमिका व्यक्त करा, विरोधकांना ठोकून काढा,” अशी परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर, परखड मते मांडणार्या आ. भातखळकर यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. बावनकुळे यांनी मंगळवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रंदिवस एक करून भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. आज पूर्ण देशाचा विश्वास त्यांच्याबरोबर आहे. ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. प्रत्येक मतदार नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे. तो आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदरी ही महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे.
"आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' आणि दिल्लीला जाईन", असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्याला आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २०१९ मध्ये खोटे बोललो, हे उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे कबूल केले, असा घणाघात त्यांनी केला.
राऊत आधी महाभकास आघाडीच्या जागावाटपाचं बघा, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे. तसेच राऊत हे डोक्यावर पडलेले गृहस्थ आहेत, असा घणाघातही त्यांनी केला. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
कितीही झालं तरी उर्फी जावेद माधुरी दिक्षित होऊ शकत नाही, अशी टीका भाजप नेते अतूल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. नुकतेच मुंबई बहुचर्चित वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड प्रकल्पाचे उद्धाटन पार पडले. परंतू, कोस्टल रोड हे उद्धव ठाकरेंचे श्रेय असल्याचा दावा उबाठा गटाकडून करण्यात येत आहे. यावरून आता भातखळकरांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
एसआयटी चौकशी नेमणं हे राज्य सरकारचं अत्यंत स्वागतार्ह पाऊल असून याद्वारे दिशा सालियानला नक्की न्याय मिळेल असा विश्वास भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे. ते सध्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरात असून मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ड्रग्ज माफिया ललित पाटिल हा अजूनही उबाठासेनेतच असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडुन करण्यात येत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटिल प्रकरणी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी खासदार संजय राऊत आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ललित पाटीलने अद्यापही ठाकरे गटाला आपला राजीनामा दिलेला नाही. २०१६ मध्ये ललित पाटिल याने शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता.
“भारतीय संस्कृतीचा विचार हा मानवतेचा आहे, तसाच तो चांगल्या संस्काराचाही आहे. अशा संस्काराचे एक ऊर्जा केंद्र म्हणजे भवानी शक्तीपीठ आहे. जगात भेकडाच्या अहिंसेला कोणी किंमत देत नाही. जो आखाड्यात उतरून बलोपासना करतो, त्याच्याच अहिंसेला आणि नैतिकतेला जगामध्ये किंमत असते,” असे प्रतिपादन भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले. मालाड पूर्वला दफ्तरी रोड परिसरातील भवानी आखाड्याचे उद्घाटन आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शक्तीपीठाचे प्रमुख राहुल जाधव, गुरुजी
इंडिया आघाडीची उद्या ३१ ऑग. आणि १ सप्टें. रोजी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विविध राज्यातून ६० ते ६५ नेते उपस्थित असणार आहेत. यावरुन आ. अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सवाल केले आहेत. उद्या बनावट गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार का? राहुल गांधींची सावरकरांच्या मुद्द्यावरुन कानउघडणी करणार का? या प्रश्नांची उत्तरे ठाकरेंनी द्यावी, अशी मागणी अतुल भातखळकरांनी केली आहे.
सामनातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील अग्रलेखावरुन भाजप नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत 'सामना' मध्ये खालच्या भाषेचा वापर करण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वखाली सामना वृत्तपत्राची आज होळी करण्यात आली.
मेट्रो पासून एसआरए पर्यंतच्या अनेक विकास कामे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावली. त्यांच्या बद्दल बोलण्यासारखे काही नसल्याने 'सामना'त त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही 'सामना' वृत्तपत्राची होळी केली. हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी इशारा समजावा. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा भाजप नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिला.
समान नागरी कायदा हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने राजकारणाचा मुद्दा नसून तो राष्ट्रीय एकात्मता आणि प्रबोधनाचा आहे. समान नागरी कायदा करणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे, असा त्याचा अर्थ होत नसून स्त्री-पुरुष समानतेच्या पायावर सर्व भारतीयांसाठीचा हा नागरी कायदा करणे असा त्याचा अर्थ आहे. आम्ही लोकांच्यात जाऊ, लोकांना याचे महत्व पटवून सांगू आणि प्रबोधन करू. संविधानकर्त्यांनी जे सांगितले त्याची अंबलबजावणी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
लव्ह जिहादवर बोलताना अनेकांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात ? लव्ह जिहाद च्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि याबद्दलचा कायदा या सदानाने लवकरात लवकर आणला पाहिजे अशी मागणी भाजपा मुंबई महामंत्री आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. अधिवेशनात बोलताना भातखळकरांनी हा मुद्दा मांडला.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी जम्मू काश्मीरमध्ये 'फक्त' ८९ काश्मीरी पंडितांचीच हत्या झाली. 'द केरला स्टोरी' चित्रपटात तीनच मुली पीडित होत्या. अशी वादग्रस्त विधानं केली. यामुळे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी आझमींचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या आठवड्यात ‘वंदे मातरम’वरून मोठा गदारोळ झाला होता. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही असं वक्तव्य केल्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले होते.
मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रीम कोर्टाने सरकारवर टीका केली होती. मात्र, आता भाजपाकडुन कोर्टाला चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. सरकारचं काम सुप्रीम कोर्ट करणार असेल तर सुप्रीम कोर्टानंच देश चालवावा. असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
कांदीवली पूर्व विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे फडणवीसांनी झालेल्या बैठकीत दिले. घरा ऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
दि.,१० जून रोजी राष्ट्रवादीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता
उद्धव ठाकरेंची पुन्हा उबाठा प्रमुख म्हणून फेरनिवड होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोड मध्ये दिसुन येत आहे. शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपल्यानंतर प्रथमच शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक 18 जूनला मुंबईत होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे.
द केरळ स्टोरी हा सिनेमा तिकीटबारीवर चालत असेल तर केदार शिंदेना पोटदुखी कशाला होतेय? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित केल्याने केदार शिंदे संतापले. त्यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिलं आहे, "दुर्दैव...महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते आयोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर सा
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त शहर उपनगरात विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली तसेच सामान्यांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथे पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण तर जीटीबीनगर येथे विशेष कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई भाजपा वसंतस्मृती कार्यालयात ध्वजारोहण झाले. भाजपा मुंबईच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वती
Jitendra Awhad भाजप नेते आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा जातवादी पक्ष हीच महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे, असा घणाघात त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर लगावला आहे. आव्हाडांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींबद्दलच्या विधानाचा विरोध करताना संपूर्ण सनातन धर्माविरोधात गरळ ओकली होती.
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा वाडेकर यांचे मंगळवार दिनांक १४ रोजी वयाच्या ८२ वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाड्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पुढे नेण्याचं काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले. यशस्वी उद्योगा बरोबर सेंद्रिय शेती करत असताना परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी शेतीची अवजारे तयार करण्याची कंपनी सुरू केली होती.
ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडा समितीमध्ये निरी संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश करुन हा आराखडा लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.सदस्य आशिष शेलार यांनी ठाणे येथील खाडीला रामसर दर्जा प्राप्त झालेला असताना खाडीतील प्रदूषणात वाढ होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.
“75 वर्षांच्या आपल्या कालखंडांमध्ये 75 वर्षांमध्ये आपल्या पंतप्रधानांना शौचालयासारख्या समस्यांवर बोलावे लागत आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी दहा किंवा पाच वर्षांनी नव्हे, तर दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल दिला पाहिजे,” असे ठाम मत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडले आहे.
कुठे चौकात ढोल ताशांचा गजर, दांडपट्टा, कुठे शिवकालीन नाण्यांचे, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पोवाडे, तुतारी, भव्य मिरवणूका आणि 'जय जय शिवराय' या आरतीचा जयघोष...छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी... जय शिवराय.. अशा घोषणांमध्ये अवघी मुंबई आज दुमदुमून गेली होती.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजप आजपर्यंतचे सर्व ‘रेकॉर्ड ब्रेक’ करुन विजयी होईल,” असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत, पण खालच्या भाषेत आता ही टीका केली जाऊ लागली आहे. त्यातून त्यांनी महापुरुषांच्या अवमानाबद्दल ते केंद्रीय नेतृत्वावर, केंद्रीय मंत्रिमडळावर प्रहार करत आहेत. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
केईएम, नायर रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत आज अधिवेशनात आ. अतुल भातखळकरांनी मुद्दा उपस्थित केला. महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील नायर आणि केईएम ही फार महत्वाची आणि मोठी रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणची मशीनही कित्येक महिन्यापासून बंद आहेत. आणि त्याच्यामुळे खाजगी एमआरआय चालवणारे लोकं त्याठिकाणी येणाऱ्या गरीब लोकांची लूटमार करतायेत. असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
मुंबई महापालिकेत यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. तसेच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी सुरु असलेल्या सीबीआय चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. दिशाच्या मृत्यूबाबत सीबीआयने स्पष्टीकरण दिले असून तिचा मृत्यू हा केवळ अपघात असल्याचे या चौकशीत समोर आल्याचे म्हटले आहे. सीबीआयने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे आता या प्रकरणाला वेगळे प्राप्त झाले आहे. तर या प्रकरणावरून केंद्रीय तपास संस्थांच्या स्वायत्ततेवर शिक्कामोर्तब झाल्याचे भाजपने म्हटले आहे.
जागर मुंबईचा : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबईकरांना आकर्षित करणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करून मतदारांचे लक्ष वेधण्याचा भाजपचा प्रयत्न काही अंशी यशस्वी होत असल्याचे वरळीतील दीपावली महोत्सव आणि काळाचौकीतील मराठी दांडिया महोत्सवाने दाखवून दिले होते. त्याचाच पुढील भाग म्हणजे मुंबई भाजपच्या 'जागर मुंबईचा' अभियानाचा शुभारंभ ठाकरेंच्या बांदऱ्यातून होणार आहे. रविवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा आरोप युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे.
आ. अतुल भातखळकरांची मागणी
मढच्या स्टुडिओचा वापर तात्काळ थांबवा