प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या कोचिंग क्लासेस, कॉलेज आणि शाळांमध्ये 'SHE BOX' बसवावा यासह विविध सूचनांचे पत्र भाजप आ. चित्रा वाघ यांनी गुरुवार, ३ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
Read More
(Manipur Tense Over the Arrest of Arambai Tenggol Leader) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नाही. राज्यातून हिंसाचाराच्या बातम्या वेळोवेळी येत राहतात. आता मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराची लाट उसळली आहे. यामुळे इंफाळसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर विष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ
(Murshidabad Violence) मुर्शिदाबाद हिंसाचारादरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांच्या भीतीमुळे धुलियान आणि मुर्शिदाबादमधील शेकडो हिंदू कुटुंब घरे सोडून मालदा येथे पळून गेली होती., परंतु राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस हे स्वीकारण्यास तयार नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार अमीरुल इस्लाम यांनी या हिंसाचारात हिंदू नागरिकांच्या घरांच्या तोडफोडीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जिल्ह्यात मुस्लिम जमावाने दंगल घडवल्यानंतर काही दिवसांनी, एका हिंदू महिलेने तिच्यावर बलात्कार करण्यात येणार असल्याच्या धमक्या आणि इस्लाम स्वीकारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले आहे.
Hindu Bachao मुर्शिदाबादमधील हिंसेनंतर पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेता सुवेंदु अधिकारी यांनी बंगाली हिंदूंसाठी 'हिंदू बचाओ' मोर्चा काढला. दरम्यान, त्यांनी ग्राम सुरक्षा संघटनेची मागणी केली आहे. त्यासोबतच सांगण्यात आले की, हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी परवानायुक्त हत्यारे पुरवण्यात येणार आहेत.
नाशिकमधल्या काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावरून झालेल्या हिंसाचारानंतर नाशिक पेटवण्याचं राजकीय कारस्थान होतं का असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे या प्रकरणी पोलिस तपासात उघडकीस आलेलं मविआ कनेक्शन. संशयितांमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश असल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय.आतापर्यंत जवळपास दीड हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या हिंसाचार प्रकरणातील राजकीय धागेदोरे समोर आल्यानंतर गंभीर सवाल उपस्थित होतायत. नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक
(India slams Bangladesh remark on Murshidabad Violence) गेल्या काही दिवसापासून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचाराची मालिका सुरु आहे. या हिंसाचारावर बांगलादेशने केलेल्या विधानाचा समाचार घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर देताना चांगलीच समज दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी "बांगलादेशने आधी स्वतःच्या देशाकडे पाहावे. आणि आमच्या देशांतर्गत विषयामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही.", अश्या शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला
Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांद्वारे पसरवण्यात आलेल्या हिंसेचा आता मोठ्या प्रमाणात खुलासा करण्यात आला आहे. हिंसा पसरवण्यात आल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांना याबाबत स्फोटकांचा मारा कुठे करायचा आहे आणि कुठे हल्ला करायचा याचे निशाण बनवण्यात आले आहे.
Mamata Banerjee पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे हिंसाचार बळावला गेला आहे. ममता बॅनर्जी आपल्या व्होट बँकचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये मु्स्लिमांनी हिंसाचाराच्या कारणाने ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे.
(Murshidabad Violence) वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. याबाबतच प्राथमिक चौकशी अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातून असे समोर आले आहे की, या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असून त्यांना स्थानिक नेत्यांची मदत मिळाल्याचे समोर आले आहे. पुढे हेच घुसखोर नियंत्रणाबाहेर गेल्याने परिस्थिती आणखी बिकट होत गेली.
(Tensions in West Bengal's South 24 Parganas) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात असताना, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात भांगर येथे सोमवारी १४ एप्रिल रोजी वक्फ कायद्याविरोधात काढलेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उसळला. या ठिकाणी इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) चे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याने अनेकजण जखमी झाले आणि आंदोलकांकडून पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
(Murshidabad Violence) पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्यावरुन सुरु झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत दीडशे जणांना अटक केली आहे. दंगलग्रस्त भागांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) पाच पथके तैनात करण्यात आली होती. या बीएसएफच्या जवानांवर दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केल्याची माहिती बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी दिली.
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित वास्तवावर आधारित असल्याची कोल्हेकुई सुरू केली. मात्र, सध्या प. बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये जे घडत आहे, ते काश्मीरपेक्षा फारसे वेगळे नाही. काही वर्षांनी या घटनांवर ‘बंगाल फाईल्स’सारखा चित्रपटही काढला जाईल. सध्या तो देशवासीयांना लाईव्ह पाहायला मिळत आहे, ही शोकांतिका
Bengal Violence पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे २७ मार्च रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडून ३ एप्रिलपर्यंत कारवाईचा अहवाल मागितला आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार, २२ मार्च रोजी हमीद इंजिनयर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो औरंगजेब समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आता जे काही नुकसान झाले ते सगळे दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता विकली जाईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर हिंसाचाराच्या घटनेत मालेगावचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शनिवार, २२ मार्च रोजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
(NIA Team in Chhatrapati Sambhajinagar) राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले आहे. यातच नागपूरमध्ये दंगल (Nagpur Violence) उसळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए (NIA) चे दिल्लीचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. संभाजीनगरमधील संशयित हालचालींवर एनआयएकडून लक्ष ठेवले जाणार आहे. औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दंगल किंवा तणाव निर्माण होण्याची चिन्हं असल्याने jराज्यातील प्रशासन तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आह
सोमवारी दिल्लीत ‘वक्फ’ कायद्यातील सुधारणांविरोधात झालेल्या धरणे आंदोलनात भडकाऊ आणि हिंसक भाषा वापरली गेली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी नागपूरमध्ये दंगल घडविण्यात आली, हा योगायोग नक्कीच नाही. औरंगजेबाची कबर नागपूरपासून तब्बल ४५० किमी दूर. तरी या शहरात दंगल घडविण्यामागे आपले हिंसक उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न होता. या दंगलीचे देशाच्या अन्य भागांतील दंगलींशी खूपच साधर्म्यदेखील आहेच. या महिनाअखेरीस नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडविलेल्या दंगलील
संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या नागपूर हिंसाचार प्रकरणातील अनेक आरोपी नागपूरच्या बाहेरचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ते कुठून आले याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती सायबर खात्याचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी गुरुवारी दिली.
नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपासातून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली आहे. फहीम खाननेच जमाव जमवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असताना यासंदर्भात आता एक नवीन अपडेट पुढे आली आहे. या हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यादृष्टीने पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी महिला पोलिसाची वर्दी खेचत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान यानेच जमाव जमवला असून त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले.
नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारामुळे सध्या वातावरण तापले आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत या हिंसाचारातील आकडेवारी जारी केली. या घटनेचा सूत्रधार लवकरच कळणार असून नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करत पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा दिला.
नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत व्यक्त केला. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर एक ट्रॉली भरून दगड आणि अनेक शस्त्र मिळाले असून या घटनेत काहीतरी सुनियोजित पॅटर्न दिसत असल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी नागपूर घटनेवर विधानसभेत निवेदन केले.
महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून या हिंसाचाराच्या सूत्रधाराला बेड्या ठोका, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूर हिंसाचारातील जखमींच्या उपचाराबाबत कोणतीही हलगर्जी होता कामा नये, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी या घटनेत जखमी झालेले नागरिक, त्यांचे कुटुंबीय तसेच पोलिस अधिकाऱ्यांची रुग्णालयात भेट घेतली.
दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर कट्टरपंथींचा उन्माद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. हिंदू अल्पसंख्याक आणि विशेषतः हसीना समर्थक तसेच, अवामी लिगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यास कट्टरपंथींनी सुरुवात केली. एखाद्या हॉलीवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटाची कथा चोरून आपला नवीन चित्रपट तयार करायचा, ही ‘टेक्निक’ तशी चित्रपटसृष्टीत जुनीच. अशाच पद्धतीने बांगलादेशातील स्टोरी एकाअर्थी चोरण्याचा प्रकार सीरियातही झाल्याचे दिसते.
काश्मीरमधील हिंसाचार ( Kashmir Violence ) हा पाकपुरस्कृत असल्याचा उच्चार लष्करप्रमुखांनी केला आहे. आतापर्यंतच्या दहशतवादी घटनांनी वेळोवेळी ही बाब ठळकपणे मांडली आहे. भारताने दहशतवादाविरोधात राबविलेल्या ठोस उपाययोजना, तसेच काश्मीरच्या विकासासाठी राबविलेले धोरणात्मक निर्णय भारताला बळ देणारे ठरले आहेत.
उत्तर प्रदेशच्या संभळ येथे २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. अनेक पोलीस कर्मचारी देखील या हिंसाचारात जखमी झाले. सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर आक्रमक कट्टरपंथीयांनी हल्लाबोल केला. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही याचा निश्चय केलेले मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी या समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
(CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी परभणीत येऊन सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. "सोमनाश सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून कस्टोडिअल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्
(MLA Atul Bhatkhalkar) काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी २३ डिसेंबरला परभणी दौऱ्यावर असताना सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक आरोप केले आहेत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं आहे.
(CM Devendra Fadnavis) परभणीमध्ये संविधानाचा अवमान करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सुर्यवंशी (Somnath suryawanshi) या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेवर विधानसभेत चर्चा झाली. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर दिले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि या संपुर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे.
(CM Devendra Fadnavis) परभणी मधील हिंसाचार प्रकरणावर शुक्रवार, २० डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच संबंधित संपूर्ण घटनाक्रम त्यांनी उलगडून सांगितला.
मुंबई : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले ( Violence ) आणि धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे असंख्य लोक भयभीत झाले आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्थिर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्याचे परिणाम बांगलादेशच्या पलीकडे पसरतील. ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतता धोक्यात येईल, असा इशारा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेते कैलाश सत्यार्थी यांनी दिला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना उद्देशून पुढे ते म्हणाले की
Hindus बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या अंतरिम सरकारने बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायावर चादर टाकली आहे. मात्र याउलट अल्पसंख्याकांवर विशेषत: हिंदूंविरोधात जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा वास्तववाद आपल्याला स्वीकारावा लागत आहे. बांगलादेशात हिंदूंना रिक्षाचालकांकडून जाच होत असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशात ७९ दिवसांत हिंदूंविरुद्ध ८८ घटना घडल्याची माहिती बांगालदेशने मंगळवारी १० डिसेंबर २०२४ रोजी सांगितली.
मुंबई : बांगलादेशात सत्तांतर होऊन मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्यापासून येथील इस्लामिक ( Islam ) कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हिंदूंची मंदिरे, देव-देवतांच्या प्रतिमा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या जिहाद्यांकडून वारंवार होत आहे. इस्लाममध्ये मूर्तिपूजकांना ‘काफीर’ मानले जाते. त्यासंबंधी सर्व गोष्टी त्यांच्यासाठी ‘हराम’ आहेत. बांगलादेशात धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंची प्रतीके असलेल्या मंदिरांवर याच उद्देशाने हल्ले झाल्याच्या घटना गेल्या काही
sambhal violence : उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराने सर्वांनाच हैराण करून सोडलंय. अशातच आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला एका पत्राद्वारे चेतावणी दिल्याचे पाहायला मिळतंय. नेमकं प्रकरण काय? पाहा संपूर्ण व्हिडिओ... #jamamasjid #sambhal #sambhalviolence #uttarpradesh #vishnushankarjain #jamamosque #AllIndiaMuslimPersonalBoardLaw #asisurvey #news #mahamtb
उत्तर प्रदेशच्या संभळ परिसरात, जामा मस्जिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर रोजी कट्टररपंथीयांकडून हिंसाचार करण्यात आला. आता पर्यंत या मध्ये २५०० जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लाखो रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असून २० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशातच आता अरफा खानम शेरवानी या महिला पत्रकाराने जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
: उत्तर प्रदेशच्या संभळ येथे २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात पोलीस खात्यातील २८ जणं जखमी झाली आहेत. मस्जिदीच्या सर्वेसाठी आलेल्या पथकावर स्थानिक कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून २५ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अशातच आता, या हिंसाचाराच्या बाबतीत काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
नवी दिल्ली : मणिपूरमधील ताजे हल्ले आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने २ हजार जवानांचा समावेश असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ( CAPF ) २० कंपन्या राज्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव? | Psychology of Violence | Dr. Nandu Mulmule | MahaMTB Gappa मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा...
उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना 'Bahraich' हत्याकांड!