Children Safety

शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली.

Read More

'सिंदूर' नावात राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री फडणव

Read More

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड

Read More

आता औषध खरेदीचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना - वैद्यकीय शिक्षण मंत्री; औषध खरेदीत विलंब टाळण्यासाठी उपाययोजना

राज्यामध्ये शासकीय रुग्णालयांत औषध खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करण्यात येते. मात्र औषध खरेदीला विलंब होत असल्यास औषधांची तातडीने उपलब्धता होण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रशासनाला एकूण अर्थसंकल्प तरतुदीच्या ३० टक्के पर्यंत औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये कुठेही औषधांची कमतरता होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्य

Read More

पोलिसांना वर्षातून दोनवेळा आरोग्य तपासणी बंधनकारक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पोलिसांचे मानसिक आरोग्य, निवास आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष लक्ष पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, तसेच त्यांच्या निवास सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ५० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून दोनदा, तर ४० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून एकदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि निवासाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले.

Read More

मोदी सरकारची रोजगार प्रोत्साहन योजनेस मंजुरी

नवीन कामगारांना एका महिन्याचे 15,000 रुपयांपर्यंतचे वेतन दोन हप्त्यांमध्ये मिळणार ; उत्पादन क्षेत्रावर भर आणि नवीन कामगारांसाठी प्रोत्साहनपर वेतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला बळ देण्यासाठी, रोजगारक्षमता वाढविण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी, विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर (ईएलआय) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी

Read More

रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते रेल वन अ‍ॅपचे लोकार्पण

डिसेंबर २०२५ पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वे सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या ४०व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार,दि.१ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 'रेलवन' या नवीन ॲपचा

Read More

आणीबाणीच्या काळात संविधानाची हत्या ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल; न्यायव्यवस्थेलाही गुलाम बनवण्याचा होता हेतू

"भारतात आणीबाणी लागू करणार्‍यांनी केवळ आपल्या संविधानाची हत्या केली नाही; तर न्यायव्यवस्थेलाही त्यांचे गुलाम बनवण्याचा त्यांचा हेतू होता. या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. शेवटी, जनतेचा विजय झाला, आणीबाणी उठवण्यात आली आणि आणीबाणी लादणार्‍यांचा पराभव झाला. अनेक लोकांना कठोर छळ करण्यात आला. ‘मिसा’अंतर्गत कोणालाही अटक करता येत होती. विद्यार्थ्यांनाही त्रास दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात आला,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्या ‘मन की बात’ या १२३व्या कार्यक

Read More

आचार्य विद्यानंदजी महाराज भारताच्या परंपरेचे आधुनिक दीपस्तंभ : पंतप्रधान

'भारत ही जगातील सर्वात जुनी जिवंत संस्कृती आहे. आपले विचार, आपले तत्वज्ञान अमर आहे. या तत्वज्ञानाचे स्रोत आपले ऋषी, संत आणि आचार्य आहेत. आचार्य विद्यानंद जी महाराज हे भारताच्या या परंपरेचे आधुनिक दीपस्तंभ आहेत. ते म्हणायचे की जेव्हा जीवन सेवेने परिपूर्ण होते तेव्हाच जीवन धार्मिक बनू शकते. त्यांचा हा विचार जैन तत्वज्ञानाच्या मूळ भावनेशी तसेच भारताच्या चेतनेशी जोडलेला आहे.", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जैन आध्यात्मिक गुरू आचार्य विद्यानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त शनिवारी आयोजित

Read More

पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेसी नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या बात

Read More

विठुनामाच्या घोषात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच

Read More

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121